विविध समाजांमध्ये परस्पर सांस्कृतिक माहितीची देवाणघेवाण व्हावी, हा या पुस्तकाचा उद्देश असल्याची माहिती प्रकाशनाच्या संचालिका बुशरा नाहिद यांनी दिली.
कन्नड (प्रतिनिधी)
उर्दू भाषिक मुस्लिम समाजाला मुस्लिमेतर बहुजन समाजातील विविध जाती, उपजाती, आदिवासी टोळ्या, त्यांची संस्कृती, त्यांची विचारधारा, विचारप्रवाह, आवडी निवडी इत्यांदींविषयी माहिती व्हावी, याकरिता ज्येष्ठ पत्रकार, इस्लाम अभ्यासक नौशाद उस्मान यांनी 104 पानांचं उर्दू भाषेत पुस्तक लिहिलं असून याचे नाव ’ज़ातपात का निज़ाम : ताअर्रूफ और रवाबीत की अमली शकलें’ असे आहे. सदर पुस्तकाचे प्रकाशन कन्नड येथील नुर ए मस्जिदीजवळील मैदानात जमाअत ए इस्लामी हिंदच्या एकदिवसीय जिल्हा मेळाव्यात जमाअतचे प्रदेशाध्यक्ष मा. रिज़वान उर रहमान खान यांच्या हस्ते करण्यात आले. ग्लोबल लाइट पब्लिशरतर्फे प्रकाशित या आगळ्यावेगळ्या पुस्तकाची किंमतदेखील 100 रुपये अशी माफक ठेवण्यात आली आहे.
प्रकाशनावेळी जमाअतच्या दिल्ली येथील केंद्रीय कार्यकारिणीचे पदाधिकारी मा. प्रा. अजिज़ मुहियुद्दीन, जमाअतचे प्रदेश उपाध्यक्ष मा. मौलाना इलियास फलाही, जमाअतचे जिल्हा संघटक मा. तौफिक सय्यद, लेखक नौशाद उस्मान, औरंगाबाद शहराध्यक्ष मा. वाजीद क़ादरी, जमाअतच्या केंद्रीय प्रतिनिधी मंडळाचे सदस्य मा. डॉ. जावेद मुकर्रम, जमाअतच्या सर्व युनीट्सचे सर्व स्थानिकाध्यक्ष, पदाधिकारी, जिल्हाभरातून आलेले कार्यकर्ते तसेच इतर स्त्री व पुरुष गावकरी मंडळी हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. यावेळी जमाअते इस्लामी हिंदचे पदाधिकारी, समाजबांधव उपस्थित होते.
Post a Comment