आज सोशल मिडीया व विज्ञान तंत्रज्ञान युगात संगकण, मोबाईल, स्मार्टफोन, लॅपटॉप, किंडल, प्रिंटर, इत्यादी साक्षर असणे आवश्यक झाले आहे तसेच व्हाट्सअप, फेसबुक, युट्युब, इंस्टाग्राम, ट्विटर व ई-मैल वापरण्याची क्षमता देखील. सोशल मिडीयाचा वापर आज अभ्यास करतांना होत आहे. इंटरनेटवर लाखो-करोडो ई-स्वरूपातील वाचन साहित्य उपलब्ध आहे. आज विध्यार्थी, शिक्षक आणि ग्रंथपाल ई-साहित्य हे संगणक, मोबाईल किंवा किंडलवर वाचतांना दिसत आहे. संगणकाचा किंवा इंटरनेटचा वापर परीक्षा घेतांना होत आहे. उदा. नेट-सेट, यु.पी.एस.सी., एम.पी.एस.सी., नीट, गेट, रेल्वे, एस.एस.सी. अशा वेगवेगळ्या परीक्षा हे ऑनलाइन घेतल्या जात आहे. खंरतर संगणक व इंटरनेटचा वापर वाढतच चालला आहे तसेच भविष्यात पण ते वाढतच जाण्याची शक्यता आहे; यात काहीच शंका नाही. त्यामुळे संगकण, इंटरनेट, मोबाईल यांचा वापर किंवा यांच्याशी मैत्री करणे आवश्यक झाले आहे. सोशल मिडीयाचा वापर करायला शिकणे व वापर करणे हे खंरतर आपल्या हितासाठीच असणार आहे.
स्मार्ट विध्यार्थी
आज विद्यार्थांचा विचार केलात तर अभ्यास करणे, फार्म भरणे, परीक्षा देणे, निकाल पाहणे इत्यादी ऑनलाईन पध्दतीने होत आहे. मग ते यु.पी.एस.सी., एम.पी.एस.सी. असो किंवा ईतर कोणतीही. यासर्व परीक्षा आता ऑनलाइन स्वरुपात घेण्यापासून तर निकाल लावे पर्यंत ऑनलाइन माध्यमातूनच चालत आहे. याच बरोबर प्रवेशपत्र काढणे, मुलाखती पत्र पाहणे, ई-मैल पाठवणे, एस.एम.एस.पाठवणे, डाऊनलोड करणे इत्यादी आता ऑनलाइन मार्फत केल्या जात आहे. याचबरोबर निवड झाली कि नाही. झाली असेल तर पुढे जाऊन प्रशिक्षण, वेळापत्रक, होमवर्क हे ई-मैल वर पाठवले जातात. त्याच बरोबर ऑनलाइन वर्ग, ऑनलाइन सेमिनार, व्याख्याने, कार्यशाळा, प्रात्यक्षिक इत्यादी ऑनलाइन माध्यमातूनच घेतल्या जात आहे. पुढे प्रशासनात, शिक्षणिक क्षेत्रात, खाजगी क्षेत्रात किंवा ईतर क्षेत्रात संगणक, स्मार्टफोन, इंटरनेट, डेस्कटॉपचा वापर वाढतच चालला आहे. ई-गव्हर्नंस, ई-साहित्य, ई-मैलचा जमाना आला आहे. त्यामुळे या साधनांचा किंवा गोष्टींचा वापर आपण आतापासून करायला हवा. आपण जर आज विध्यार्थी, लेखक, शिक्षक, संपादक किंवा ईतर लोकांच्या मुलाखती, लेख वाचल्या तर सामाजिक दृष्ट्या ऑनलाइन क्षेत्रात वाढच होतांना दिसत आहे. आज शाळा पासून तर विध्यापीठ पर्यंत आणि सरकारी ऑफिसेस पासून तर बाजारपेठ पर्यंत मोबाईल, इंटरनेट किंवा संगणकाचा वापर होत आहे.
संगणक व स्मार्टफोनचा वापर
आज लहान बाळा पासून तर वयोवृध्द पर्यंत सगळ्यांकडेच मोबाईल, संगणक, इंटरनेट किंवा स्मार्टफोन आहेत. त्यात आपण व्हाट्सअप, फेसबुक, युट्युब, इंस्टाग्राम, ट्विटवर व ई-मैल इत्यादीसाठी इंटरनेटचा वापर कायम करतच असतो. पत्र व्यवहारचे युग मागे पडून स्मार्टफोन व इंटरनेटचे नवेयुग आले आहे. म्हणजेच माहिती मिळवणे आपल्यासाठी आता कठीण राहिलेलं नाही. आपल्याला हवी ती माहिती आपण कुठेही, केव्हाही आणि कधीही मिळवू शकतो. संपूर्ण समाजाच आज गुगलमय झाला आहे. मात्र आपल्याला नको इतकी माहिती सतत मिळतच असते. ही आपली आज समस्या झाली आहे. मात्र नेट-सेट, यु.पी.एस.सी., एम.पी.एस.सी., नीट, गेट, रेल्वे, एस.एस.सी. असा बऱ्याच परीक्षांमधील अनेक प्रश्न व उत्तरे हे पुस्तकातून न येता ते थेट काही ठराविक किंवा महत्वाच्या वेबसाईट्स वरून येतात असे दिसून आले आहे. आज सवर्च ठिकाणी इंटरनेट व संगणकाचा सर्रास वापर होत आहे. यामध्ये न्यूजपेपर, न्यूज, मासिके इत्यादी. वर्तमानपत्र, न्युज, मासिकेसाठी स्वातंत्र्य वेबसाईट आहेत. दैनदिन वर्तमानपत्र, मासिके वाचण्यासाठी वेगवेगळे अॅप आहे. उदा. वर्तमान पत्रातील लेख, संपादकीय, विशेष लेख इत्यादी. याच बरोबर बातम्या पाहण्यासाठी वेबसाईट किंवा चैनल आहे. कशा प्रकारे इंटरनेटचा परिणाम कारक वापर कसा करता येईल. ब्लॉग, सरकारी-खाजगी वेबसाईट्स, ई-पुस्तके किंवा अॅप यांचा संदर्भात विचार करू. स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विध्यार्थांना काही ब्लॉग किंवा काही सरकारी वेबसाईट्स आहेत. उदा. महा पोर्टल, एस.एस.सी. पोर्टल इत्यादी. याचबरोबर काही वेबसाईट्स यशस्वी लोकांच्या मुलाखती, व्याख्याने, व्हिडीओ, महत्वाच्या पुस्तकांची सुची किंवा मार्गदर्शन पत्र उपलब्ध आहे. अर्थात या वेबसाईट्सवर अर्थशास्त्र, विज्ञान, चालु घडामोडी, भुगोल, इतिहास, राज्यशास्त्र, गणित इत्यादी विषयांची माहिती किंवा व्याख्याने असतात. पण याचबरोबर इंटरनेट वर जास्त वेळ घालू नाही हे कायम लक्षात ठेवावे. आज सरकारी खात्याच्या, खाजगी खात्याच्या, मनोरंजनात्मक, मार्केट खात्याच्या अशा अनेक प्रकारच्या वेबसाईट्स आहे. उदा. अर्थ खात, डिफेन्स, यु.जी.सी., ग्रंथालय, सिनेमा, महिला खात, बिग-बाजार, डी-मार्ट इत्यादी. अशा अनेक वेबसाईट्सवर उपयुक्त अशी महत्वाची माहिती असते. विद्यार्थ्यांना परीक्षेत विचारली जाणारी प्रश्न शक्यतो या वेबसाईट्स वरून येत असतात. पुस्तका शिवाय आपण या वेबसाईट्स वरील माहिती वाचून अभ्यास करू शकतो. उदा. एन.टी.ए., नेट-सेट, राज्यसेवा आणि लोकसेवा यांच्या वेबसाईट्सवर प्रश्न प्रत्रिका, उत्तर प्रत्रिका, अभ्यासक्रम इत्यादी उपयुक्त माहिती असते. याचबरोबर जनगणने नुसार लिंग गुणोत्तर, स्त्री-पुरुष, लोकसंख्या, इत्यादी माहिती मिळतात. सरकारने राबविलेल्या विविध योजना व त्या योजनाची तपशील माहिती ह्या पण वेबसाईट्सवरच असतात. समाजातील चालुघडामोडी आपण लोकराज्य, योजना, अशा विविध मासिकांतून माहिती मिळवू शकतो. यासर्व मासिकांच्या स्वतंत्र वेबसाईट्स आहे. एक तर आपण ऑनलाइन किंवा पी.डी.एफ. फाईल मध्ये डाऊनलोड करून वाचन करू शकतो. पुस्तके, मासिके, वर्तमानपत्र इत्यादी हातात घेऊन वाचण्याचा आनंदच वेगळा असतो. पण अनेकदा आपण प्रवास करतांना, वाट पाहतांना, रिकाम्या वेळेत, पायी जातांना किंवा ईतर बऱ्याच वेळी आपल्याकडे पुस्तके, मासिके, वर्तमानपत्र नसतात. त्यावेळी ई-न्यूजपेपर, बातमी, व्हिडीओ, संपादकीय लेख, विशेष लेख, हास्य कथा, बाल कथा इत्यादी ऑनलाइन पाहू शकतो किंवा वाचू शकतो. म्हणजेच कोणत्याही वेळी, कुठेही, केव्हाही, कधीही यास्वरूपातील माहिती वाचुन आपला वेळ वाचवू शकतो. काही ठिकाणी वेबसाईट्सवर आपण सूचना पण देऊ शकतो, त्यामध्ये बदल करू शकतो, डाऊनलोड करू शकतो. आपल्या कडील स्मार्टफोन, संगणक, इंटरनेट, मोबाईल यांचा सर्वोत्तम वापरून करून घेण्यासाठी आपण किंडल सारखे पी.डी.एफ. रिडर डाऊनलोड करून सगळ्या प्रकारचे ई-साहित्य वाचू शकतो. कितीतरी महत्वाचे सरकारी, शैक्षणिक, खाजगी इत्यादी स्वरूपातील रिपोर्ट-अहवाल पी.डी.एफ. स्वरुपात वेबसाईट्सवर उपलब्ध असतात. याशिवाय अनेक ग्रंथालय ई-स्वरुपात आहे उदा. एन.डी.एल. डी.ओ.ए.जे. इत्यादी. याचप्रमाणे एन.सी.ई.आर.टी., इग्नू, वाय.सी.एम.ओ.यु. सारख्या संस्था-विद्यापीठ. लाखो-करोडो ई-स्वरूपातील पुस्तके, लेख, मासिके, प्रबंध इत्यादी हे ग्रंथालय नेटवर्कवर उपलब्ध आहे उदा. इन्फ्लीबनेट, डेलनेट, ओ.सी.एल.सी. इत्यादी. विध्यार्थांना किंवा शिक्षकांना संदर्भासाठी किंवा वाचालायला ह्या ई-स्वरूपातील साहित्य पी.डी.एफ स्वरुपात डाऊनलोड करून हार्डडिस्क किंवा स्मार्टफोन वर सेव/स्टोर करू शकतात. आता तर विधयार्थांनी वेगळाच अभ्यास करण्याचा मार्ग शोधला आहे. उदा. इंटरनेटवर, स्मार्टफोनवर, ई-ग्रंथालाय मध्ये ऑडीओ-व्हिडीओ व्याख्याने ऐकतात-पाहतात. त्याचबरोबर ऑनलाइन व्याख्याने, कार्यशाळा, प्रात्याक्षित ऐकतात. ऑनलाइनच नोट्स काढतात व वाचतात. पी.डी.एफ. फाईल डाऊनलोड करतात उदा. चालू घडामोडी समजावून देतांना अशा व्हिडीओजचा फायदा अनेकदा होतो. अतिशय गुंतागुंतीचे, अवघड, कठीण प्रश्न सोडवतांना किंवा समजाऊन सांगतांना या ऑनलाइन व्हिडीओ चांगले उपयुक्त पडतात. उदा. गणित सोडवतांना सूत्रे, भागाकार,गुणाकार, वर्गमूळ, वर्गसंख्या इत्यादी.
स्मार्टफोन व इंटरनेटच्या वापरातील अडथळे
कोणतीही चांगली गोष्ट करायला गेलो कि अडथळे येतातच. आपल्याला एखादया चांगल्या ठिकाणी जायचं असेल तर त्या वाटेवरचे अडथळे आपल्याला माहित असायला पाहिजे. उदा. आपला पाय घसरू शकतो, खड्डे कसु शकतात इत्यादी. त्याचप्रमाणे स्मार्टफोन, इंटरनेट, संगणक इत्यादी अभ्यासाठी वापरात असतांना अडथळे माहित असायला पाहिजे. इंटरनेट वरील माहिती कोणती योग्य किंवा अयोग्य आहे; माहिती ओळखणे. इंटरनेटवर माहितीचा वाढता विस्फोट पाहता आपण त्या माहितीच्या भांडारात गोंधळून जाऊ शकतो. म्हणुनच माहिती शोधतांना योग्य बुलेटिन्स वापरून माहिती शाधावे. दर सेकंदाला लाखो-करोडो माहिती हि इंटरनेटवर उपलब्ध होत आहे. कायम काही मिनिटात आपण वर्तमानपत्र, मासिके, बातम्या, चालु घडामोडी, सरकारी, खाजगी इत्यादी वेबसाईट्सवर फेरफटका मारून चेक करत असतो. याचप्रमाणे व्हाट्सअप, फेसबुक, युट्युब, इंस्टाग्राम, ट्विटवर व ई-मैल या अॅप किंवा वेबसाईट्सवर जाऊन चेक करणे. अशा विविध गोष्टीमुळे आपण अभ्यासात अपयशी ठरू शकतो. कायम आपल्या डोक्यात इंटरनेट कशासाठी वापर करावा? हा उद्देश ठेऊन आपण इंटरनेटचा वापर योग्यप्रकारे करावे. नाहीतर इंटरनेटवर वेगवेगळ्या आकर्षक वेबसाईट्स आहेत. उदा. सिनेमा, गाणे, फिल्म स्टार्सच्या बातम्या, कब्बडी, कुस्ती, पोर्नोग्राफिक इत्यादी अनेक वेबसाईट्सवर करमणुकीचे व्हिडीओ आहेत. म्हणुन या चक्रात आपला वेळ न घालवता योग्य व अयोग्य मधला फरक समजून माहितीचा वापर करावा. नाही तर याचक्रात वेळ कसा गेला तो आपल्याला समजणारच नाही. एकदा जर का परीक्षेत अपयशी झालोत तर पुन्हा कमीत कमी तरी एकवर्ष आपल्याला वेळ व लक्ष देऊन पुन्हा अभ्यास करावा लागतो. खंरतर इंटरनेटवर जातांना आपल्याला नक्की कोणती माहिती पाहिजे किंवा किती वेळ लागेल. हे आधी ठरवले पाहिजे. एकदा जर का माहिती मिळाली कि पुन्हा अभ्यासात परत येणे हि सवय लावणे. अन्यथा इंटरनेटवर वेगवेगळ्या प्रकारच्या वेबसाईट्स आहे. आपण एका वेबसाईट्स वरून दुसऱ्या-तिसऱ्यावर कधी पोहचतो ते आपल्याला पण कळत नाही. नुसत माहिती शोधण्यामध्ये उड्या मारत बसतो. व्हाट्सअप, फेसबुक, युट्युब, इंस्टाग्राम, ट्विटवर व ई-मैलवर टाकले जाणारे प्रश्न किंवा व्हिडिओ कामाचे आहे कि बिनकामाचे हे ठरवणे. नाही तर आपला बऱ्हाच वेळ जाऊ शकतो. शक्यतो ठराविक माहितीच्या वेबसाईट्स, लिंक, प्रश्नच ग्रुपवर शेअर किंवा दुसऱ्याला पाठवावे. अर्थात कारणा शिवाय इंटरनेटवर किंवा स्मार्ट फोनवर फेरफटका करत बसण्याची सवय लागल्यास आपण आपल्या उद्दिष्ट किंवा धैय्य पासुन दूर जाण्याची शक्यता आहे. नेहमी हेतुपूर्वक, हवी असलेली माहिती इंटरनेट वरून गोळा करणे महत्वाचे.
वैयक्तिक अनुभव
“मी आता पर्यंत पाच हजार ग्रंथालयांना भेटी दिल्या आहे”आतापर्यंत मला एकही ग्रंथालय असा आढळून आला नाही कि तिथे या साधनांचा वापर होत नाही. मी स्वत: शाळा, महाविद्यालय, कॉलेज, विध्यापीठ, सार्वजनिक ग्रंथालय, संस्था, विशेष ग्रंथालय किंवा ईतर ठिकाणी प्रात्यक्षिक, कार्यशाळा किंवा परिषेदमध्ये हजारापेक्षा जास्त व्याख्याने आज पर्यंत दिले आहे. आज विध्यार्थी स्पर्धा परीक्षांमध्ये, शैक्षणिक परीक्षेत यश मिळवण्यासाठी मोबाईल, संगणक, इंटरनेट आणि स्मार्टफोनचा वापर करत आहे. त्यांना फायदेशीर पण ठरत आहे हे सिद्ध झालेले आहे.
प्रा. राहुल भिमराव राठोड (पुणे)
मो. नं. ९५०३२०३६९५
Post a Comment