सध्या कोविड 19 या आजाराने थैमान घातलं असतांना काही देश, शाळाचालक, विद्यापीठ शाळा सुरु करण्याची घाई करतं आहेत. किंवा त्यावर विचार करतं आहेत. नुकतंच अमेरिकन अकॅडमी ऑफ पीडिएट्रिक्स ने. एका अहवालात आकडेवारी जाहीर केली कि जुलै च्या शेवटच्या फक्त पंधरा दिवसात अमेरिकेत 97000 हजार मुलांना कोरोना लागण झाली. फक्त पंधरा दिवसात वरील आकडा आला. आज पर्यंत अमेरिकेत एकूण संक्रमित 50 लाख लोकां मध्ये तीन लाख अडतीस हजार मुलं कोविड संक्रमीत झालीय. याचा अर्थ संक्रमण मुला मध्ये पण वेगाने पसरतंय. जर शाळा सुरु करण्याची भारतात घाई झाली तर. विध्यार्थी जीवाशी खेळ होईल असंच वाटतं कोरोना पूर्ण नियंत्रण मिळाल्या शिवाय परिस्थिती आटोक्यात आल्या शिवाय मुलांच्या जीवाशी खेळू नये असं वाटतं. ठोस औषध, लस तयार झाल्या शिवाय शाळा सुरु करण्याचं मनात आणलं तरी येणारी पिढी तारुण्यात, लहानपणी आजाराच्या खाईत लोटल्या सारखं होईल. शासनाने या गोष्टी चा विचार पूर्वक निर्णय घ्यावा. शाळा संस्था शाळा सुरु करण्याचा विचार करतं आहेत. ते चुकीचंच ठरेल असं वाटतं. अगोदरच लहान मुलांची मानसिक स्थिती कशी झालीय या लॉकडाऊन मुळे आपण सांगू शकत नाहीत. गेले चार महिने मुलं घरात आहेत त्यांच्या मनाचा विचार कोणी करतांना दिसतं नाही. सर्वात जास्त लॉकडाऊन नियम पाळले असतील तर लहान मुलांनी आणि तरुण पिढीने. जरी कंटाळलीत मुलं पण याही वयात परिस्थिती जाण एक अनामिक भीती युक्त वातावरणात जगत असतांना. छान घरातच अभ्यास विविध घरगुती कलाकृती साकारत आहेत. सकारात्मक विचार करतांना मुलं दिसताय. हट्ट कमी झाला मुलांचा असं वाटतं ज्या वयात खेळण शाळेत जाण हवंय त्या वयात घरात आहेत बिचारी. पण संयम त्यांच्या कडूनच शिकायला आज मिळतोय हि जमेची बाजू दिसतेय. परिस्थिती बरोबर लढाई कशी करायची आजच गुण त्यांच्या अंगात दिसतात असंच वाटतं. जरी आईवडील मानसिक तणावात असतील तरी मुलांनी धीर सोडला नाही. हि सर्वा साठी जमा बाजू. शिक्षणाचं होतंय नुकसान ग्रामीण भागात, गरीब कुटूंबातील विध्यार्थी आज सुरु असलेली ऑनलाईन शाळा काय असते हे हि त्यांना माहित नसेल किंवा नाही कदाचित. पण ज्यांच्या कडे मोबाईल आहे त्यांच्या घरी मुलांचा अभ्यास सुरु झाला काही प्रमाणात. अभ्यासात झालेलं नुकसान भरून काढता येईल विविध मार्गाने अतिरिक्त जादा अभ्यास करून पण जीवाचं झालेलं नुकसान भरून निघणार नाही. त्याच साठी संयम ठेवून निर्णय व्हावेत. आजच लॉकडाऊन पूर्ण उपयोगी ठरला नाही काही अंशी त्यात नियम पूर्ण क्षमतेने पाळले गेले नाहीत म्हणून रुग्ण संख्या झपाट्याने वाटतेय देशात.पुन्हा पुन्हा लॉकडाऊन निर्णय घेतले जातं आहेत. सापसीडी सारखं झालं पुन्हा पुन्हा त्याच जागेवर येऊन पडतो. जितकं वरती जायचा प्रयत्न तितकं खाली येऊन पडतो शिडी चढलो कि साप गिळनकृत करतो चडतच नाहीत आपण. शाळा सुरु झाल्या तर लहान मुलांना येणाऱ्या पिढीला महामारीत स्वता हुन ढकलून देण्या सारखं होईल. म्हणून सरकारी निर्णय घेतांना घाई होणार नाही खात्री आहे.केंद्र राज्य सरकार मध्ये शिक्षण क्षेत्रात अनेक तज्ञ आहेत योग्य विचाराअंती निर्णय होईल यात शंका नाही. पण "अति घाई संकटात नेई " हे लक्षात ठेवून निर्णय व्हावेत शाळा सुरु करण्या बाबत असं माझं मतं मांडले. अमेरिकेत मुलांन मध्ये वाढत असलेलं संक्रमण चिंतेची बाब तेथे घडतं असलेली चूक ईतर देशात किंवा भारतात होऊ नये म्हणून लिहण्याचा प्रपंच..
प्रदीप मनोहर पाटील
गणपूर ता चोपडा जिल्हा जळगाव
9922239055.
Post a Comment