(१८७) या ग्रंथधारकांना त्या कराराचीदेखील आठवण करून द्या जो अल्लाहने त्यांच्याकडून घेतला होता की तुम्हाला ग्रंथाची शिकवण लोकांत प्रसारित करावी लागेल, ती लपवून ठेवता कामा नये.१३२ पण त्यांनी ग्रंथाला पाठीमागे घातले आणि अल्पशा किंमतीवर त्याला विकून टाकले. किती वाईट व्यवहार आहे हा जो हे करीत आहेत.
(१८८) तुम्ही त्या लोकांना प्रकोपापासून सुरक्षित समजू नका जे आपल्या कृतीवर प्रसन्न आहेत आणि इच्छितात की अशा कार्याची प्रशंसा त्यांना लाभावी जे वस्तुत: त्यांनी केले नाहीत.१३३ खरोखर त्यांच्यासाठी दु:खदायक शिक्षा तयार आहे.
(१८९) पृथ्वी आणि आकाशांचा सार्वभौम मालक अल्लाह आहे आणि त्याची सत्ता सर्वांवर प्रभावी आहे.
(१९०) पृथ्वी१३४ आणि आकाशांच्या उत्पत्तीमध्ये व रात्र आणि दिवसाच्या आळीपाळीने येण्यात त्या ज्ञानी लोकांसाठी फार संकेत आहेत.
(१९१) जे उठता बसता आणि पहुडले असता प्रत्येक स्थितीत अल्लाहचे स्मरण करतात आणि पृथ्वी आणि आकाशांच्या रचनेत मनन व चिंतन करतात.१३५ (ते उत्स्फूर्तपणे उद्गारतात) ‘‘हे पालनकर्त्या, हे सर्वकाही तू व्यर्थ व निरुद्देश्य बनविलेले नाही, व्यर्थ कर्म करण्यापासून तू पवित्र आहेस. मग हे पालनकर्त्या! तू आम्हाला नरकाग्नीच्या प्रकोपापासून वाचव.१३६ (१९२) तू ज्याला नरकामध्ये घातले त्याला खरोखर मोठे अपमान व नामुष्कीत लोटले आणि मग अशा अत्याचाऱ्यांचा कोणीही साहाय्यक असणार नाही.
(१९३) स्वामी, आम्ही एका हांक देणाऱ्याला ऐकले जो ईमानकडे बोलवीत होता आणि सांगत होता की आपल्या पालनकर्त्याला माना. आम्ही त्याचे निमंत्रण स्वीकारले,१३७ तर हे आमच्या स्वामी! जे अपराध आमच्याकडून झाले आहेत त्याबद्दल क्षमा कर, ज्या वाईट गोष्टी आमच्यात आहेत त्यांना काढून टाक आणि आमचा अंत सदाचारी लोकांसमवेत कर.
(१९४) हे प्रभू! जी वचने तू आपल्या पैगंबरांद्वारे केलेली आहेस ती आम्हासाठी पूर्ण कर आणि कयामतच्या दिवशी आम्हाला नामुष्की देऊ नकोस, नि:संशय तू वचनभंग करणारा नाहीस.’’१३८

१३२) म्हणजे त्यांना हे तर लक्षात राहिले की काही पैगंबरांना अग्नित जळणारी कुर्बानी (बळी) प्रमाणस्वरुप दिली गेली होती परंतु हे मात्र त्यांच्या लक्षात राहिले नाही, की अल्लाहने आपला ग्रंथ त्यांच्या सुपूर्द करताना त्यांच्याशी काय वचन घेतले होते आणि कोणत्या महानसेवेची जबाबदारी त्यांच्यावर टाकली होती. येथे ज्या वचनाचा उल्लेख केला आहे त्याचा स्पष्ट उल्लेख बायबलमध्ये अनेक ठिकाणी मिळतो. मुख्यत: पुस्तक व्यवस्था विवरण (६:४-९) मध्ये आदरणीय पैगंबर मूसा (अ.) जे अंतिम व्याख्यान दिले आहे. त्यात मूसा (अ) पुन्हा पुन्हा बनीइस्राईल लोकांशी वचन घेत आहेत की जे ईशआदेश मी तुम्हांपर्यंत पोहचविले आहेत, त्यांना आपल्या मनात पक्के रुजवा. आपल्या येणाऱ्या पिढ्यांना ते ईशआदेश शिकवा. घरात किंवा घराबाहेर रस्त्यात चालताना, उठताना, बसतांना प्रत्येक वेळी त्या ईशआदेशांची चर्चा करा. आपल्या घरांच्या चौखटीवर आणि दारावर त्यांना लिहून ठेवा. आपल्या मृत्यूपत्रात आदरणीय पैगंबर मूसा (अ.) यांनी लोकांना सचेत केले होते की पॅलेस्टाईनच्या सीमेत दाखल झाल्यानंतर प्रथम कार्य म्हणजे एबाल पर्वतावरील मोठमोठ्या शिलांवर (दगड) तौरातची सर्व वचने लिहावी. (व्यवस्ता विवरण २७ : २-४) मूसा (अ.) यांनी बनीलावी यांना व्यवस्था (तौरात) ची एक प्रत देऊन ताकीद केली होती की प्रत्येक सातव्या वर्षी (खय्याम उत्सवात) देशातील स्त्री, पुरुष व मुलांना जागोजागी एकत्रित करून हा ग्रंथ पूर्णत: त्यांना ऐकवावा. (व्यवस्था विवरण ३१ : ९-११) परंतु या ताकीदी दिल्यानंतरसुद्धा बनीइस्राईलचे लोक ईशग्रंथाकडे दुर्लक्ष करीत गेले आणि आदरणीय पैगंबर मूसा (अ.) यांच्या मृत्यूपश्चात सातशे वर्षानंतर हैकल सुलैमानीचे पीठासीन (सज्जादानशीन) आणि येरूसलेमच्या यहुदी शासकांनासुद्धा माहीत नव्हते की त्यांच्या येथे तौरातसारखा ग्रंथ आहे. (२ - राजा २२ : ८-१३)
१३३) उदाहरणत: आपल्या प्रशंसेत ते हे ऐकू इच्छितात, की आम्ही मोठे धर्मात्मा आहोत आणि थोर धर्मसेवक आणि ईशविधानाचे समर्थक आहेत तसेच महाशय थोर समाज सुधारक आणि लोकांचे जीवन पवित्र करणारे आहेत; वास्तविकतेत हे काहीही नाहीत. हे महाभाग आपल्यासाठी दिंडोरा (खोटा प्रचार) करू पाहात आहे की महाशय मोठे त्यागी, निष्ठावान आणि सत्यनिष्ठ मार्गदर्शक आहेत आणि समाजाची तर यांनी मोठी सेवा केली आहे. वस्तुस्थिती मात्र याविरुद्ध आहे.
१३४) व्याख्यानाचा येथे अंत होत आहे. याचा संबंध निकटच्या आयतींमध्ये नाही तर पूर्ण अध्यायात शोधला पाहिजे. याला समजण्यासाठी मुख्यता अध्यायाच्या परिचयाला समजून घेणे आवश्यक आहे.
१३५) म्हणजे या निशाण्या पाहून प्रत्येकजन सत्यापर्यंत सहज पोहोचू शकतो. अट मात्र ही आहे की त्याने अल्लाहकडे दुर्लक्ष करू नये. मनुष्याने सृष्टीतील निशाण्यांकडे एखाद्या जनावरासारखे पाहू नये तर त्यांचे अवलोकन विचारपूर्वक आणि चिंतन मनन करून करावे.
१३६) जेव्हा ते सृष्टीच्या व्यवस्थेचे लक्षपूर्वक अवलोकन करतात तेव्हा हे सत्य त्यांच्यावर स्पष्ट होते की ही पूर्णत: एक तत्त्वदर्शितापूर्ण व्यवस्था आहे आणि हे पूर्णत: बुद्धीविवेक विरोधी आहे की ज्या सजीवात अल्लाहने नैतिकचेतना निर्माण केली, ज्याला उपभोग करण्याचे अधिकार दिले, ज्याला बुद्धी व विवेक दिला तर अल्लाह जगातील त्याच्या कर्मांची विचारणासुद्धा करणार नाही आणि सदाचारासाठी बक्षीस आणि दुराचारासाठी शिक्षासुद्धा करणार नाही! अशाप्रकारे सृष्टी व्यवस्थेवर चिंतन मनन केल्यानंतर लोक परलोकवर विश्वास करू लागतात आणि ते अल्लाहच्या शिक्षेचे भय बाळगू लागतात.
१३७) अशाप्रकारचे सृष्टी अवलोकन केल्याने मनुष्याला विश्वास बसतो की पैगंबर या सृष्टीच्या आरंभ आणि अंतविषयी जो दृष्टिकोन प्रस्तुत करतात आणि जो जीवनमार्ग दाखवितात तो पूर्णत: सत्य आहे.
१३८) अर्थात त्यांना या गोष्टीत अजिबात संशय नाही की अल्लाह वचनपूर्ती करेल किंवा नाही. त्यांना संशय आहे तो यावर की काय अल्लाहचे वचन आमच्यावर लागू आहेत की नाही. म्हणून ते अल्लाहशी प्रार्थना करतात की आम्हाला तुझ्या वचना प्रमाणे बक्षीस पात्र बनव. जगात आम्ही पैगंबरांवर ईमान आणून नाकारणाऱ्यांचे टीका आणि उपहासाचे विषय बनलेलो आहोतच मात्र असे होऊ नये की परलोकातसुद्धा या द्रोही व नाकारणाऱ्यांसमोर आमची नामुष्की व्हावी. आणि त्यांनी आमची खिल्ली उडवावी की इस्लाम स्वीकारूनही यांचे भले झाले नाही.
Post a Comment