Halloween Costume ideas 2015

‘शॉर्टसेलिंग’ म्हणजे काय?


हिंडनबर्गचा अहवाल आल्यापासून माध्यमातून शॉर्ट सेलिंग हा शब्द मोठ्या प्रमाणात ऐकण्यात येत आहे. पण शॉर्टसेलिंग म्हणजे नेमके काय? याचा उलगडा अनेकजणांना झालेला नसल्यामुळे अनेक लोक संभ्रमात आहेत. तर चला पाहूया शॉर्ट सेलिंग म्हणजे काय ते?

साधारणपणे शेअर मार्केटमध्ये जी गुंतवणूक केली जाते ती कंपनीची ऐपत पाहून केली जाते. ज्या कंपन्या कित्येक दशकांपासून कार्पोरेट जगतामध्ये स्थिर आहेत आणि शेअरधारकांना नेहमीच चांगला परतावा देतात. त्याच कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याची गुंतवणूकदारांची इच्छा असते आणि अशाच कंपन्यांचे शेअर खरेदी करण्याकडे सर्वसाधारण लोकांचा कल असतो. थोडक्यात आपण घेतलेल्या कंपनीच्या शेअरचे भाव वाढतील म्हणजेच आपल्याला ते शेअर विकून आर्थिक नफा होईल या हिशोबानेच शेअरमार्केटमध्ये गुंतवणूक केली जाते. 

परंतु, काही लोक असेही असतात जे नेमकं या उलट विचार करून गुंतवणूक करतात. यालाच शॉर्टसेलिंग म्हणतात. याची दोन प्रमुख उदाहरणे खालीलप्रमाणे देत आहे. 1. जॉर्ज सोरस ही व्यक्ती अमेरिकन नागरिक असून, 92 वर्षाची आहे. या व्यक्तीने 1992 साली अमेरिकेचे राष्ट्रीय चलन पाऊंडची शॉर्टसेलिंग केली होती आणि एका रात्रीतून एक अब्ज पाऊंड कमाविले होते. सकृतदर्शनी अशक्य वाटणारी ही घटना प्रत्यक्षात घडली होती. 

त्याचे असे झाले होते की, ब्रिटनच्या रिझर्व्ह बँकेने सर्व चलनांमध्ये पाऊंड हा महाग रहावा, त्याचे महत्त्व डॉलरपेक्षाही अधिक असावे म्हणून कृत्रिमरित्या पाऊंडची किंमत वाढविली होती. याचा अभ्यास करून खात्री होताच जॉर्ज सोरस यांनी मोठ्या प्रमाणात पाऊंडसची उधारीवर खरेदी केली आणि पाऊंडस् कशाप्रकारे कृत्रिमरित्या मुल्यवर्धित करण्यात आलेले आहे, याचा खुलासा करून ताबडतोब खरेदी केलेले पाऊंडस् विकून टाकले. त्यांनी खरेदी केलेले पाऊंडस् आणि प्रत्यक्षात विकलेले पाऊंडस् यांच्यामध्ये थोडेसेच अंतर होते. त्यांनी केलेल्या खुलाशामुळे पाऊंड गडगडले आणि सोरस यांना एकारात्रीतून 1 अब्ज पाऊंडस्चा फायदा झाला. हे उदाहरण समजण्यास थोडेसे किचकट वाटत असेल तर दूसरे उदाहरण अडाणी ग्रुपच्या शेअर्सचे घेऊया. हे समजण्यासाठी तुलनेने सोपे आहे. 

शेअर मार्केटमध्ये कोणत्याही कंपनीचे शेअर उधारीवर घेता येतात व शेअर्सच्या मोबदल्यात अमुक इतक्या दिवसात तेच शेअर किंवा त्याचे त्या दिवशी असलेले मुल्य परत करण्याचा करार केला जातो व त्या मोबदल्यात मूळ शेअर धारकाला थोडीशी रक्कम मोबदला म्हणून दिली जाते. हिंडनबर्ग कंपनीने अडाणी उद्योगसमुहाचा दोन वर्ष अभ्यास केला, तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, अडाणी उद्योग समुहाने मॉरिशेस, पनामा इत्यादी टॅक्स हेवन कंट्रीजमधून शेलकंपन्या (बेनामी कंपन्या) तयार करून मोठ्या प्रमाणात अडाणी ग्रुपच्या शेअर्सची खरेदी केली व मार्केटमध्ये 6 ते 8 टक्केच शेअर राहतील याची दक्षता घेतली. या कारणामुळे अडाणी यांचे शेअर कायम महाग राहत होते. एक काळ तर असा आला होता की, अडाणी समुहाचा शंभर रूपयांचा शेअरचे मूल्य साडेचार हजार रूपयांपर्यंत जाऊन पोहोचले होते. ही चलाखी लक्षात येताच हिंडनबर्ग कंपनीने मोठ्या प्रमाणात अडाणी ग्रुपचे शेअर अल्पकिंमत देऊन उधारीवर घेतले. शेअरचा मोठा साठा झाल्याबरोबर त्यांनी अडाणींची चलाखी चव्हाट्यावर आणली. 24 जानेवारीला हिंडनबर्गची रिपोर्ट आली आणि आज एक महिन्यानंतर अडाणी समुहाच्या मालमत्तेचा जवळ जवळ 56 टक्के मार्केट कॅप (कंपनीमुल्य) नाहिसे झाले. अडाणींचे शेअर गडगडले. हिंडनबर्गने ते शेअर ज्याच्याकडून घेतले होते त्यापैकी काही शेअर विकले असतील आणि काही परत दिले असतील. अडाणी समुहाचे शेअर निच्चांकीच्या पातळीला पोहोचण्याअगोदरच योग्यवेळ साधून हिंडनबर्गने ते शेअर विकले असतील. त्यातून मिळालेला नफा हा हिंडनबर्गचा नफा आहे, यालाच शॉर्टसेलिंग म्हणतात. 


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget