(१८) ज्या लोकांनी आपल्या पालनकर्त्याशी कुफ्र (इन्कार) केला आहे, त्यांच्या कृत्याचे उदाहरण त्या राखेप्रमाणे आहे जिला एका वादळी दिवसाच्या वावटळीने उडविले असावे. त्यांनी केलेल्या कृत्यांचे त्यांना काहीही फळ मिळू शकणार नाही,२५ हेच परकोटीची मार्गभ्रष्टता होय.
(१९) तुम्ही पाहात नाही काय अल्लाहने आकाशांची व पृथ्वीची निर्मिती सत्याधिष्ठित केली आहे?२६ त्याने इच्छिले तर तो तुम्हा लोकांना घेऊन जाईल आणि तुमच्या जागी नवनिर्मिती करील.
(२०) असे करणे त्याच्यासाठी काहीच कठीण नाही.२७
२५) म्हणजे ज्या लोकांनी आपल्या पालनकर्त्याशी नमकहरामी, अवज्ञा, उदंडता व शिरजोरी धोकाधडी केली आणि आज्ञापालन व उपासना पद्धतीला स्वीकारण्यास अमान्य केले जी पद्धत पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सर्वांसाठी घेऊन आले आहेत. त्या लोकांचे संपूर्ण जीवनव्यवहार आणि जीवनभराच्या कर्मांची सर्व पुंजी अंतत: निरर्थक आणि बेकार होईल. जसे एक राखेचा ढीग होता जो काही काळानंतर मोठी टेकडी बनला, परंतु एकाच दिवसाच्या सोसाट्याच्या वाऱ्याने त्याला उडवून नेले आणि एक एक कण त्याचा विखुरला गेला. नजरेला धोका देणारी त्यांची सभ्यता, त्यांची शानदार संस्कृती, त्यांचे आश्चर्यकारक उद्योग, त्यांचे जबरदस्त हक्क, त्यांची अलिशान विद्यापीठे, त्यांचे कला, विज्ञान, त्यांचे प्रभावशाली व प्रभावहीन साहित्याचे अपार भांडार तसेच त्यांची उपासना आणि त्यांचे दाखविण्यासाठीचे सदाचार, मोठमोठे धर्मार्थ आणि जनहिताचे कारनामे या सर्वांवर ते जगात घमेंड व गर्व करतात; सर्वच्या सर्व एक राखेचे ढीग शेवटी सिद्ध होणार आहे, ज्याला कयामतच्या वेळी पूर्णत: साफ होणे आहे. परलोकात एक कणसुद्धा त्यांच्याजवळ या योग्यतेचा राहणार नाही की ज्याला अल्लाहच्या तराजूमध्ये ठेवून काही वजन करावे.
२६) हा तर्क आहे त्या दाव्याचा ज्याला वर नमूद केले गेले होते. हा संदेश ऐकून तुम्हाला आश्चर्य का होते? काय तुम्ही पाहात नाही की ही धरती व आकाश निर्माण करण्याचा शानदार कारखाना सत्यावर स्थापित झाला आहे, असत्यावर मुळीच नाही. वास्तविकतेवर जे आधारित नाही तर केवळ एक निराधार अनुमान आणि मनोकामनांवर आधारित असेल तर त्यास दृढता प्राप्त् होत नाही. त्याच्यासाठी स्थिरतेची शक्यता बाकी राहात नाही. त्याच्या भरोशावर काम करणारा कधीही आपल्या भरोशावर सफल होत नाही. जो मनुष्य पाण्यावर निशान बनवितो आणि वाळुवर महाल बनवितो त्याला जर वाटत असेल की त्याचे निशान बाकी राहावे आणि वाळूचा महाल टिकावा तर त्याची ही इच्छा कधीच पूर्ण होणार नाही. कारण पाण्याची ही वास्तविकता नाही की त्याने निशान (चिन्ह) टिकवून ठेवावे आणि वाळुची ही वास्तविकता नाही की महालासाठी ती मजबूत पाया बनेल. म्हणून सत्यतेला आणि वास्तविकतेला दृष्टीआड करून जो मनुष्य खोट्या आशा-आकांक्षावर आपल्या कर्माचा पाया उभारतो, त्याला विफल होणे आहे. हे सत्य तुम्हाला समजत असेल तर हे ऐकून तुम्हाला आश्चर्य का होते की अल्लाहच्या सृष्टीत जो मनुष्य अल्लाहच्या आज्ञापालन व उपासनेशी निरपेक्ष होऊन जीवनयापन करीत असेल तर त्याचे जीवनभराचे कर्मफळ बरबाद होईल? तसेच माणसाने अल्लाहशिवाय दुसऱ्या कोणाचे प्रभुत्व मान्य करून (खरे तर त्याचे प्रभुत्व मुळात नसतेच) जीवन जगत राहील त्याचे जीवनकर्म बरबाद होईल? मनुष्य जगात स्वावलंबी नाही, हे एक उघड सत्य आहे की मनुष्य अल्लाहशिवाय इतर दुसऱ्यांचा दास बनून राहील तर असत्याच्या आधारावर व वास्तविकतेविरुद्धच्या कल्पनेवर आपल्या जीवनपद्धतीचा पाया रचणारा हा मनुष्य पाण्यावर चिन्ह ओढणाऱ्या मूर्खासारखा परिणाम पाहणार नाही? या मूर्खासाठी तुम्ही कोणत्या दुसऱ्या परिणामाची आशा बाळगता?
२७) दाव्यासाठीचा तर्क दिल्यानंतर त्वरित उपदेश करण्यासाठी हे वाक्य आले आहे. येथे एका शंकेचे निरसन करण्यात आले आहे. वरील स्पष्टोक्ती ऐकल्यानंतर मनुष्याच्या मनात ही शंका उद्भवते व एखादा विचारू शकतो की जर हे असे असेल ज्याला वरील आयतींमध्ये सांगितले गेले आहे तर मग जगात प्रत्येक असत्यवादी आणि दुराचारी नष्ट का होत नाही? याचे उत्तर म्हणजे, ``हे माणसा, काय तुला वाटते की त्यांना नष्ट करणे अल्लाहसाठी कठीण काम आहे? किंवा अल्लाहशी त्यांचे काही संबंध आहे? काय अल्लाहने त्यांच्या दुष्टव्यानंतर आणि असत्यवादी असूनसुद्धा त्यांना आप्तेष्ट व नातेवाईक संबंध असल्यामुळे सूट दिली आहे?'' असे नाही आणि तू स्वत: जाणतो की असे काही नाही. यावर तुला समजले पाहिजे की एक असत्यवादी आणि दुष्ट समाज प्रत्येक क्षणी असुरक्षित व अस्थायी बनून राहिलेला आहे. त्या समाजाला सततची भीती आहे की आपल्याला हटवून आपल्या जागी दुसऱ्या समाजाला काम करण्याची संधी दिली जाईल. या धोक्याला व्यावहारिक रुपात समोर येण्यास विलंब लागत आहे तर ही एक त्यांच्यासाठी संधी आहे (स्वत:ला लवकरात लवकर सुधरून घेण्यासाठीची)
Post a Comment