Halloween Costume ideas 2015

अन्निसा : ईशवाणी (सुबोध कुरआन)

(२) अनाथांची संपत्ती त्यांना परत करा. चांगल्या मालाला वाईट मालाने बदलू नका, आणि त्यांचा माल आपल्या मालात मिसळून खाऊ नका, हा फार मोठा गुन्हा आहे.
(३) आणि जर तुम्हाला भय असेल की तुम्ही अनाथांशी न्याय करू शकणार नाही, तर ज्या स्त्रिया तुम्हाला पसंत पडतील त्यांच्यापैकी दोनदोन, तीन-तीन, चार-चारशी विवाह करा.  परंतु जर तुम्हाला भय असेल की तुम्ही त्यांच्याशी न्याय करू शकणार नाही तर मग एकच पत्नी करा. किंवा त्या स्त्रियांना आपल्या दांपत्य जीवनात आणा ज्या तुमच्या ताब्यात  आल्या आहेत, अन्यायापासून वाचण्यासाठी हे औचित्याच्या अधिक निकटचे आहे.
(४) आणि स्त्रियांचे महर (स्त्रीधन) आनंदाने (कर्तव्य समजून) अदा करा. परंतु जर त्यांनी स्वत: स्वखुषीने स्त्रीधनाचा काही अंश तुम्हाला माफ केला तर तुम्ही तो भाग आनंदाने खाऊ शकता.


२) म्हणजे जोपर्यंत ते लहान मुले आहेत तोपर्यंत त्यांची संपत्ती त्यांच्याच हितासाठी खर्च करा आणि ते मोठे झाले तर त्यांना त्यांचा हक्क परत करा.
३) हे मोठे व्यापक वाक्य आहे. याचा एक अर्थ आहे की वैध कमाई करण्याऐवजी हरामखोरी करू लागू नये. दुसरा अर्थ आहे की अनाथांच्या चांगल्या संपत्तीला आपल्या वाईट संपत्तीने बदलू नका.
४) टीकाकारांनी याचे तीन अर्थ सांगितले आहेत.
(१) माननीय आएशा (रजि.) याच्या तपशीलात म्हणतात, अज्ञानकाळात ज्या अनाथ मुलीं लोकांच्या संरक्षणात असत, त्यांची सुंदरता आणि संपत्ती पाहून अथवा त्यांचा कोणी पालक  नाही म्हणून आम्ही वाटेल तसे त्यांना वागवू, ते त्या अनाथ मुलींशी स्वत: विवाह करीत असे आणि नंतर त्यांच्यावर अत्याचार करीत असत. म्हणून सांगितले गेले की तुम्हाला शंका  असेल की अनाथ मुलींबरोबर न्यायपूर्ण व्यवहार तुम्ही करू शकणार नाही तर दुसऱ्या स्त्रिया जगात आहेत. त्यांच्यापैकी ज्या तुम्हाला पसंत पडतील त्यांच्याशी लग्न करा. /याच  अध्यायातील आयत १२७ याची पुष्टी करीत आहे.
(२) इब्ने अब्बास (रजि.) आणि त्यांचे शिष्य इक्रीमा याचा तपशील सांगतात की, अज्ञानताकाळात लग्न करण्याची सीमा निश्चित नव्हती. एक मनुष्य दहा-दहा पत्नीं करीत होता. या  साऱ्या पत्नींचा संभाळ करणे जेव्हा अशक्य होई तेव्हा तो मनुष्य विवश होऊन आपल्या अनाथ नातेवाईकांच्या हक्कांवर ड़ल्ला मारत असे. यासाठी अल्लाहने चार पत्नींची सीमा निश्चित केली आणि सांगितले की अत्याचार आणि अन्यायापासून वाचण्यासाठी एक ते चारपर्यंत एवढे विवाह करा ज्यांच्याशी तुम्ही न्यायाने वागावे.
(३) सईद बिन जुबैर, कतादा आणि इतर टीकाकारांच्या मते अज्ञानी लोकसुद्धा अनाथांशी अत्याचार व अन्यायपूर्ण व्यवहार करण्यास चांगले समजत नसत. परंतु स्त्रियांच्या मामल्यात  त्यांची मनं न्यायपूर्ण नव्हती. जितके मनात येईल तितके लग्न करत होते आणि नंतर त्यांच्याशी अन्याय, अत्याचारपूर्ण व्यवहार करीत असत. म्हणून सांगितले गेले की तुम्ही अनाथांबरोबर अन्यायपूर्ण व्यवहार करण्यास घाबरता तर स्त्रियांशीसुद्धा अन्यायपूर्ण व्यवहार करू नका. एक तर चारपेक्षा जास्त लग्न करूच नका आणि या चारच्या मर्यादेत तितक्याच  पत्नी करा जितक्यांशी तुम्ही न्यायोचित व्यवहार करू शकाल. आयतच्या शब्दप्रयोगात या तिन्ही तपशीलांना वाव आहे आणि संभवत: तात्पर्य तिघांशीही असू शकतो. याव्यतिरिक्त एक  अर्थ असाही होऊ शकतो की जर तुम्ही अनाथांबरोबर तसा न्यायोचित व्यवहार करू शकत नाही तर या अनाथांच्या मातांशी विवाह करा. (नोट : मौलाना मौदूदी (रह.) यांनी `तर्जुमा कुरआन मजीद' मध्ये खालील टीप दिली.)
``लक्षात ठेवा ही आयत एकापेक्षा जास्त पत्नी करण्याची परवानगी देण्यासाठी अवतरित झालेली नाही. कारण याच्या अवतरणापूर्वी हे कार्य वैध होते आणि स्वत: अल्लाहचे पैगंबर  मुहम्मद (स.) यांच्या एकापेक्षा जास्त पत्नीं होत्या. ही आयत या हेतुने अवतरित झाली होती, की युद्धात शहीद होणाऱ्यांची मुले अनाथ होत होती. त्यांच्या समस्येला सोडविण्यासाठी  सांगितले गेले की तुम्ही या अनाथांचे हक्क अदा करू शकत नाही तर त्या स्त्रियांशी लग्न करा ज्यांची अनाथ मुले आहेत.''
५) यावर मुस्लिम समुदायाचे सर्व फिकाहशास्त्री सहमत आहेत की या आयत द्वारा पत्नींची संख्या निश्चत करण्यात आली आणि एकाच वेळी चारपेक्षा जास्त पत्नी बाळगण्यावर मनाई  करण्यात आली. हदीसद्वारासुद्धा याची पुष्टी होते. तसेच ही आयत बहुपत्नीत्वाला न्यायाच्या अटीवर मान्यता देते. जो मनुष्य न्यायाची अट पूर्ण करीत नाही परंतु एकापेक्षा जास्त पत्नी  करण्याच्या परवानगीने फायदा उठवितो, तो अल्लाहबरोबर दगाबाजी करतो. इस्लामी राज्यातील न्यायालयांना अधिकार आहे की ज्या पत्नीशी अथवा पत्नींशी तो न्यायोचित व्यवहार  करीत नसेल, त्यांना न्याय द्यावा. काही लोक पश्चिमी विचारसरणीशी प्रभावित होऊन, हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात की कुरआनचा मूळ उद्देश बहुपत्नीत्व परंपरेला (जी पश्चिमी  दृष्टीने वाईट पद्धत आहे) नष्ट करणे होते. परंतु ही समाजात खोलवर रुजलेली परंपरा होती म्हणून त्यावर फक्त प्रतिबंध लावून सोडून दिले. परंतु या गोष्टी मानसिक दासतेचे लक्षण  आहेत. बहुपत्नीत्व विवाह स्वत: वाईट असणे, हे मान्य करण्यायोग्य नाही कारण काही परिस्थितीत ही नैतिक तथा सांस्कृतिक गरज बनते. कुरआनने स्पष्ट शब्दात बहुपत्नीत्वाला योग्य ठरविले आहे. संकेत करूनसुद्धा त्यावर टीका केली नाही, की या प्रथेला नष्ट करण्याकडे इशारासुद्धा केला नाही.
६) तात्पर्य दासी आहेत म्हणजे त्या स्त्रिया ज्या युद्धकैदी म्हणून आल्या आणि युद्धकैद्यांची अदलाबदल न होण्याच्या स्थितीत राज्याकडून लोकांत वाटून दिल्या. अर्थ हा आहे की एक  स्वतंत्र, खानदानी पत्नीचे ओझे तुम्ही वाहू शकत नसाल तर मग दासींशी विवाह करा. जसे आयत नं. २५७ मध्ये आले आहे की एकापेक्षा जास्त पत्नींची तुम्हाला आवश्यकता असेल  आणि स्वतंत्र, खानदानी पत्नींमध्ये न्यायोचित व्यवहार करणे तुमच्यासाठी अशक्य असेल तर दासींशी लग्न करा कारण तुलनात्मकपणे कमी ओझे तुमच्यावर येऊन पडेल.
७) माननीय उमर (रजि.) आणि काझी शुरैहांचा निर्णय आहे, की जर एखाद्या पत्नीने आपल्या पतीला पूर्ण मेहर अथवा मेहेरचा काही भाग माफ केला आणि नंतर तिने पुन्हा त्याची  मागणी केली तर पतीने ते दिले पाहिजे. कारण त्याची मागणी करणे म्हणजे ती आपल्या स्वखुशीने महेर अथवा त्याचा काही भाग सोडण्यास तयार नाही.

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget