एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार मोहन भागवत यांनी हरियाणा राज्यातील एका हॉस्पिटलचे उद्घाटन करताना आपल्या भाषणात असा दावा केला की, ब्रिटिश राज्याच्या आगमनापूर्वी आपल्या देशातील 70 टक्के नागरिक सुशिक्षित होते, बेरोजगारी नव्हती. याच काळात इंग्लंडमध्ये फक्त 17 टक्के लोक सुशिक्षित होते. इंग्रजांनी भारताची शिक्षण प्रणाली आपल्या देशात रुजवली आणि आपली शिक्षण प्रणाली आमच्या देशात लागू केली आणि म्हणूनच इंग्लंडमधील 70 टक्के लोक साक्षर झाले आणि आपली साक्षरतेची टक्केवारी 17 टक्के वर आली.
1707 इसवीसन हा औरंगजेबाचा काळ होता. इंग्लंडमधील एक धर्म गुरु (पादरी) विलियम अॅडम हे1818 साली भारतात आले. तत्कालीन गव्हर्नर जनरल लॉर्ड विलियम बेन्टिक यांच्या आदेशानुसार भारतीय उपमहाद्विपामध्ये शिक्षण क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी विलियम यांनी बंगाल आणि बिहार मधील शिक्षण व्यवस्थेचे सर्वेक्षण केले. त्यांनी आपल्या सर्वेक्षणाच्या अहवालानुसार हे मान्य केली की बंगाल आणि बिहार मधील जवळपास 1 लाख शाळांमधून भौतिक शिक्षण दिले जात होते. शाळेला जाण्योग्य प्रत्येक 32 मुलांसाठी एक शाळा होती. नलतूर ज्या राजशाहीची लोकसंख्या 129640 होती तिथे दोन प्रकारच्या शिक्षणाची सोय होती. एक प्रकारच्या शाळेत आधुनिक शिक्षण दिले जात होते आणि दुसऱ्या प्रकारात घरच्या घरी शिक्षण देण्याची सोय होती. यात एक शिक्षक घरातल्या समस्त कुटुंबाला एकाच वेळी शिक्षण देत होता. आधुनिक शिक्षणाच्या शाळेमध्ये आठ वर्षे वयाच्या मुलांना दाखला दिला जात होता. पाच वर्षाच्या शिक्षणानंतर चौदाव्या वर्षी त्याचे सर्वांगीण शिक्षण झालेले असे. नलतूरमध्ये 12 शाळांमधून अरबी भाषेत शिक्षण दिले जायचे तर दहा बंगाली भाषेत आणि चार फारशी भाषेत शिक्षण मिळत होते. प्रत्येक मुलाला या तिन्ही पैकी कोणत्याही प्रकारचे शिक्षण घेण्याचे स्वातंत्र्य होते.
1822 ते 1826 इसवी सनाच्या काळात मद्रास प्रांतात शिक्षण व्यवस्थेची पाहणी करण्यात आली होती. या अहवालानुसार तिथल्या 12498 शाळांमधून 188650 विद्यार्थी शिक्षण घेत होते. असेच एक सर्वेक्षण मुंबई प्रांतात ही करण्यात आले होते. तिथे 30 विद्यार्थ्यांसाठी एक शाळा होती. पंजाबच्या बाबतीत शासकीय महाविद्यालय लाहोरचे प्राचार्य विलियम लाटेनज यांनी लिहिलेल्या ग्रंथानुसार प्रत्येक गावातील विद्यार्थ्यांची संख्या, शिकवले जाणारे विषय आणि शैक्षणिक दर्जा यांचा विस्तृत अहवाल उपलब्ध आहे. तिथे देखील शिक्षक घरोघरी जाऊन शिक्षण देत होते. एडवर्ड थॉमसन नावाचा ब्रिटिश साहित्यकाराने भारतातील बाजारपेठेंच्या बाबतीत जे लिखाण केले आहे त्यानुसार तो एक सभ्य समाज होता. थॉमसनच्या ग्रंथानुसार शाळेला जाऊन शकणारे गोरगरीब लोक सुद्धा लिहिण्या वाचण्यात अवगत होते. थॉमसन यांनी बऱ्याच बंगला भाषेतील पुस्तकांचे भाषांतर केले होते. तो लिहितो की बंगालच्या बाजारात लाखोंच्या संख्येने पुस्तकांची विक्री होत होती. शरदचंद्र चटर्जी लिखित देवदास या कादंबरीच्या दोन लाख प्रति विकल्या होत्या.
महाविद्यालय आणि विद्यापीठांचे भले मोठे जाळे पसरलेले होते. 1820 ते 1822 या काळात मुंबई प्रांताचे सर्वेक्षण केले गेले त्यावेळी ही माहिती समोर आली की, मुंबई येथे 222 महाविद्यालये आणि विद्यापीठे अस्तित्वात होती. अहमदनगरमध्ये 16 महाविद्यालये, पुणे शहरात 164 महाविद्यालये होती. तसेच मद्रास प्रांतात उच्च शिक्षणाचे 1109 महाविद्यालये होती. सर्वात जास्त कॉलेज राजमुद्रामध्ये होते 137, तंजावूर मध्ये 109, या 5431 महाविद्यालयांमध्ये तत्त्वज्ञान, खगोलशास्त्र, काव्य, वैद्यकीय शिक्षण, बांधकाम आणि शस्त्रास्त्रे निर्मितीची शिक्षण दिले जात होते. क्रोशियाचा एक साहित्यकार दी बारलेटो रोमियो याने 1798 मधील भारतीय शिक्षण व्यवस्थेला त्या काळातील जगातील सर्वोत्तम व्यवस्था म्हटले आहे. त्याच्या मते या काळात भारतात अशा विषयांचे शिक्षण दिले जात होते ज्याची कल्पना देखील युरोपमध्ये केली जाऊ शकत नव्हती.
