फादर हिलेरियन हेगी या ख्रिश्चन धर्मगुरून इस्लाम धर्म स्विकारल्याची बातमी 27 फेब्रुवारी 2023 ला आली आणि अमेरिकेसह युरोपमध्ये खळबळ उडाली. फादर हेगी एक लेख प्रकाशित करून आपण इस्लाममध्ये घरवापसी करत असल्याची घोषणा केली. त्यासाठी त्यांनी ‘रिटर्निंग टू द होम लँड’ असा वापरला. अमेरिकेमध्ये प्रभावशाली लोकांच्या इस्लाममध्ये होत असलेल्या धर्मांतरांमुळे चर्चांना उधान आलेले असून, आता धर्मगुरूही जर इस्लाम स्विकारत असतील तर काय होईल? असा प्रश्न लोक आपसात विचारत आहेत.
संत हिलेरियन हेगी यांनी स्पष्ट केलेले आहे की, त्यांनी आपले इस्लामी नाव सईद अब्दुल लतीफ असे ठेवलेले आहे. त्यांनी हे ही स्पष्ट केलेले आहे की, ’’मी अचानक धर्मांतर केलेले नसून गेल्या अनेक वर्षांपासून मी इस्लामचा अभ्यास करत होतो. फक्त इस्लाम स्विकारण्याचा क्षण आता आलेला आहे. माझा हा निर्णय विचारपूर्वक घेतलेला आहे आणि इस्लामशिवाय दूसरा सत्य धर्म नाही, असे माझे स्पष्ट मत आहे’’ त्यांनी प्रसिद्ध इंग्रजी कवी टी.एस. एलीयट यांच्या कवितेच्या ओळी उधृत करून म्हटलेले आहे की, ’’ श्रद्धेच्या बाबतीत मनावर कोणाची सक्ती चालत नाही. संत हिलेरियन हेगी यांचा जन्म हंग्रीमध्ये 1980 च्या दशकात झालेला असून, सध्या ते 40 वर्षांचे आहेत. त्यांनी 14 वर्ष चर्चमध्ये सेवा दिलेली असून, त्या दरम्यान ते नियमितपणे इस्लामवर टिका करायचे. ते कट्टर कॅथलिक होते. त्यांनी आपल्या फेसबुक पेजवर असे लिहिले आहे की, खरे तर इस्लामचे स्फुलिंग माझ्या मनामध्ये 20 वर्षापूर्वीच फुलले होते.’’ त्यांचा समावेश ख्रिश्चन जगाच्या आघाडीच्या धर्मगुरूमध्ये होत होता. ते आपल्या अगदी तरूण वयापासून धर्मगुरू म्हणून काम करत होते. आणि ते एक मीडिया फ्रेंडली व्यक्तीमत्व म्हणून ओळखले जात होते. त्यांनी पुढे लिहिलेले आहे की, एक व्यक्ती आपल्या सार्वजनिक जीवनामध्ये ख्रिश्चन धर्मगुरू म्हणून आणि वैयक्तिक जीवनामध्ये मुस्लिम म्हणून वावरू शकत नाही. त्यांनी सांगितले की, ’’कुरआनच्या अभ्यासामुळे ते इस्लामकडे वळले. कुरआनमध्ये जो मार्ग दाखविले आहे तोच मार्ग प्रेषित मोजेस, प्रेषित झिजस क्राईस्ट आणि प्रेषित अब्राहम अलै यांनी दाखविला होता आणि त्याच परंपरेची अंतिम कडी प्रेषित मुहम्मद सल्ल. आहेत. याचा मला विश्वास झाला. शिवाय, इस्लाममध्ये ईश्वरासमोर सरेंडर (लीन) होणे हे तुमच्या इच्छेवर अवलंबून नाही किंवा ते कुठल्या संताच्या, ईशदुताच्या किंवा इतर लोकांच्याही ईच्छेवर अवलंबून नाही. ते फक्त ईश्वरी इच्छेवर आहे. त्यासाठी त्यांनी सुरे आराफच्या आयत नं. 172 चा संदर्भ दिला आहे. ‘‘आणि हे नबी (स.), लोकांना आठवण करून द्या त्या प्रसंगाची जेव्हा तुमच्या पालनकर्त्याने आदमच्या संततीच्या पाठीतून समस्त मानवजातीला अस्तित्वात आणले होते आणि त्यांना स्वतः त्यांच्यावरच साक्षीदार ठरवीत विचारले होते, ’’काय मी तुमचा पालनकर्ता नाही?’’ त्यांनी सांगितले, ’’निश्चितच आपण आमचे पालनकर्ता आहात, आम्ही याची ग्वाही देतो,’’ हे आम्ही याकरिता केले की एखादे वेळी पुनरुत्थानाच्या दिवशी असे सांगू नये की, ’’आम्ही तर या गोष्टीपासून अनभिज्ञ होतो.’ (सुरे आराफ 7: आयत नं. 172)
Post a Comment