मुंबई (प्रतिनिधी)
स्टुडंट इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया (एसआयओ) ने आज मुंबईत जन आक्रोश नाही तर जनसद्भाव मोहिमेला सुरुवात केली.एसआयओ पदाधिकारी आणि आमदार अबू असीम आझमी तसेच शहरातील प्रमुख नेत्यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना द्वेषाच्या अजेंड्याला विरोध करण्यावर भर दिला. गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्र राज्यभर ‘हिंदू जन आक्रोश मोर्चा’ या नावाने मोर्चांची मालिका आयोजित करण्यात आली आहे. या रॅलींनी ’लव्ह जिहाद’ ’लँड जिहाद’, ’जबरदस्तीचे धर्मांतर’ इत्यादी मुद्द्यांवर चिंता व्यक्त केली आहे. आणि मुस्लिम समाजावर आर्थिक बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आहे. या रॅलींमध्ये द्वेषपूर्ण भाषणे देण्यात आली आहेत. हे वेगळे सांगायची गरज नाही.
या रॅलींमुळे समाजावर होणारा परिणाम कमी करता येणार नाही. अशा प्रकारचे रॅलीमुळे जातीय सलोख्याला तडा जाऊन तणावाचे वातावरण निर्माण होते. हे कृत्य संवैधानिक मूल्ये आणि सामाजिक बंधुत्वाच्या विरोधात आहेत. तसेच ’लव्ह जिहाद’चा मुद्दा जो उजव्या विचारसरणीच्या गटांकडून सातत्याने उपस्थित केला
जात आहे. तो मुस्लिमांविरुद्ध द्वेष भडकवण्याकरीता वापरला जातो. सर्वोच्च न्यायालय आणि अनेक उच्च न्यायालयांनी अनेक प्रसंगी निरीक्षण नोंदविले आहे की ’लव्ह जिहाद’ हे काल्पनिक आहे आणि ’लव्ह जिहाद’च्या दाव्यांचे समर्थन करणारा कोणताही पुरावा नाही. मात्र तरीही या गटांकडून त्यांचा अजेंडा पुढे नेण्यासाठी आणि समाजात फूट निर्माण करण्यासाठी त्याचा वापर केला जात आहे.
जन आक्रोश नव्हे जनसद्भाव हा एसआयओचा उपक्रम ही काळाची गरज आहे. मी सर्व विद्यार्थी आणि युवा संघटनांना या मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा आणि सद्भावाच्या या संदेशाचा प्रचार करावा असे आवाहन करतो, असे कामगार युनियनचे नेते श्री विश्वास उटगी यांनी सांगितले.
अशा फुटीरतावादी आणि द्वेषपूर्ण मोहिमांमुळे दीर्घकाळात देशाचे नुकसान होईल. फुटीरता आणि द्वेषाच्या या मोहिमेला तोंड देण्यासाठी एस.आय.ओ. दक्षिण महाराष्ट्र झोन तर्फे एक विचार मंथन करण्यासाठी जन आक्रोश नव्हे जन सद्भाव नावाच्या या मोहिमेद्वारे विविध समुदायांमधील दरी भरून काढणे आणि विविध समाजात विश्वासाचे आणि सामंजस्याचे वातावरण निर्माण करणे हे संस्थेचे उद्दिष्ट आहे. प्रेम आणि एकतेच्या या संदेशाला प्रोत्साहन देण्यासाठी एस. आई. ओ विविध जिल्ह्यांमध्ये पत्रकार परिषदा, इफ्तार पार्टी आणि इतर उपक्रमांची मालिका आयोजित करीत आहे.
आमची अशी धारणा आहे की, द्वेष आणि फुटीरतेच्या अशा आक्रमणासमोर आपले मौन केवळ अनैतिक नाही तर अपवित्र देखील आहे. या फुटीर मोहिमेद्वारे एका समाजाला आवाहन केले जात आहे. जे किंबहुना सर्व धार्मिक आदर्शांच्या विरोधात आहे. आपल्या समाजात धर्माची खूप रचनात्मक भूमिका असते. सामाजिक एकोपा कोणत्याही देशाचा पाया असतो. तो निर्माण करण्यासाठी आणि सौहार्द वाढविण्यासाठी विधायक संवाद होणे गरजेचे आहे, द्वेषयुक्त भाषणे आणि हिंसाचार याला पर्याय असू शकत नाही. असे मत एस.आय.ओ.चे प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष एहतेसाम हामी खान यांनी नोंदविले.
Post a Comment