उर्दू माध्यमाची एक विद्यार्थिनी प्रथम वर्ग दंडाधिकारी झाल्याबद्दल अहमदनगर जिल्हा उर्दू साहित्य परिषदेतर्फे त्यांचे जिल्हाध्यक्ष सलीमखान पठाण, सचिव आबीद खान व जिल्ह्यातील सर्व उर्दू प्रेमींनी अभिनंदन केले आहे. या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
श्रीरामपूर (प्रतिनिधी)
: येथील बार असोसिएशनचे अॅड. वाय. के. शेख यांची कन्या व आर एम एस कॉम्प्युटरचे शब्बीर भाई शेख यांची सून अॅड. आसिया राही शेख या नुकत्याच उच्च न्यायालय, मुंबई व महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग यांनी घेतलेल्या न्यायिक सेवा परिक्षेत प्रथम वर्ग न्यायाधीश कनिष्ठ स्तर तथा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ही परिक्षा उत्तीर्ण होऊन त्यांची न्यायाधीशपदी निवड झाली आहे.
दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर तथा न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग पदाच्या परिक्षेतील 63 उमेदवारांची निवड यादी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत प्रसिद्ध करण्यात आली आहे. यात अॅड. आसिया शेख यांची निवड झाली आहे. आसिया यांचे प्राथमिक शिक्षण श्रीरामपुरातील अलमिजान उर्दू प्राथमिक शाळेत झाले. माध्यमिक शिक्षण येथीलच खासदार गोविंदराव आदिक उर्दू हायस्कूल मध्ये झाले तर बी एस एल एल एल बी चे शिक्षण श्रीरामपुरातीलच खासदार गोविंदराव आदिक लॉ कॉलेज येथे झाले. एलएलएम त्यांनी अहमदनगर येथील लॉ कॉलेजमधून पूर्ण केले. गेली सात वर्ष त्यांनी श्रीरामपूर कोर्टामध्ये वकिली केली आहे. कायद्याच्या अभ्यासात त्यांना वडील अॅड. वाय के शेख, चुलत बंधू, उच्च न्यायालयातील अॅड. मजहर जहागीरदार, पुणे येथील अॅड.गणेश शिरसाठ यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले तसेच सासरे शब्बीर भाई शेख व एमबीए असलेले पती राही शब्बीर शेख यांची मोलाची साथ त्यांना मिळाली.
Post a Comment