(९८) हा बदला आहे त्यांच्या या कृत्यांचा की त्यांनी आमच्या आयतींचा इन्कार केला आणि म्हटले, ‘‘आम्ही जेव्हा केवळ हाडे व माती बनून जाऊ तेव्हा नव्याने आम्हाला निर्माण करून उभे केले जाईल काय?’’
(९९) काय त्यांना हे उमगले नाही की ज्या अल्लाहने आकाशांना व जमिनीला निर्माण केले तो यांच्यासारख्यांना निर्माण करण्याचे सामर्थ्य अवश्य राखतो? त्याने (मृत्युपश्चात) यांच्या पुनरुत्थानाची एक वेळ निश्चित केली आहे जिचे येणे निश्चित आहे, पण अत्याचार्यांचा हट्ट आहे की ते त्याचा इन्कारच करतील.
(१००) हे पैगंबर (स.)! यांना सांगा, ‘‘जर एखादे वेळी माझ्या पालनकर्त्याच्या कृपेचे खजिने तुमच्या ताब्यात असते तर तुम्ही खर्च होण्याच्या भीतीने त्यांना जरूर रोखून ठेवले असते, खरोखरच मनुष्य मोठा संकुचित मनाचा आहे.३९
३९) मक्केचे अनेकेश्वरवादी ज्या मानसिक कारणांनी मुहम्मद (स.) यांच्या पैगंबरत्वाचा इन्कार करीत असत, यापैकी एक महत्त्वाचे कारण असे की तसे न केल्याने त्यांना पैगंबर (स.) यांचे श्रेष्ठत्व मान्य करावे लागत होते. परंतु आपल्या एखाद्या समकालीन अथवा समवर्गीयाचे श्रेष्ठत्व मान्य करण्यात माणूस मुश्किलीनेच तयार होत असतो. यासाठीच फरमाविले जात आहे की, कोणाचेही वास्तविक श्रेष्ठत्व मान्य करण्यात हृदये दु:खी व्हावीत या अवस्थेला ज्यांची कृपणता पोहचली आहे अशा लोकांना जर एखाद्या वेळी अल्लाहने आपल्या कृपेच्या खजिन्याच्या किल्ल्या सुपुर्द केल्या असत्या तर त्यांनी कुणाला फुटकी कवडीदेखील दिली नसती
Post a Comment