(९२) अथवा तू आकाशाचे तुकडे-तुकडे करून आमच्यावर कोसळवावेस जसा की तुझा दावा आहे. अथवा अल्लाह आणि दूतांना आमच्या समक्ष समोरासमोर आणावे.
(९३) अथवा तुझ्यासाठी सोन्याचे एक घर बनवावे. अथवा तू आकाशावर चढून जावे आणि तुझ्या चढण्यावरदेखील आम्ही विश्वास करणार नाही जोपर्यंत तू आमच्यावर एक असा लेख उतरवून आणत नाहीस ज्यास आम्ही वाचावे,’’ हे पैगंबर (स.)! यांना सांगा, ‘‘पवित्र आहे माझा पालनकर्ता काय एक संदेश आणणार्या मानवाशिवाय मी अन्य काही आहे?’’
(९४) लोकांसमोर जेव्हा कधी मार्गदर्शन आले तेव्हा त्याला मान्य करण्यासाठी त्यांना कोणत्याही गोष्टीने रोखले नाही परंतु त्यांच्या याच कथनाने की, ‘‘काय अल्लाहने मानवाला पैगंबर बनवून पाठविले?’’
(९५) यांना सांगा, जर भूतलावर ईशदूत समाधानाने वावरू लागले असते तर जरूर आम्ही आकाशातून एखाद्या ईशदूतालाच त्यांच्यासाठी पैगंबर बनवून पाठविले असते.
(९६) हे पैगंबर (स.)! यांना सांगून टाका, माझ्या व तुमच्या दरम्यान केवळ एक अल्लाहची साक्ष पुरेशी आहे. तो आपल्या दासांच्या स्थितीची खबर राखणारा आहे आणि सर्व काही पाहत आहे.
Post a Comment