(४२) यांच्यापूर्वी जे लोक होऊन गेले आहेत त्यांनीदेखील मोठमोठाले डावपेच लढविले होते,६१ परंतु खरी निर्णायक युक्ती तर पूर्णपणे अल्लाहच्याच हातात आहे. तो जाणतो की कोण काय कमवीत आहे, आणि लवकरच हे सत्याचा इन्कार करणारे पाहतील की कोणाचा शेवट चांगला होतो.
(४३) हे इन्कार करणारे म्हणतात की तुम्हाला अल्लाहकडून पाठविलेले नाही, सांगा, ‘‘माझ्या व तुमच्या दरम्यान अल्लाहची ग्वाही पुरेशी आहे तसेच त्या प्रत्येक व्यक्तीची साक्ष ज्याला ग्रंथाचे ज्ञान आहे.’’६२
१४. इब्राहीम
(मक्काकालीन, एकूण ५२ आयती)
अल्लाहच्या नावाने, जो असीम दयावंत व परम कृपावंत आहे.
(१) अलिफ, लाऽऽम, रा. हे मुहम्मद (स.)! हा एक ग्रंथ आहे जो आम्ही तुम्हावर अवतरित केला आहे, जेणेकरून तुम्ही लोकांना अंधाराच्या गर्तेतून काढून दिव्यप्रकाशाकडे आणावे, त्यांच्या पालनकत्र्याच्या इच्छेने जो जबरदस्त आणि स्वयंभू१ स्तुतीस पात्र आहे.२
(२) अल्लाह असमंतातील व पृथ्वीरील सर्व चराचरांचा स्वामी आहे. आणि अत्यंत कठोर विनाशकारी शिक्षा आहे सत्य स्वीकारण्यास नकार देणाऱ्याकरिता
६०) म्हणजे काय तुमच्या विरोधकांना दिसून येत नाही की इस्लामचा प्रभाव अरब भूभागाच्या कानाकोपऱ्यात फैलावत जात आहे. तसेच या लोकांसाठी चोहोबाजूने घेर कमी कमी होत आहे. ही त्यांच्यावर आलेल्या आपत्तीची निशाणी नाही तर काय आहे? अल्लाहचे सांगणे, `आम्ही या भूभागावर चालून येत आहोत.' ही एक अत्यंत सूक्ष्म वर्णनशैली आहे. सत्याचे आवाहन अल्लाहकडून होत आहे आणि अल्लाह त्यास प्रस्तुत करणाऱ्यांसोबत आहे. म्हणून एखाद्या भूभागात हा संदेश फैलावण्यास अल्लाह उपमा देतो की `आम्ही स्वत: त्या भूभागावर चालून येत आहोत.'
६१) म्हणजे आज ही काही नवीन गोष्ट नाही की सत्याच्या आवाजाला दाबण्यासाठी असत्य, धोका आणि अत्याचारांचे हत्यार वापरले जात आहेत. मानवी इतिहासात नेहमी अशाच युक्त्यांनी सत्य आवाहनाला पराजित करण्याचा प्रयत्न झालेला आहे.
६२) म्हणजे ती प्रत्येक व्यक्ती जी वास्तविकपणे आस्मानी ग्रंथांचे ज्ञान ठेवते, तो याची साक्ष देईल की जे काही मी प्रस्तुत करीत आहे ती तीच शिकवण आहे ज्याला पूर्वीचे पैगंबर घेऊन आले होते.
१) म्हणजे अंधारातून काढून प्रकाशात आणण्याचा अर्थ शैतानी रस्त्यांपासून हटवून अल्लाहच्या मार्गावर आणणे आहे. दुसऱ्या शब्दांत प्रत्येक तो मनुष्य जो अल्लाहच्या मार्गावर नाही तो खरे तर अज्ञानतेच्या अंधारात भटकत आहे. मग तो स्वत:ला कितीही प्रकाशमान विचारांचा का समजेना आणि त्याच्या दाव्यामध्ये कितीही ज्ञानप्रकाश झगमग करीत असेल. याविरुद्ध ज्याने अल्लाहचा मार्ग अवलंबिला आहे तो ज्ञानप्रकाशात आला मग तो अशिक्षित खेडूत का असेना.
नंतर असे सांगितले गेले की तुम्ही यांना आपल्या पालनकर्त्याच्या आदेशाने किंवा त्याच्या कृपेने अल्लाहच्या मार्गावर आणा. यात या वास्तविकतेकडे संकेत आहे की एखादा प्रचारक मग तो पैगंबर का असेना, सरळमार्ग दाखविण्याशिवाय दुसरे आणखी काही करू शकत नाही. एखाद्याला या मार्गावर आणणे त्याच्या अधिकारातील गोष्ट नाही. हे सर्व अल्लाहची मेहरबानी आणि त्याच्या परवानगीवर अवलंबून आहे. अल्लाह एखाद्याला प्रेरणा देतो तेव्हा तो मार्गदर्शन प्राप्त् करू शकतो, अन्यथा प्रेषितासारखा पूर्ण प्रचारक आपले पूर्ण जोर लावूनसुद्धा त्याला सरळमार्गावर आणू शकत नाही. अल्लाहच्या प्रेरणेविषयी त्याचा कायदा अगदी वेगळा आहे ज्याला कुरआनमध्ये विभिन्न स्थानांवर स्पष्ट रुपाने सांगितले गेले आहे. याने स्पष्ट होते की अल्लाहकडून मार्गदर्शन त्यालाच मिळते जो स्वत: मार्गदर्शनाची इच्छा उरी बाळगतो. आग्रह, दुराग्रह आणि पूर्वग्रहदूषितपणा व पक्षपातापासून तो पवित्र असला पाहिजे. तो आपल्या मनाचा व इच्छांचा दास नसला पाहिजे. त्याने डोळे उघडे ठेवून पाहिले पाहिजे, उघड्या कानांनी ऐकले पाहिजे आणि निर्मळ मनाने विचार केला पाहिजे. असे करताना सत्य त्याने बेधडक मान्य केले पाहिजे.
२) अरबीत `हमीद' शब्द आला आहे. हमीद हा शब्द `महमूद'चाच समानार्थी शब्द आहे, तरी दोघांत सूक्ष्म फरक आहे. महमूद एखाद्याला तेव्हाच म्हटले जाते जेव्हा त्याची प्रशंसा केली जाते किंवा केली गेली असेल परंतु `हमीद' स्वत: प्रशंसनीय आहे. मग त्याची कोणी प्रशंसा करो अथवा न करो. या शब्दाचा अर्थ गुणग्राहक, प्रशंसनीय अशा शब्दांनी व्यक्त होऊ शकत नाही. म्हणून आम्ही `हमीद' याचा अर्थ `आपल्या अस्तित्वात (स्वयंभू) प्रशंसनीय' (स्तुतीस पात्र)असा केला आहे.
Post a Comment