Halloween Costume ideas 2015

नागपूर येथील मशीदीतर्फे गरजूंना ऑक्सिजन सिलेंडरचे वाटप

नागपूर (डॉ. एम. ए. रशीद)
कोरोना विषाणूच्या संक्रमणाने संक्रमित रुग्णाची श्‍वसनप्रणाली प्रभावित होते. कोरोनाग्रस्त व्यक्तीला श्‍वास घेण्यास होतो, रुग्णालयात बेड न मिळाल्यास त्यांच्या जीव संकटात येतो, वेळेवर योग्य उपचार न मिळाल्यास रुग्णाला आपला जीवही गमवावा लागतो. कोरोनाबाधितांची ही अडचन लक्षात घेता ‘मशीद मरकजे इस्लामी’च्या वतीने मागील काही दिवसांपासून गरजूंना ऑक्सीजन सिलेंडरचे वाटप करण्यात येत असल्याचे जमाअत ए इस्लामी हिंद नागपूरचे शहर अध्यक्ष डॉ. अनवार सिद्दीकी यांनी प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून कळवीले आहे.
जाफर नगरच्या टिचर्स कॉलोनी येथे असलेली ही शहरातील एकमेव मशीद आहे . जिथून अशा प्रकारे गरजूंना ऑक्सिजनचे सिलेंडर उपलब्ध करून दिले जात आहेत. गृह विलगीकरणात (होम क्वारंटाइन) असलेले रुग्ण, दमा व श्‍वसनासंबंधित इतर व्याधीने ग्रस्त रुग्ण, ज्यांना रुग्णालयात पर्याप्त सुविधा मिळत नाहीत, अशांना अपातकालीन स्थितीत ऑक्सिजन सिलेंडरचा पुरवठा केला जात आहे. त्यांनी सांगीतले की जमाअत ए इस्लामी हिंद नागपूरच्या वतीने लॉकडाउनच्या सुरवातीपासूनच गरजूंना विविध शासकीय योजनेंतर्गत लाभ मिळवून देण्याचे कार्य केले जात आहे. जनसेवा विभागांतर्गत जमाअतने हजारो गरजूंना रेशन कीट, जेवन व इतर आवश्यक सहित्य उपलब्ध करून दिले आहे. गरजू रुग्णांनाही मोठ्या संख्येने ऑक्सीजन सिलेंडरचे वितरण करण्यात येत आहे. वैद्यकीय सल्ल्याने गरजू व्यक्तींनी या सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ऑक्सिजन सिलेंडरकरिता 9029586869, 9028289038 व 9890362882 या मोबाइल क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget