Halloween Costume ideas 2015

विद्वेशी अभिव्यक्तीची पुनरावृत्ती

फ्रान्समधील व्यंगचित्र पत्रिका शार्ली एब्दोने पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या आयुष्यावरील व्यंगचित्र पुन्हा छापून अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली जगभरात सांप्रदायिक विद्वेश पसरविण्याचा पुन्हा एकदा कळस गाठला आहे. 2015 मध्ये त्याने हे व्यंगचित्र पहिल्यांदा छापले  होते. वादग्रस्त अशा या व्यंगचित्रामुळे शार्ली एब्दोच्या कार्यालयावर हल्लाही झाला होता. 7 जानेवारी 2015 रोजी शार्ली एब्दोच्या कार्यालयावर हल्ला करण्यासाठी मदत करणार्‍या 14 जणांवर आरोप ठेवण्यात आले आहेत. या खटल्याची सुनावणी सुरू होण्याच्या वेळेस हे व्यंगचित्र खोडसाळपणाने  पुनर्प्रकाशित  करण्यात आले आहे. कार्यालयावर झालेल्या हल्ल्यात मुख्य व्यंगचित्रकारासह बारा जणांचा मृत्यू झाला होता. या हल्याच्या घटनेनंतर पॅरिसमध्ये झालेल्या आणखी एका हल्ल्यात पाच जणांचा मृत्यू झाला होता. शार्ली एब्दोच्या कार्यालयावर हल्ला करणार्‍या लोकांसाठी शस्त्रं गोळा करणं आणि त्यांना मदत करणे याव्यतिरिक्त सुपरमार्केटमध्ये एका पोलिसावर हल्ला करण्यासाठी मदत केल्याचा 14 जणांवर आरोप आहेत. तीन जणांच्या अनुपस्थितीत हा खटला सुरू आहे कारण हे तिघे उत्तर सीरिया किंवा इराक इथे पळून गेल्याचे मानले जात आहे. या खटल्याची सुनावणी मार्च महिन्यात होणार होती. मात्र कोरोना संकटामुळे सुनावणी पुढे ढकलण्यात आली. सुनावणी नोव्हेंबर महिन्यापर्यंत चालेल असा अंदाज आहे. सात जानेवारीला सॅड आणि चेरिफ कोची नावाच्या भावांनी शार्ली एब्दोच्या कार्यालयात घुसून गोळीबाराला सुरुवात केली. संपादक स्टीफेन चार्बोनियर, चार व्यंगचित्रकार, दोन स्तंभलेखक, एक कॉपी एडिटर, एक केअरटेकर आणि एक पाहुणे यांची हत्या करण्यात आली. हल्ल्यात संपादकांचे सुरक्षारक्षक आणि पोलीस अधिकार्‍यांचाही मृत्यू झाला. पोलिसांनी या भावांचा शोध सुरू केला तेव्हा आणखी एक हल्ला घडला. या भावांच्या सहकार्‍याने ज्यू सुपरमार्केटमध्ये महिला पोलीस अधिकार्‍याची हत्या केली. ज्यू सुपरमार्केटमधील अनेकांना ओलीस ठेवण्यात आलं. याच व्यक्तीने 9 जानेवारीला चार ज्यू लोकांची हत्या केली. पोलिसांच्या गोळीने या व्यक्तीचा मृत्यू झाला. शार्ली एब्दोवर हल्ला करणार्‍या भावांचाही पोलिसांनी केलेल्या प्रत्युत्तरात मृत्यू झाला. सत्तेत असणार्‍यांविरोधातील व्यंगचित्र छापण्याचं काम शार्ली एब्दो करते. जहाल उजव्या विचारसरणीच्या ख्रिश्‍चन, ज्यू तसेच इस्लामिक श्रद्धांसंदर्भात शार्ली एब्दो नेहमीच वादग्रस्त राहिले आहे.  