मृत्यु नंतर जिवनावर श्रद्धा व् विश्वास याचा आमच्या जिवनाशी एक अतुट नात आहे. त्या श्रद्धेवर विश्वास (ईमान-ऐतबार) जिवनातील प्रत्येक क्षेत्रांवर परिणामकारक ठरतो. मरणोत्तर जीवनावरील श्रद्धा ही आपल्याला एक निर्मात्याच्या अस्तित्वाला बळकटी प्रदान करते आणि त्याला एक जिवंत वास्तव बनवते. हा विश्वास मानवाला आपल्या निर्मात्याप्रति आपुलकी तर देतोच पण त्याच सोबत मानव व विश्वनिर्माता यांच्यातील बंधन दृढ करतो. मृत्यूनंतर जागतिक न्यायालयात माझी हजेरी ही श्रद्धा स्वत: मध्ये एक क्रांतीकारी आत्मा आहे. ही आत्मा जेव्हा मन आणि बुद्धीमध्ये संचार करते तेव्हा ती मानवास पुर्णपणे बदलुन टाकते. व्यक्तिमत्वाला स्वच्छ, निर्मळ दिशा देते. व्यक्तिला सत्याचा ध्वजवाहक आणि न्यायाचा पाईक बनवुन असत्य, अत्याचार, वासना, क्रुरतेपासुन सावध करते आणि मनात सदाचार आणि पुण्यकर्माची मोचेर्र्बांधणी करते. चंगळवादात तल्लीन लोकांना पारलौकीक जिवनाबद्दल आकर्षण निर्माण करते. मानवास निर्मात्याच्या आदेशाचा आज्ञाधारक, त्याच्या व्यवस्थेचा सच्चा सैनिक व रक्षक बनविते. ही श्रद्धा माणसास सत्य व न्यायाच्या स्थापनेसाठी संघर्ष करण्यासाठी उर्जा प्रदान करते. मानवाला संकटे आणि जिवनात उद्भवलेल्या विपरित परिस्थीतीशी सामना करण्यासाठी ताकद, हिम्मत, आत्मविश्वास प्रदान करते आणि मानवजातीची निस्वार्थ सेवा करण्यासाठी त्याग व उपकाराची भावना निर्माण करते.
- मौलाना सय्यद जलालुद्दीन उमरी
- मौलाना सय्यद जलालुद्दीन उमरी
(संकलन - साजीद आझाद, निलंगा).
Post a Comment