कोविडमुळे उर्दू जगताची अपरिमित हानी झालेली आहे. प्रसिद्ध शायर राहत इंदौरी पाठोपाठ कोरोनाने दुसर्या एका उमद्या शायरचा बळी घेतला. अशोक साहिल तुलनेने जरी राहत इंदौरी एवढे प्रसिद्ध नव्हते तरी त्यांची शायरी राहत इंदौरीपेक्षाही सरस होती, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. उदाहरणादाखल त्यांचे खालील निवडक साहित्य पहा -
रसूलों की भी अक्सर देर से ताईद करती है
ये दुनिया हर नई आवा़ज पर तनकीद करती है
हा शेर कुठल्या श्रद्धावान मुस्लिम शायरचा नसून अशोक साहिल यांचा आहे हे सांगूनही खरे वाटणार नाही. या शेरचा संक्षिप्त अर्थ असा की, एकेश्वरवादाची दीक्षा देण्यासाठी या पृथ्वीवर जवळपास 1 लाख 24 हजार प्रेषित आले. मात्र लोकांनी त्यांना आणि त्यांच्या शिकवणीला त्यांच्या जिवंतपणी फारसे महत्त्व दिले नाही मात्र त्यांच्या मृत्यूनंतर त्यांना सन्मान दिला. विशेष: प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या जीवनावर हा शेर अतिशय चपखलपणे बसतो. याशिवाय, खालील शेर पहा...
ऩजर ऩजर में उतरना कमाल होता है
ऩफस ऩफस में बिखरना कमाल होता है
बुलंदीयों पे पहूंचना कोई कमाल नहीं
बुलंदीयों पे ठहरना कमाल होता है
गुणवत्तेच्या दृष्टीने उर्दू काव्याच्या इतिहासामध्ये अशोक साहिल यांचा हा शेर मैलाचा दगड ठरलेला आहे, यात शंका असण्याचे कारण नाही. त्यांच्या मृत्यूसंबंधी त्यांचे मित्र महेमूद रियाज हाश्मी लिहितात, ” मला लहानपणापासूनच साहित्याची आवड होती. उर्दू मुशायरे ऐकण्याचा छंद होता. मला चांगलं आठवतं जवळ-जवळ 25 वर्षापूर्वी अशोक साहिल यांना सहारणपूरच्या एका अखिल भारतीय मुशायर्यामध्ये मी त्यांना पहिल्यांदा ऐकलं होतं.
कमंद चाँद-सितारों पे डाल सकता हूं
समंदरों को तहोंतक खंगाल सकता हूं
मेरे वजूद को इंचों में नापनेवालो
मैं बूंद-बूंद से दरिया निकाल सकता हूं
त्यांचा हा शेर माझ्या कायम स्मरणात राहून गेला. त्यानंतर मी वेड्यासारखा त्यांच्या शायरीचा मागोवा घेत राहिलो. त्यानंतर मी आवर्जून त्यांची अनेकवेळा भेट घेतली. उत्तरप्रदेशाच्या सहारनपूर जिल्ह्याच्या सरकारी रूग्णालयामध्ये त्यांच्या सुविद्य पत्नी अधिकारी पदावर होत्या. व ते त्यांच्यासोबतच इस्पीतळाच्या आवासीय परिसरामध्ये राहत होते. अतिशय फकिरासारखा मिजा़ज असणारा हा शायर विचारांचा बादशाह होता. उर्दू साहित्याची त्यांनी केलेली सेवा कधीही न विसरण्यासारखी आहे. रघुपती सहाय उर्फ फिराख गोरखपुरी या महान हिंदू शायरनंतर उर्दू साहित्याची उच्च परंपरा कायम ठेवण्यामध्ये अशोक साहिल यांचा फार मोठा वाटा आहे.”
त्यांच्या मनाला मोहून टाकणार्या अनेक शेरपैकी खालचा एक शेर वाचकांच्या कोर्टात सादर करण्यात येत आहे.
जहाँ हर गाम पर आतिशफिशाँ लावा उगलते हैं
हम उन रास्तों पर रोज नंगे पांव चलते हैं
तारीख गवाह है हमारे अहेद की
क़जा आने से पहले चिटीयों के पर निकलते हैं
कुठल्याही अश्रद्ध माणसाच्या मनामध्ये श्रद्धेचे स्फुलिंग फुलविण्यामध्ये त्यांची खाली दिलेली रचना :संशयपणे यशस्वी होऊ शकेल.
ना सबूत है ना दलिल है, मेरे साथ रब्बे जलील है
तेरे रहेमतों में कमी नहीं , मेरे एहतियात में ढील है
तेरा नाम कितना है मोतबर, तेरा जिक्र कितना तवील है
मुझे कौन तुझसे जुदा करे, मैं अटूट प्यास तू झील है
तेरे फैसलों से हूं मुतमईन, न मुतालबा न अपील है
समाजातील उच नीचतेच्या भावनेवर कठोर शब्दातून टिका करताना ते लिहितात,
वो खुदकुशी के सलीबों पे झूल जाती है
जो कौम अपने रिवायात को भूल जाती है.
फकीरे शहर जरा इस तरफ से धीरे चल
अमीरे शहर के बंगले में धूल जाती है.
त्यांचा आणखीन एक दिलखेचक शेर असा की,
दुनिया की रौनकों ने यहीं का बना लिया
हम जिस जमीं पे काटने आये थे एक रात
इस्लामच्या मरणोपरांत जीवनाच्या संकल्पनेला अधोरेखित करणारा एवढा जबरदस्त शेर उर्दू साहित्यात आभावानेच मिळतो. त्यांची एक अशीच बहारदार रचना -
अब इससे पहले की मैं दुनिया से गुजर जाऊं
मै चाहता हूं के कोई नेक काम कर जाऊं
खुदा करे मेरे किरदार को नजर न लगे
किसी सजा से नहीं मैं खता से डर जाऊं
जरूरतें मेरी गैरत पे तंज करती हैं
मीरे जमीर तुझे मार दूं की मर जाऊं
बहुत गुरूर है बच्चों को मेरी हिम्मत पर
मैं सर झुकाए हुए कैसे आज घर जाऊं
मेरे अ़जी़ज जहाँ मुझसे मिल नहीं सकते
तो क्यूं न ऐसी बुलंदी से खुद उतर जाऊं
त्यांची आणखीन एक गजल पहा -
मेरी तरह जरा भी तमाशा किए बगैर
रोकर दिखाओ आँख को गिला किए बगैर
गैरत ने हसरतों का गरेबां पकड लिया
हम लौट आए अर्जे तमन्ना किए बगैर
चेहरा हजार बार बदल लिजिए मगर
माजी तो छोडता नहीं पीछा किए बगैर
कुछ दोस्तों के दिल पे तो छुर्रियाँ सी चल गई
की उसने मुझसे बात जो परदा किए बगैर
एकंदरित अशोक साहिल यांच्याबद्दल फक्त एवढेच म्हणावेसे वाटते, अलविदा अशोक तुम बहोत याद आओगे...
Post a Comment