मुस्लिम बादशहांनी शिक्षणाच्या उच्चवर्णीय आणि राजघराण्यांच्या सीमा ओलांडून सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवले होते. ज्यावेळी इंग्रजांनी बंगालमध्ये जातीय व्यवस्थेवर आधारित शिक्षणाचे सिलेक्शन केले तर हे तथ्यसमोर आले की तिथे एकंदर 1 लाख 75 हजार 89 हिंदू विद्यार्थ्यांपैकी केवळ 24 टक्के उच्चवर्णीय विद्यार्थी होते. 42 हजार 502 ब्राह्मण, 19669 वैष्य आणि 85400 विद्यार्थी क्षुद्र होते. टिपू सुलतान यांच्या शिक्षण व्यवस्थेत 65 टक्के शूद्र विद्यार्थी होते. इंग्रजांनी दिल्ली पूर्वी बंगाल, बिहार, ओडीसा, मद्रास, मैसूर आणि पंजाब वगैरे प्रांतात आपली सत्ता स्थापन केली होती. मोहन भागवत यांच्या म्हणण्यात हे तथ्य आहे की भारतातील शिक्षण व्यवस्थेला इंग्रजांनी आपल्या देशात स्थापन केले. 1920 मध्ये संबंध ब्रिटिश देशात केवळ 500 शाळा होत्या . आणि तेथे फक्त आणि फक्त उच्चवर्णीय लोकांना शिक्षण दिले जात होते. दुसरीकडे सतराव्या आणि अठराव्या शतकातील मोगल भारतामध्ये शाळा महाविद्यालये आणि त्यामध्ये सर्वांना दाखला दिला जात होता.
1802 वर्षीच्या पील्स कायद्यानुसार सर्व मुलांना वाचणे-लिहिणे आणि गणिताचे शिक्षण घेणे सक्तीचे झाले. जोसेफ लिंकस्टर आणि अँड््रयू बेल यांनी भारताच्या शिक्षण व्यवस्थेच्या धरतीवर शिक्षण व्यवस्था सुरू केली. 1801 मध्ये इंग्लंडमध्ये 3363 शाळा आणि 41 हजार विद्यार्थी होते. त्याच काळात भारतात लक्षावधी शाळा होत्या. 1818 इसवी सणामध्ये त्या संख्येत वाढ होऊन 674883 इतकी झाली आणि 1851 साली 21 लाख 44 हजार 377 झाली आणि विद्यार्थ्यांची संख्या 46 हजार 114 इतकी होती. इंग्रजांमधील ही क्रांती भारतात प्रचलित शिक्षण व्यवस्थेला आपल्याकडे लागू केल्यावर झाली. भारतात त्यावेळी या शाळांमधून धार्मिक आणि ऐहिक दोन्ही शिक्षणाचा समावेश होता. हदिस आणि कुराण बरोबरच तर्कशास्त्र, तत्वज्ञान, गणित, भूमिती, बीजगणित, वैद्यकशास्त्र, व्याकरण साहित्य आणि बांधकामाचे विषय शिकविले जात होते. या शाळांमधून शिकलेले विद्यार्थी न्यायव्यवस्था, शासकीय सेवा, आरोग्य, शिक्षण क्षेत्र आणि बांधकाम या विभिन्न क्षेत्रामध्ये आपली सेवा देत होते. त्याचबरोबर प्रत्येक विद्यार्थी स्वतःच्या धर्माचे शिक्षण घेत असायचे. ओरिया मकबूल जान यांच्या संशोधनानुसार मुघल राजवटीत शहा अब्दुर्ररहीम यांनी शिक्षण व्यवस्थेचा पाया घातला होता. त्याकाळी धार्मिक आणि ऐहिक शिक्षणात कोणताच फरक नव्हता. वेगवेगळ्या शाळा देखील नव्हत्या. प्रख्यात शिक्षण तज्ञ पुरूषोत्तम अग्रवाल यांनी मोहन भागवतांच्या मताशी सहमती दर्शविली असून त्यांची प्रशंसा केली आहे. अग्रवाल यांच्या मतानुसार भारतात शिक्षण व्यवस्था भक्कम होती. मक्तब आणि शाळांमध्ये धार्मिक शिक्षणाबरोबरच ऐहिक शिक्षण सुद्धा दिले जात होते. इंग्रज येण्यापूर्वी औरंगजेबाच्या काळात भारताचे सकल उत्पादन (जीडीपी) जगाच्या 24 टक्के होते. इंग्रज भारत सोडून जातांना ते 4 टक्क्यांवर आले होते.
- डॉ. सलीम खान
Post a Comment