Halloween Costume ideas 2015

होमिओपॅथी प्रभावी उपचारपद्धतीं...


10 एप्रिलला विश्व होमिओपॅथिक दिवस साजरा केला जातो. या पॅथिचे जनक जर्मन फिजिशियन डॉ.ख्रिश्चयन फेड्रिक सॅम्युअल हानेमान आहेत. यांचा जन्म 10 एप्रिल 1755 रोजी जर्मनीमध्ये झाला होता. त्यांच्या नावाने हा दिवस साजरा केला जातो. त्यांचे वडिल ख्रिश्चन गॉटफ्राईड हानेमान एक पोर्सलेन पेंटर होते. त्यांच्या आईचे नाव जोना ख्रिश्चयना होते. ते आपल्या आई-वडिलांचे तीसरे अपत्य होते. त्यांचे वडिल अत्यंत गरीब होते. ते सॅम्युअलची शालेय फी सुद्धा भरू शकत नव्हते. परंतु, सॅम्युअलच्या अचाट बुद्धीमत्तेमुळे त्यांना शालेय फीसमध्ये सूट दिली जायची. त्यांच्या शाळेचे नाव पिल्स स्कूल होते. त्यांनी आपले शिक्षक व्हॅन क्वारिन यांच्याकडून वैद्यकीय शिक्षण घेतले. त्यांना ब्रदर्स ऑफ मर्सी या रूग्णालयातून अभ्यासाची संधी मिळाली. ते आपल्या शिक्षकाबरोबर नेहमी रूग्ण पाहण्यासाठी जात होते. त्यामुळे त्यांचे प्रॅ्निटकल नॉलेज वाढले होते. त्यानंतर त्यांनी इर्लेगिन युनिव्हर्सिटी येथून आपली एम.डी. पदवी प्राप्त केली. 1779 ते 1792 दरम्यान त्यांनी आपली वैद्यकीय सेवा दिली. त्या दरम्यान, 17 नोव्हेंबर 1782 ला त्यांनी जॉहन्ना लिओपोल्डाईन हॅनरएट कुचलर हिच्याशी विवाह केला. डॉ. हानेमान आपल्या वैद्यकीय सेवेसंबंधी संतुष्ट नव्हते. कारण अ‍ॅलोपॅथिक औषधांचे साईड इफे्नट फार होते. 1796 मध्ये होमिओपॅथिचा जन्म झाला. त्याचे असे झाले की, डॉ. हानेमान हे कुलिन्स मॅटेरियामेडिका या पुस्तकाचे भाषांत करत होते तेव्हा त्यांना  सिनकोना बार्क हे मलेरियामध्ये उपयुक्त आहे असे आढळून आले.  होमिओपॅथीचा एक नियम आहे की सीमिलीया सीमीलीबस क्युरेंटर लाईक क्युअर्स लाईक. होमिओपॅथिला 1811 ते 1822 मध्ये डावलले गेले. 48 वर्षाच्या आनंददायी वैवाहिक जीवनानंतर 31 मार्च 1830 मध्ये डॉ. हानेमानच्या पत्नीचा मृत्यू झाला. जी त्यांच्या 11 मुलांची आई होती. डॉ.हानेमान यांनी आपल्या जीवनात स्वतःवर आणि आपल्या मुलांवर  औषधांचे प्रयोग केले आणि आज दोन हजार पेक्षा जास्त औषधी होमिओपॅथिला दिली. 2 जुलै 1834 ला पॅरिसमध्ये त्यांचा मृत्यू झाला. होमिओपॅथिमध्ये माणसाला एक पूर्ण व्यक्तीमत्व समजले जाते आणि पूर्ण व्यक्तीचा विलाज केला जातो. उदा. एका विद्यार्थ्याला जास्त डोकेदुखी झाली ती अभ्यासामुळे झाली का ती पडल्यामुळे झाली, प्रवासामुळे झाली. कशामुळे डोकेदुखी झाली, याचा शोध घेतला जातो. मुलं जेव्हा त्रास देतात तेव्हा आईला जी डोकेदुखी होते, मानसिक तणाव होतो, त्यामुळे वेगळ्या प्रकारची डोकेदुखी होते. शारीरिक थकव्यामुळे होणारी डोकेदुखी वेगळी असते. ताप आल्यामुळे होणारी डोकेदुखी वेगळी असते. थोडक्यात कशामुळे डोकेदुखी होत आहे की, वातावरण बदलल्यामुळे डोकेदुखी होत आहे. भीतीमुळे तर डोकेदुखी होत नाही. नाक बंद झाल्यामुळे तर डोकेदुखी होत नाही, अर्ध शिषीमुळे तर डोकेदुखी होत नाही. या सर्वांचा शोध घेऊन कारण निश्चितीकरून औषधोपचार केला जातो. महेंद्रलाल सरकार भारतातील पहिले होमिओपॅथी डॉ्नटर होत. कलकत्ता होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजची स्थापना 1881 ला त्यांनी केली. जागतिक आरोग्य संघटनेच्या अनुसार होमिओपॅथी जगातली दुसऱ्या क्रमांकाची पॅथी आहे. पहिल्या क्रमांकावर अ‍ॅलोपॅथी आहे. होमिओपॅथी ही भविष्याची पॅथी ही म्हणविली जाते. कारण लोक अ‍ॅलोपॅथीच्या दुष्परिणामामुळे बेजार होऊन होमिओपॅथीकडे वळत आहेत. आपल्या देशाला होमलँड ऑफ होमिओपॅथी म्हटले जाते. याचे कारण दोन लाखांपेक्षा जास्त होमिओपॅथिक डॉ्नटर रात्रंदिवस आपली सेवा प्रदान करत आहेत. ही संख्या जगात सगळ्यात जास्त आहे. होमिओपॅथी जुनाट आजारांवर विशेष करून प्रभावशाली ठरते. त्यामुळे लोक सुद्धा जुनाट रोगांमध्येच विशेषकरून या पॅथीमध्ये विलाज करून घेण्यासाठी प्राधान्य देतात. एक फारच महत्त्वाचा गैरसमज असा की, होमिओपॅथिक इलाजाचा गुण हळूहळू येतो. परंतु, असे नाही. खरे उपचार झाले तर त्याचे परिणामही तात्काळ दिसून येतात. होमिओपॅथी आता काही लोकांची इलाज करण्याची पद्धत राहिलेली नसून हळूवार पद्धतीने मात्र प्रभावशाली विलाज होतो. यात बारिक आकाराच्या गोड गोळ्या दिल्या जातात. ज्यांना सामान्य भाषेत शाबुदान्यासारख्या गोळ्या म्हटले जाते. कारण या गोळ्या साबुदान्यासारख्याच दिसतात. लहान मुलं सुद्धा या पॅथीद्वारे विलाज करून घेण्यामध्ये आनंद मानतात. जे विद्यार्थी नीटमध्ये कमी गुण प्राप्त करतात त्यांना वैफल्यग्रस्त होण्याची गरज नाही. त्यांना एमबीबीएसची सीट जरी नाही मिळाली तरी बीएचएमएसचे चांगले ऑप्शन आहे. यात करीअर करून ते यशस्वी वैद्यकीय अधिकारी म्हणून नावारूपाला येवू शकतात. भविष्यात याच पॅथीकडे उगवती वैद्यकीय उपचार पद्धती म्हणून पाहिली जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या पॅथीकडे दुर्लक्ष करू नये.  


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget