मौलाना अशफाक अहमद यांचे 20 ऑक्टोबरला औरंगाबाद येथील राहत्या घरी वयाच्या 65 व्या वर्षी निधन झाले. त्यांचे बीएससी बी.एड., एम.ए.,एम.एड. पर्यंत शिक्षण झाले होते. इस्लामिक साहित्यावरही त्यांची मजबूत पकड होती. सुरूवातीला त्यांनी एका सुपरिचित शाळेत मुख्याध्यापकाची जबाबदारी स्वीकारली. एका खरेदी न केलेल्या फर्निचरच्या वाऊचरवर सही न करण्याचा पुरस्कार म्हणून व स्वत:च्या तत्वनिष्ठेमुळे त्यांना त्या नौकरीचा त्याग करावा लागला. नंतर त्यांनी जमीएत-उल-हुदा, मालेगांव या ठिकाणी मुख्याध्यापकाची जबाबदारी पार पाडत असताना अचानक त्यांच्यावर जमाअत-ए-इस्लामी हिंदने आपली विद्यार्थी शाखा एस.आय.ओ (डखज) च्या राष्ट्रीय अध्यक्षाची जबाबदारी सोपविली. म्हणून त्यांना जमियतुल हुदाची नौकरी सोडून दिल्ली ला स्थलांतर करणे भाग पडले. आपल्या नौकरी व भविष्याची कसलीच तमा न बाळगता अश्फाक अहेमद यांंनी दिल्लीला जाऊन लोककल्याणार्थ शिक्षणाच्या जागृतीच्या कामाला वाहून घेवून जगण्यास पसंती दिली. एस.आय.ओ. मध्ये आपला सेवाकाळ पूर्ण केल्यानंतर मागे वळून आपले जीवनमान उंचवण्याचे काम करण्याची संधी असतानाच जमात ए इस्लामी हिंद ने त्यांना त्यांच्या गुणवत्तेचा विचार करून मुख्यालयातच शिक्षण क्षेत्रात काम करण्यासाठी सहाय्यक सचिव शिक्षण विभाग म्हणून नियुक्ती केली. कुठलीही सबब न सांगता त्यांनी जमात च्या शैक्षणिक विभागात मौलाना अफजल हुसैन यांचे सहायक म्हणून करण्यास सुरुवात केली व तब्बल 26 वर्षे हे सेवाकार्य करत राहिले. त्यानंतर त्यांना या विभागाचे सचिव पद बहाल करण्यात आले तेही त्यांनी अतिशय कार्यक्षमपणे सांभाळले. दरम्यान या काळात त्यांनी शिक्षक व मुख्याध्यापकांच्या प्रशिक्षण व मार्गदर्शनासाठी देशपातळीवर अनेक शिबिरांचे आयोजन केले. त्यांच्या सेवेची ग्वाही देशभरातील असंख्य शिक्षक, मुख्याध्यापक व शैक्षणिक संस्थाने देत असतात व देत राहतील. दिल्ली व आजमगडच्या अनेक शैक्षणिक संस्थांशी ते संलग्न होते.
औरंगाबाद च्या हीरा एज्युकेशन सोसायटी चे संस्थापक अध्यक्षपदही मुहम्मद अश्फाक अहेमद यांनी भूषवीले. पन्नास (50) च्या वर दर्जेदार शैक्षणिक ग्रंथांच्या मांडणीत त्यांचा सिंहाचा वाटा होता. शिवाय, 120 पेक्षा अधिक शैक्षणिक डीव्हीडी त्यांच्या कार्यकाळात तयार करण्यात आल्या होत्या. शैक्षणिक क्षेत्रात काम करणारी सामाजिक संस्था दरसगाहे शहेंशाह बहाददूर शाह जफर तर्फे बहाददूर शाह जफर यांच्या 154 व्या जयंती निमित्त अशफाक अहेमद यांना उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रशंसा प्रमाणपत्राने गौरविण्यात आले होते.
ते अतिशय तुटपुंज्या आर्थिक परिस्थितीत कमालीच्या ध्येयनिष्ठेने आपली सेवा पार पाडीत राहिले. गेली चाळीस (40) वर्षे इंसुलिन दररोज गरजेचे होते. तरी त्यांनी आपल्या परिस्थितिची कधीच तक्रार केली नाही. अल्लाह ने मानवतेच्या सेवेसाठी जी जबाबदारी आपल्या निवडक लोकांवर टाकलेली असते मौलाना अश्फाक अहेमद साहब त्यांच्या पैकीच एक होते.

- अब्दुल समी अन्सारी,
माजी सदस्य एसआयओ, उस्मानाबाद
माजी सदस्य एसआयओ, उस्मानाबाद
Post a Comment