अज्ञेयवादी-नास्तिकांबाबत फ्रान्स (33.0%) हा देश इंग्लंड (25.6%) आणि अमेरिका (15.7%) यांच्यापेक्षा बराच पुढे आहे. यात फ्रेंचांच्या उदारमतवादाचं स्थान महत्त्वाचं आहे. मानवाधिकार ही संकल्पना आणि तिच्या मागचा मानवतावाद यांचं मूळ फ्रान्समध्ये आहे, तर इंग्लंड-अमेरिकेनं त्या संकल्पना घडवलेल्या नसून फक्त स्वीकारल्यआज उपजीविकेसाठी गरीब देशांतून श्रीमंत देशांत जाणारेही संख्येनं मोठे आहेत. या बाबतीत फ्रान्स, इंग्लंड, अमेरिका यांच्यात फार फरक नसावा, अमेरिकेचा आकार टक्केवारीत या प्रकारच्या लोकांना नगण्य ठरवतो. वादग्रस्त कार्टूनबाबत आता परत जाणून-बुजून वक्तव्ये करत त्या व्यंगचित्र साप्ताहिकाचा (त्याने केलेले गैरकृत्य वगळता) अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा येत आहे. मूळ प्रश्‍नाला हात न घालता ‘फ्रिडम ऑफ एक्सप्रेशन’ची चर्चा सुरू आहे. परंतु कोणीच त्या साप्ताहिकाने इस्लामची बेअदबी केली व जगभरातील मुसलमानांच्या धर्म भावनांची थट्टा केली, याबद्दल साधा निषेधही व्यक्त करत नाहीये. शार्ली हेब्दोवर झालेला हल्ला भूषणावह नाही. त्याचं समर्थन कदापि होऊ शकत नाही. त्यातही पत्रकारितेवर होणार्‍या हल्ल्याचं समर्थन तर अजिबात नाही. परंतु अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या आड इस्लाम धर्माचा व त्याला मानणार्‍या अनुयायांचा द्वेश केला जात असेल तर ते निश्‍चितच निषेधार्ह आहे. 9 सप्टेंबर 2001 रोजी झालेल्या वर्ल्ड ट्रैड सेंटरच्या दहशतवादी हल्यानंतर जगभरात मुस्लिमविरोधाची लाट आली. काही विखारी व हिंसक दहशतवादी टोळक्यामुळे सबंध जगभरातील शांततावादी इस्लाम व त्याचे अनुयायी द्वेश व तिरस्काराच्या भयग्रस्त छायेत लोटले गेले. यूरोपीयन मीडियाने ही संधी म्हणत मुस्लिम द्वेश व पर्यायाने इस्लामचं राक्षसी चित्रण उभं करण्याची स्पर्धा सुरू केली. मुसलमानांसहित कुरआन आणि इस्लामी तत्त्वज्ञानावर हल्ले सुरू झाले. यूरोपीयन मीडियाने विद्वेशाचे पीक कापत जगाला आपले अनुकरण करण्यास भाग पाडले. टीव्ही चॅनेल, सिनेमा, कार्टून, गेम्स, मैगझिन्स, वेबसाईट्स, पुस्तके इत्यादी माध्यमातून नवा इस्लामद्वेषी आशय रचण्याची स्पर्धा लागली. कुरआन त्याचे तत्त्वज्ञान न अभ्यासता जो तो इस्लामवर लिहू लागला, व्याख्याने देऊ लागला. प्रतिगामी विचारांनी टीव्हीचा मोठा स्लॉट (वेळ) भरला गेला. तीच अवस्था अन्य जनमाध्यमात (मास मीडिया) सुरू झाली. जो-तो इस्लामला विकृत पेश करू लागला. प्रेषित मुहम्मद (स.) हे जगभरातील मुस्लिमांचे आदर्श आहेत. त्यांनी मानवाला गुलामगिरीच्या जोखडातून मुक्त करत, आर्थिक समानतेचे तत्त्व सांगत, एकसमान हक्काची वाटणी करत, जगाला शांतता पटवून देत इस्लामची प्रस्थापना केली. इस्लामने जगाला सर्वप्रथम स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेची विचारप्रणाली दिली. केवळ इस्लामधर्मीयच नाही तर सबंध जाति-धर्मातील मानवाचं कल्याण कसे होईल, याचं तत्त्वज्ञान त्यांनी मांडले. प्रेषितांना केवळ मुस्लिमच नाही तर जगभरातील शांततावादी, समन्वयवादी लोक आदर्श मानतात. अशा आदर्शवीर महामानवांवर विकृत पद्धतीने निंदानालस्ती करणे कुठल्या तत्त्वात बसते? प्रेषितांची प्रतीकात्मक विटंबना केली की जगभरातील मुस्लिम चवताळतात आणि त्यांना उद्दिपीत करण्यासाठी म्हणून यूरोपीयन राष्ट्रे प्रेषित व इस्लामबद्दल अपसमज सतत पसरवत असतात. केवळ मुसलमानांना डिवचण्यासाठी अशा पद्धती राबविल्या जातात. अशा प्रकारच्या कुरघोड्या करण्यामागे मुसलमानांना पेटवणे, त्यांची मानहानी करणे, त्यांना हिंसक व विकृत ठरविणे, शांततेचे शत्रू ठरविणे इत्यादी बाबी अशा विखारी कृत्यातून राबविल्या जातात. वास्तविक, प्रेषित मुहम्मद (स.) यांची कोणतेच चित्र, प्रतीमा, आकृती नसताना अशा प्रकारे उपहासात्मक चित्रे काढून मुस्लिमांच्या ठरवून रोष ओढवून घेतला जात आहे. अशा कृती घडल्या की मुसलमान अस्वस्थ होतात, प्रतिक्रिया देतात, हिंसा करतात आणि या कृतीमधून मुसलमानांना दोषी, असहिष्णू ठरवून त्यांना झोपडले जाते. हे प्रकार नित्याचेच झाले आहे. कुठलाही व्यक्ती हे प्रकार रोखले पाहिजे असा मताचा दिसून येत नाही. 2011 साली शार्ली हेब्दोने अत्यत खालच्या पातळीवर जाऊन जगभरातील मुस्लिमांचे श्रद्धास्थान असलेल्या प्रेषितांनाच अतिथी संपादक करुन विशेषांक काढला होता. मास्कहेडच्या खाली उपशिर्षक देऊन ‘शरिया हेब्दो’ असे लिहिले होते. या विशेषांकाचा जगातून बराच विरोध झाला होता. तत्कालिन फ्रान्सचे राष्ट्रपती ‘यॉक शियॉक’ यांनी या साप्ताहिकास विद्वेशी म्हटले होते. तरीही दूसर्‍यांदा शार्ली हेब्दोनं ठरवून हे विद्वेशी कृत्य केलं आहे.
    या कृतीवरून हे स्पष्ट होते की हे इस्लामला बदनाम करण्यासाठी व जगभरातील मुस्लिमांना डिवचण्यासाठी नियोजनबद्ध केलेली कृती आहे.  ‘शार्ली हेब्दो’ने तर 2011 पासून अशा स्वरुपाचे बदनामीचे नियोजनबद्ध षडयंत्र चालवलेलं आहे. म्हणजे असे वाद उत्पन्न करणे म्हणजे आ बैल मुझे मार सारख्या सांडाला लाल रंगाचा कपडा दाखवणेच होय. शार्लीला इस्लामचा दुष्प्रचार करायचा नव्हता, असंही म्हटलं गेलं. बाकी चेष्ठा विचारात घेतल्यास एक लक्षात यईल की, केवळ प्रसिद्धीसाठी हा सगळा खटाटोप आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा सर्वाचेच सार्वभौमिक हक्क आहे. म्हणून कोणत्याही जाती-धर्माबद्दल आक्षेपार्ह लिहिणे, बोलणे व त्याविरोधात विखारी प्रतीमा रंगवण्याचा अधिकार कोणालाही प्राप्त होत नाही. कलेच्या नावाखाली इस्लामची बदनामी व त्याच्या मानणार्‍याविरोधात तिरस्कार, द्वेश व गृहयुद्धे पेटवण्याचा अधिकार मिळता कामा नये. संचार स्वातंत्र्य आहे, म्हणून रस्त्याच्या मध्यावरुन मी चालू शकत नाही. सार्वजनिक हिताच्या वा व्यवस्थेच्या दृष्टीने मला माझ्या स्वातंत्र्याला लगाम घालावाच लागतो. हे कोणालाही सहज पटते. पण अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या आकलनाबाबत मात्र खूप गोंधळ असतो. भोवतालचे सामाजिक-राजकीय वातावरण, वर्तमान लोकभावना, या लोकभावनांचा वापर करणार्‍या हितसंबंधीय घटकांची ताकद, त्यांच्या विरोधात उभ्या राहणार्‍या प्रगतीशील शक्तींचा समाजातील पाया ही संदर्भ चौकट लक्षात घेऊनच अभिव्यक्ती स्वातंत्र्याची लांबी-रुंदी ठरवायला हवी.

- शाहजहान मगदुम
मो.:८९७६५३३४०४


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget