Halloween Costume ideas 2015

दिशादर्शक जमाअत-ए-इस्लामी हिंदची 75 वर्षे


ईश्वरी प्रसन्नता व परलोकाच्या सफलतेसाठी एकमेव अल्लाहचे आज्ञापालन करणे व ईश्वरी मार्गदर्शनाच्या आधारावर समाजामध्ये न्याय प्रस्थापित करण्याकरिता प्रयत्न करणे हा जमाअतचा उद्देश आहे. मानवाच्या वैयक्तिगत आणि सामूहिक जीवनामध्ये इस्लाम धर्म इतका प्रभावी झाला पाहिजे की व्यक्तीचा विकास, समाजाची पुनर्रचना आणि राष्ट्राची निर्मिती या सर्व गोष्टी न्यायसंगत व्यवस्थेला अनुरूप व्हाव्यात.


माअत-ए-इस्लामी हिंद ही भारतातील एक देशव्यापी धर्माधारित वैचारिक व सामाजिक चळवळ आहे.  या संघटनेची स्थापना 26 ऑगस्ट 1941 रोजी पंजाब प्रांताच्या पठाणकोट शहरात झाली. स्वातंत्र्यानंतर जमाअत-ए-इस्लामी हिंदची पुनर्रचना अधिकृतपणे 16 एप्रिल 1948 रोजी उत्तर प्रदेशातील अलाहाबाद येथे एका बैठकीत करण्यात आली. या संघटनेची एक लिखित घटना (संहिता) आहे आणि विशिष्ट अशी कार्यप्रणालीसुद्धा आहे. जमाअतचे मुख्यालय नवी दिल्लीत आहे. देशबांधवांसाठी या संघटनेचा संदेश आणि सर्वसमावेशक सेवा सर्वपरिचित आहेत. सन 2023 मध्ये जमाअत-ए-इस्लामी हिंद आपल्या स्थापनेचा अमृतमहोत्सव साजरा करत आहे.

उद्देश 

ईश्वरी प्रसन्नता व परलोकाच्या सफलतेसाठी एकमेव अल्लाहचे आज्ञापालन करणे व ईश्वरी मार्गदर्शनाच्या आधारावर समाजामध्ये न्याय प्रस्थापित करण्याकरिता प्रयत्न करणे हा जमाअतचा उद्देश आहे. मानवाच्या वैयक्तिगत आणि सामूहिक जीवनामध्ये इस्लाम धर्म इतका प्रभावी झाला पाहिजे की व्यक्तीचा विकास, समाजाची पुनर्रचना आणि राष्ट्राची निर्मिती या सर्व गोष्टी न्यायसंगत व्यवस्थेला अनुरूप व्हाव्यात.

कार्यक्षेत्र 

जमाअत-ए-इस्लामी हिंदच्या कार्यक्षेत्रात आध्यात्मिक उत्थान, सामाजिक विकास, आंतरधर्मीय सलोखा, मूल्याधारित राजकारण, न्यायनिष्ठ अर्थव्यवस्था, धोरणात्मक जीवनव्यवस्थेचा समावेश आहे.

कार्यपद्धती 

1. जमाअतच्या कार्याचा मूळ आधार कुरआन व पैगंबर मुहम्मद (स.) यांचे आदेश व त्यांची व्यावहारिक उदाहरणे आहेत.

2. जमाअत आपल्या सर्व कार्यात संवैधानिक, कायदा एवढेच नव्हे तर नैतिक मर्यादांचे सुद्धा पालन करते आणि अशा माध्यमांचा व अशा पद्धतींचा कधीच उपयोग करत नाही ज्या सत्याच्या आणि प्रामाणिकपणाच्या विरुद्ध आहेत अथवा ज्यांच्यामुळे जातीय द्वेष, वर्गकलह व उपद्रव निर्माण होईल.

3. जमाअत आपल्या ध्येयप्राप्तीसाठी रचनात्मक आणि शांततापूर्ण पद्धतींचा अवलंब करते. म्हणजे ती प्रचाराने, प्रबोधनाने व विचारांच्या प्रसाराने मन व चारित्र्य परिवर्तन करते व अशा पद्धतीने देशाच्या सामुदायिक जीवनात बदल घडवून आणण्यासाठी लोकांना प्रेरित व प्रशिक्षित करते.

जमाअतचे योगदान 

गेल्या 75 वर्षांत जमाअत-ए-इस्लामी हिंद ने विविध सामाजिक क्षेत्रांत मोलाचे योगदान दिलेले आहे. समाजातील दुर्बल आणि उपेक्षित घटकांकरिता सामाजिक आणि आर्थिक न्याय व समानता प्रस्थापित करण्याकरिता जमाअत प्रयत्नशील आहे. देशात आंतरधर्मीय संवाद आणि चर्चेला चळवळीचे स्वरूप हा जमाअतचे मुख्य योगदान आहे.

विभिन्न समुदायांमध्ये अधिक चांगला समन्वय स्थापित करून शांतता प्रस्थापित करण्याकरिता इस्लाम सर्वांसाठी, पैगंबर मुहम्मद सल्लम सर्वांसाठी, अंधारातून प्रकाशाकडे असे विविध राष्ट्रीय पातळीवर अभियान राबविण्यात आले, ज्यात समाजातील विविध धर्मीय मान्यवरांपासून सर्व क्षेत्रांतील लाखो लोकांचा सहभाग लाभला.

शैक्षणिक कार्य 

आपल्या स्थापनेपासून जमाअत शिक्षण सुलभ आणि अनिवार्य करण्यासाठी वचनबद्ध आहे. चांगल्या शिक्षणाचे महत्त्व आणि विशेषत: आपल्या शिक्षणपद्धतीत नैतिक मूल्यांचा अभाव लक्षात घेऊन जमाअत आपल्या स्थापनेपासून हे कार्य अत्यंत गांभीर्याने पार पाडत आहे. जमाअतने अनेक मुस्लिमांना अशा शैक्षणिक संस्था स्थापन करण्यासाठी प्रेरित केले जे सामाजिक आणि राष्ट्रीय विकासात योगदान देत आहेत. देशभरात 1200 हून अधिक शाळा जमाअतच्या व्यवस्थापनाअंतर्गत चालतात.

महाराष्ट्रातील शैक्षणिक सेवा 

शैक्षणिक क्षेत्रात जमाअततर्फे महाराष्ट्र राज्यात 26 प्राथमिक शाळा; 13 हायस्कूल, 1 तंत्रशिक्षण संस्था स्थापन करण्यात आल्या असून शेकडो विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व शैक्षणिक करिअर मार्गदर्शन करण्याचे कार्य सुरू आहे.

सामाजिक कार्य 

मानवतेची सेवा करणे हा इस्लामिक शिकवणीचा एक महत्त्वाचा पैलू आहे. जमात-ए-इस्लामी हिंद स्थापनेच्या पहिल्या दिवसापासून गरिबी, आरोग्य, निरक्षरता, उपासमार आणि बेरोजगारी निर्मूलन यांसारख्या सामाजिक कार्यात व्यस्त आहे. त्याचप्रमाणे पूर, दुष्काळ, भूकंप, मानवनिर्मित किंवा नैसर्गिक आपत्ती, महामारी किंवा जातीय दंगली यांसारख्या कठीण परिस्थितीत सर्वधर्मीय पीडितांची सुटका आणि पुनर्वसन करण्यात तत्पर आणि सक्रिय भूमिका बजावत आहे. ही सर्व कामे आयडिअल रिलीफ कमिटी ट्रस्ट, महाराष्ट्र (खठउढ) तर्फे केली जातात. जमाअतने यासाठी हे विशेष ट्रस्ट बनविलेले आहे. याशिवाय राज्यातील गरजवंतांना सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक मदत पुरवणारी ही एक नोंदणीकृत संस्था आहे. गरजू आणि वंचितांना स्वावलंबी बनवण्यासाठी भारतातील विविध स्वयंसेवी संस्थांशी जमाअत समन्वय साधते. आपल्या कार्यकर्त्यांना गरीब भागातील समस्या सोडवण्यासाठी आणि अशा भागात मूलभूत गरजा पुरवण्यासाठी प्रयत्न करण्यास प्रोत्साहित करते.

समाजसेवा 

जमाअते इस्लामी हिंद महाराष्ट्र तर्फे 2021-22 मध्ये राबविण्यात आलेले काही ठळक उपक्रम पुढीलप्रमाणे आहेत.

 नैसर्गिक आपत्तीमधील योगदान  

कोकणातील पूरग्रस्तांना 49 लाख रुपयांची तात्काळ मदत; पुनर्वसनाकरिता 60 लाख रुपये; घरांच्या दुरुस्तीकरिता 30 लाख रुपयांची मदत करण्यात आली.

कोविड-19 च्या काळात मदत कार्य 

नागपूर आणि मुंबईमध्ये कोविड सेंटर- 50 लाख रुपये खर्च करून उभे केले. 5.9 कोटी रुपयांचे अन्नधान्य पाकिटे लोकांमध्ये वाटली, 2800 लोकांना ऑक्सिजन सिलिंडर पुरवण्यात आले, विधवा, अनाथ व गरजू कुटुंबाना मासिक रेशनसाठी 36 लाख रुपये खर्च करण्यात आले.

वैद्यकीय सेवा  

महाराष्ट्रात 6 मेडिकल गाईडन्स सेंटर्सद्वारे 4020 लाभार्थींना मदत केली. 23 रुग्णालये / दवाखान्यांद्वारे शेकडो रुग्णांचा पूर्ण उपचार, वैद्यकीय मदत 10.6 लाख रुपये, सरकारी योजने अंतर्गत 2.5 कोटी रुपयांची गरजूंना मदत करण्यात आली, 5 निदान केंद्रे, 2 मोबाईल मेडिकल व्हॅन्स कार्यरत करण्यात आल्या. मोबाईल मेडिकल व्हॅनने जळगाव जिल्यात 58 गावातील 4500 आदिवासी रुग्णांच्या उपचार केला गेला.

जमाअत-ए-इस्लामी हिंद, महिला विभाग  

जमाअत महिलांचा सन्मान, त्यांना योग्य दर्जा आणि महिला सक्षमीकरणावर विश्वास ठेवते. अगदी सुरुपातीपासून जमाअतच्या सर्व उपक्रमांमध्ये महिला सक्रिय आहेत आणि आपल्या समाजाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. राष्ट्रीय स्तरावर महिला सचिव उपक्रमांचे आयोजन करतात तर राज्य आणि स्थानिक स्तरावर महिला संघटक आपली जबाबदारी पार पाडतात. राष्ट्रीय आणि राज्य प्रतिनिधीमंडळांमध्ये महिलांसाठी राखीव जागा आहेत.

राष्ट्रीय स्तरावर आयोजित महिलांसाठीचे काही ठळक उपक्रम 

’मजबूत कुटुंब मजबूत समाज’ या विषयावर महिला विद्वानांचा आंतरधर्म-संवाद. महिला कार्यकर्त्या, राजकारणी आणि विचारवंत यांच्याबरोबर चर्चासत्रांचे आयोजन, ‘स्वतंत्र भारतात महिलांची दशा’ राष्ट्रीय निषेध मेळावा, ’नारी का सन्मान, देश का अभिमान’ यावरील विशेष उपक्रमाचे आयोजन.

 ‘महिलांसाठी समानता पुरेसे नाही’ या विषयावर महिला दिनाच्या पूर्वसंध्येला जमात ए इस्लामी हिंद महिला विंगतर्फे राष्ट्रीय वेबिनारचे आयोजन.

स्त्रियांवरील वस्तुनिष्ठता आणि हिंसा 

- सांस्कृतिक विनियोगाचे नवीन मानक यावरील वेबिनारचे आयोजन. महिलांकरिता इंग्रजी मासिक ‘औरा’ आणि उर्दू ई-मासिक ’हादिया’चे नियमित प्रकाशन सुरू आहे. ही दोन्ही मासिके इंटरनेटवर उपलब्ध आहेत. हे महिलांमध्ये नैतिक मुल्यांच्या संवर्धनामध्ये महत्त्वाचे योगदान देत आहेत. 

जेआयएच महाराष्ट्र, महिला विभाग आयोजित काही ठळक उपक्रम 

 घरगुती उद्योजक कार्यशाळा,

 कौटुंबिक समुपदेशनावर वेबिनार

 5 शहरांमध्ये महिला सद्भावना मंच 

 मोफत वैद्यकीय शिबिर

जेआयएच महाराष्ट्र बरोबर सहकार्य करणाऱ्या विविध संस्था  

धार्मिक जन मोर्चा- समुदायासमुदायांतील दरी कमी करण्यात आणि त्यांच्याशी संवाद घडवून आणण्यासाठी स्थानिक पातळीवर सद्भावना मंच महाराष्ट्रासह भारतातील विविध राज्यात कार्यरत आहे. 

इस्लामिक मराठी पब्लिकेशन ट्रस्ट, मुंबई (आयएमपीटी) 

सर्व मराठी भाषिकांसाठी इस्लामची खरी ओळख व्हावी, त्यांंच्यातील इस्लामसंबंधीचे गैरसमज दूर व्हावेत आणि सत्य त्यांच्या समोर यावे हे इस्लामिक मराठी पब्लिकेशन ट्रस्ट, मुंबई च्या प्रकाशित पुस्तकाचे उद्देश आहे. पवित्र कुरआनचे मराठी भाषांतर ’दिव्य कुरआन’ या नावाने आयएमपीटी या संस्थेतर्फे प्रकाशित करण्यात आलेले आहे. कुरआनचे स्पष्टीकरण तसेच पैगंबर मुहम्मद (स.) यांची वचने, पैगंबरांचे जीवनचरित्र व इस्लामच्या विविध विषयांवर नामवंत लेखकांची सुमारे 280 पुस्तके मराठी भाषेत प्रकाशित झालेले आहेत.

साप्ताहिक शोधन 

मुंबईहून प्रकाशित होणारे, मानवकल्याण व जीवनाच्या विविध पैलूंमध्ये मार्गदर्शन करणारे मराठी साप्ताहिक शोधन. ताज्या व ज्वलंत घडामोडींचे सामाजिक बांधिलकीने आणि सत्य परिस्थितीनुरुप विश्लेषण सादर करणे, तळागाळातील सर्व समाजांच्या समस्यांना वाचा फोडणे, तसेच मुस्लिमेतर बांधवांसमोर इस्लामी शिकवण सरळ आणि सोप्या भाषेत सादर करणे आणि मुस्लिम व इस्लामबद्दल त्यांच्या मनात असलेले गैरसमज दूर करणे हा शोधनचा मुख्य हेतू आहे. त्यामुळे गेल्या 50 वर्षांपासून हे नियतकालिक आवाज नसलेल्यांचा आवाज बनला आहे.

राहत बिनव्याजी क्रेडिट को-ऑपेराटिव्ह सोसायटी 

राज्यात 14 ठिकाणी विनाव्याज क्रेडिट को-ऑपेराटीव्ह सोसायटी कार्यरत आहेत; वार्षिक उलाढाल 292 कोटी रुपये; 12500 लाभार्थींना 52.5 कोटी रुपये विनाव्याज कर्ज देण्यात आले.

रिफा चेंबर ऑफ कॉमर्स : उद्योग-धंदे, व्यवसाय यांच्या मार्गदर्शनासाठी रिफा चेंबर ऑफ कॉमर्सची स्थापना करण्यात आलेली असून, 96 व्यापाऱ्यांना याद्वारे लॉजिस्टिक आणि अर्थसहाय्य करण्यात आले.

फोरम फॉर डेमोक्रसी अँड कम्युनल मिटी

 लोकशाही मूल्ये व जातीय सलोखा राखण्याच्या उद्देशाने देशातील विविध घटकांना जोडण्याकरिता आणि कायदेशीर लढा देण्यासाठी फोरम फॉर डेमोक्रसी अँड कम्युनल मिटी मोठी भूमिका राबवित आहे. हा ही जमाअतचा उपक्रम आहे. 

मूव्हमेंट फॉर पीस अँड जस्टीस (MPJ)  

जमाअते इस्लामी हिंद महाराष्ट्र विभागाने सर्वसामान्य जनतेच्या न्याय्य हक्कांसाठी ’मूव्हमेंट फॉर पीस अँड जस्टीस’ (एम.पी.जे.)ची स्थापना केली असून, ती अतिशय प्रभाविपणे कार्यरत आहे. कुठलाही धर्मभेद न बाळगता सर्व गरीबांसाठी विविध शासकीय योजनांचा मिळवून देणे. असंघटित मजुरांना किमान वेतन तसेच आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी त्यांच्यात काम करते. सध्या एमपीजे राशनसंबंधी जनजागृती अभियान राबवित आहे. 

असोसिएशन फॉर प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट्स (एपीसीआर) 

 जमाअतने स्थापित केलेल्या नोंदणीकृत राष्ट्रपातळवरील संस्थेद्वारे देशाचे संविधान, मुलभूत हक्क, कर्तव्य व कायदेविषयक जागरूकता निर्माण करण्याच्या हेतूने काम करते. तसेच निष्पाप पीडितांना आणि समाजातील दुर्बल घटकांना कायदेशीर मदत आणि इतर समर्थन प्रदान करण्याची जबाबदारी पार पाडते.

स्टुडंट्स इस्लामिक ऑर्गनायजेशन ऑफ इंडिया : हा विद्यार्थी आणि तरुणांचा एक मंच आहे आणि 40 वर्षांपासून कॉलेज आणि कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मुल्य संवर्धन आणि सर्वांगीण विकासासाठी कार्यरत आहे,

गर्ल्स इस्लामिक ऑर्गनायजेशन (जीआयओ) 

ही विद्यार्थिनींची संस्था आहे जी सतत तरूण मुली विशेषतः महाविद्यालय आणि विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये मुलींमध्ये नैतिक मुल्यांचे संवर्धन व शैक्षणिक उन्नतीसाठी काम करत आहे.

ऑल इंडिया आयडिअल टीचर्स असोसिएशन (आयटा) : जमाअतने स्थापन केेलेल्या या संस्थेचे देशभर पसरलेले असून, ही शिक्षकांची राष्ट्रीय संघटना आहे. जी शिक्षकांमध्ये त्यांच्या कार्यक्षमतेचा विकास व्हावा,  ते अधिक सक्षम व्हावेत यासाठी वेगवेगळे प्रशिक्षण सत्र चालवणे व त्यांना प्रोत्साहित करण्यामध्ये महत्त्वाची भूमीका बजावते. 

विविध उपक्रम 

उपरोक्त ध्येय साध्य करण्यासाठी जमाअत-ए-इस्लामी हिंद महाराष्ट्र भर व्यक्तिगत संपर्क, भेटीगाठी, अभ्यासवर्ग, साप्ताहिक सभा, जाहीर व्याख्याने, परिसंवाद, ईद मिलन, मस्जिद परिचय इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करते.

जमाअतची धारणा आहे की संवाद आणि चर्चेद्वारे विविध समुदायांमध्ये शांतता प्रस्थापित व्हावी. जमाअतने नेहमीच समविचारी लोक, नागरी समाज आणि मानवाधिकार गट, एनजीओ आणि शांतता व जातीय सलोख्यासाठी काम करणाऱ्या संघटनांच्या मदतीने न्याय हक्कासाठी संधर्ष केला आहे. हजारो सदस्य, स्वयंसेवक आणि लाखो समर्थक ही जमात-ए-इस्लामी हिंदची खरी प्रेरकशक्ती आहे.

संपर्क : Jamaat e Islami Hind

Halqa Maharashtra

701 – 704, Darul Faiz ,Near

Arab Masjid, 4th Sankli Street,

Madanpura, Byculla West,

Mumbai-400008

Email: office@jihmaharashtra.org

Phone: +91-022-23082820 /

23052002/+91 93246 43826

Toll Free Call Centre No. 810-

810-5381 Websites: www.https://

jamaateislamihind.org,

www.jihmaharashtra.org

www.islamdarshan.org

www.impt.in

www.eshodhan.com

www.islamvision.in

Womens magazines:

https://auramag.in

https://haadiya.in


- इम्तियाज अहमद, पुणे


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget