Halloween Costume ideas 2015

कुरआन सर्वांसाठी...!


आज राष्ट्र राष्ट्राशी संघर्ष करत आहे. मनुष्य मनुष्यासाठी पशुवत बनला आहे. जगात चहूकडे बलवान शक्तिहीनांना गिळंकृत करत आहे. चहूकडे जगात अत्याचार, धोकाधडी आणि धर्माच्या आड अधर्म माजला आहे. आज मनुष्यस्वभावात आणि चारित्र्यात सत्यता शिल्लक राहिलेली नाही. शेवटी या सर्व दुराचारांचे कारण काय आहे? कारण आहे कुरआनपासून दुरावा आणि त्या एकमेव ईश्वराची आज्ञा न बाळगणे.

कुरआन अल्लाहचा ग्रंथ आहे. प्रत्येक मुस्लिमाच्या घरात हा ग्रंथ असतो. या ग्रंथाची भाषा अरबी आहे. हा ग्रंथ अरब लोकांच्या दरम्यान अवतरित झाला आहे. त्या अरब लोकांची भाषा अरबी होती. या ग्रंथाचा संदेश तमाम मानवजातीसाठी आहे. या ग्रंथाचा अनुवाद जगातील इंग्रजी, हिंदी, मराठी या भाषांसह अनेक भाषांमध्ये झालेला आहे.

सर्वसाधारणतः असे समजले जाते की हा मुस्लिमांचा धार्मिक ग्रंथ आहे. परंतु हा ग्रंथ वास्तविकपणे समस्त मानवजातीसाठी अवतरित केला आहे आणि हा ग्रंथ सर्वांसाठी आहे. अत्यंत दुर्भाग्यपूर्ण गोष्ट म्हणजे कुरआन ग्रंथ लोकांसाठी एक रहस्यमय ग्रंथ बनला आहे. बहुतांश मुस्लिम जाणत नाहीत की या ग्रंथात काय आहे?

अरबी भाषेत 'कुरआन' या शब्दाचा अर्थ होतो 'वारंवार वाचला जाणारा ग्रंथ'. हे सत्य आहे की जगातील अएन्य कोणताच ग्रंथ इतका वाचला जात नाही, जितका कुरआन वाचला जातो. करोडो मुस्लिम प्रत्येक दिवशी पाच वेळा आपल्या नमाजमध्ये अंशतः कुरआन पठण करतात. दरवर्षी रमजान महिन्यात रात्रीच्या विशेष नमाजमध्ये महिन्याभरात जगातील लाखो मस्जिदींमध्ये संपूर्ण कुरआन पठण होते. पूर्ण कुरआन कंठस्थ असलेल्यांना 'हाफीज' म्हटले जाते. मुस्लिम जगतात यांची संख्या लाखोंमध्ये आहे. जगातील लाखो शाळांमध्ये आणि मदरशांमध्ये दररोज मुलांना कुरआन शिकविले जाते. हे सर्वमान्य आहे की जगातील अन्य कोणताच धार्मिक ग्रंथ इतक्या मोठ्या प्रमाणात वाचला जात नसेल.

कुरआनचे अवतरण कसे झाले? आणि कोणावर झाले?

कुरआनचे अवतरण शेवटचे प्रेषित मुहम्मद (स.) यांच्यावर अरबी भाषेत झाले. कारण - तिथले लोक अरबी भाषा बोलत होते. पण भारतातील मुस्लिम अरबीचे पठण करतात आणि उर्दू भाषेत समजून घेतात. तसेच ह्याविषयी दुसरी महत्त्वाची गोष्ट जाणून घेणे आवश्यक आहे की हा ग्रंथ एकाच वेळी लिखित रूपात प्रेषित मुहम्मद (स.) यांच्यावर अवतरित झाला नाही, तर अभिभाषणाच्या स्वरूपात अवतरित झालेला आहे. हे अवतरण एकदा दोनदा नव्हे तर तेवीस वर्षांत थोडे थोडे करून झाले आहे. वेगवेगळ्या प्रसंगानुरुप अवतरित झाला आहे. याच कारणामुळे हे जाणून घेणे आवश्यक आहे की कोणत्या परिस्थितीत कोणती आयत अवतरली आहे. हा अवतरण-संदर्भ जाणून घेणे, कुरआनला चांगल्या प्रकारे समजून घेणे आवश्यक आहे. अन्यथा कुरआन शिकवणीचा चुकीचा अर्थ निघू शकतो. कुरआन अवतरण जसजसे होत गेले, प्रेषित मुहम्मद (स.) त्यास आपल्या सहकाऱ्यांकरवी लिहवून घेत होते. महत्त्वाची गोष्ट अशी की प्रेषित (स.) हे अशिक्षित होते.

कुरआन मानवजातीसाठी मार्गदर्शक आहे.

कुरआनची शिकवण आहे की एकमेव ईश्वराची उपासना करणे हेच मनुष्याचे जीवनध्येय आहे आणि ईशप्रदत्त जीवनप्रणालीनुसार जीवनयापन करणे आहे. इस्लाममध्ये 'इबादत' (उपासना) ला व्यापक अर्थ आहे. ज्यात मनुष्याच्या सर्व आचारविचारांना (वैयक्तिक व सार्वजनिक) ज्यांच्याशी अल्लाह प्रसन्न होतो. आणि जे अल्लाहला आवडतात, अल्लाह जो आदेश देतो तो करताना एक मुस्लिम ईशोपासना करत अइइसतो आणि जीवनामध्येच साध्य करण्याचा प्रयत्न करत असतो. एकमेव ईश्वरावर ईमान धारण करणे. कुरआन स्पष्टोक्ती आहे,

"तुमचा ईश्वर एकच आहे. त्या परम दयाळू व कृपाळू ईश्वराशिवाय अन्य कोणतचाही ईश्वर नाही." (कुरआन, २:१६३)

संपूर्ण कुरआनमध्ये एकेश्वरत्वाचा अतिमहत्त्वाचा विषय वर्णन करण्यात आला आहे. एकमेव ईश्वरावर ईमान धारण करण्यास सतत स्मरण करण्यात आले आहे. ईश्वर कुरआनमध्ये माणसाला स्मरण करून देत आहे की त्याच्या तोडीचा व जोडीचा अन्य कोणीही नाही किंवा त्याचा कोणी पुत्र नाही आणि सृष्टीत दुसऱ्या अन्य कोणालाही ईश्वर म्हणून मिरवण्याचा अधिकार नाही. सृष्टिनिर्माता ईश्वरच एकमेव उपास्य आहे. निर्मिती निर्माणकर्त्यासमान होऊ शकत नाही. ईश्वराला मनुष्याचे गुणधर्म चिकटविणे व मर्यादित करण्यास कुरआन स्पष्ट नाकारत आहे.

"मानवी इतिहासातील या घटकांमध्ये बुद्धी व विवेक बाळगणाऱ्यांसाठी बोध आहे. हे जे काही कुरआनमध्ये वर्णिले जात आहे या काही बनावटी गोष्टी नाहीत तर जे ग्रंथ यापूर्वी आलेले आहेत, हे त्यांचेच प्रमाणित सत्य आहे आणि प्रत्येक गोष्टीचा तपशील आणि ईमानधारकासाठी मार्गदर्शन व कृपा आहे." (कुरआन, १२:१११)

कुरआनमध्ये मानवी इतिहासातील अनेक बोधप्रद घटनांचा उल्लेख आला आहे. पूर्वी होऊन गेलेले ईशप्रेषित उदा. आदम, नूह, इब्राहीम, मूसा व इसा (अ.) यांचे वर्णन आहे.

कुरआन मनुष्यवाणी नाही. कुरआनची वर्णनशैली अगदी वेगळी आहे. जेव्हा कुरआन मानवजातीला सत्कर्मांचे फायदे दाखवितो आणि कुकर्मांवर त्याला चेतावणी देतो तेव्हबा दोन्ही ठिकाणी कुरआनची भाषा आणि संबोधन अगदी वेगळे असते. पूर्ण कुरआन तीस भागांत (पारा) आहे. त्यात ११४ अध्याय आहेत. प्रत्येक अध्यायाला 'सूरह' म्हटले जाते. यापैकी काही अध्याय फारच मोठे आहेत. उदा. सूरह बकरा, तर काही अध्याय अत्यंत लहान आहेत उदा. सूरह अहद. प्रत्येक अध्यायाला एक स्वतंत्र नाव आहे. परंतु ही सांकेतिक नावे आहेत. कारण मोठ्या अद्यायात अनेक विषयांवर चर्चा आलेली आहे. कुरआनच्या श्लोकांना (वाक्यांना) 'आयत' म्हटले जाते.

कुरआनमध्ये आपले जीवन कसे जगायचे, आईवडिलांची सेवा कशी करायची, मुलांना चांगले शिक्षण देण्याचे नियम दाखविले, गरिबांना आधार कसा द्यायचा, पत्नीचे अधिकार, शेजाऱ्यांचे अधिकार, नातेवाईकांचे अधिकार असे खूप काही आपल्या जीवनाबद्दल सांगितले आहे. जसे की कुरआनची ही आयत पाहू या. यात माणसाचे जीवन जगण्याचे मार्गदर्शन आहे.

"अल्लाहने तुम्हाला तुमच्या मातांच्या उदरातून निर्मिले, अशा अवस्थेत की तुम्ही काहीच जाणत नव्हता. त्याने तुम्हाला कान दिले, डोळे दिले, व विचार करणारे हृदय दिले याकरिता की तुम्ही कृतज्ञ बनावे." (कुरआन, २२:७८)

"हा एक ग्रंथ आहे, जो आम्ही तुम्हावर अवतरित केला आहे, जेणेकरून तुम्ही लोकांना अंधाराच्या गर्तेतून काढून प्रकाशाकडे आणावे." (कुरआन, १४:१)

"हे पैगंबर (स.), सावध करा यांना त्या दिवसापासून जेव्हा पृथ्वी व आकाशाचे मूळ रूप बदलले जाईल. आणि सर्वच्या सर्व एकमेव महान शक्तिमान अल्लाहसमोर उघडे पडून हजर होतील. त्या दिवशी तुम्ही अवराध्यांना पाहाल की साखळदंडाने हातपाय जखडलेले असतील, वितळलेल्या शिशाचा पोशाख केलेला असेल आणि आगीच्या ज्वाला त्यांच्या चेहऱ्यावर आच्छादल्या जात असतील. हे अशासाठी घडेल की अल्लाहने प्रत्येक जीवाला त्याने केलेल्या कृत्यांचा बदला द्यावा. अल्लाहला हिशेब घेण्यास काही वेळ लागत नाही." (कुरआन, १४:४८-५१)

हे ते मौलिक सत्या आहे ज्यावर या सृष्टीची व्यवस्था टिकून आहे. आपण या सृष्टीपासून वेगळे नाहीत तर त्यात आपण एका अंशासारखे राहत आहोत म्हणून आपल्या जीवनासाठीसुद्धा हे सत्य एक मूलभूत सत्य आहे. आज हा प्रश्न आपल्यापैकी प्रत्येकासाठी आणि जगातील सर्व माणसांसाठी चिंताजनक रहस्य आहे की, आज माणसाच्या जीवनातून शांती आणि सुखचैन नष्ट का झाले आहे? आज राष्ट्र राष्ट्राशी संघर्ष करत आहे. मनुष्य मनुष्यासाठी पशुवत बनला आहे. जगात चहूकडे बलवान शक्तिहीनांना गिळंकृत करत आहे. चहूकडे जगात अत्याचार, धोकाधडी आणि धर्माच्या आड अधर्म माजला आहे. आज मनुष्यस्वभावात आणि चारित्र्यात सत्यता शिल्लक राहिलेली नाही. शेवटी या सर्व दुराचारांचे कारण काय आहे? कारण आहे कुरआनपासून दुरावा आणि त्या एकमेव ईश्वराची आज्ञा न बाळगणे. म्हणून तुम्ही आपले जीवन या चुकीच्या विचारसरणीनुसार व्यतीत करीत राहिला तर त्याचे विनाशकारी परिणाम तुम्हा स्वतःलाच भोगावे लागतील. तुम्ही तुमच्या जीवनात मग कितीही कष्ट, उपासना करा आणि तुमच्या या चुकीच्या जीवनपद्धतीला तुम्ही कितीही सत्य ठरवित राहिलात तरी वस्तुस्थिती अजिबात बदलत नाही. एखाद्या नोकराला पगार देऊन तुम्ही तुमच्या नोकरीत ठेवले असेल तर त्याची वस्तुस्थिती काय आहे? तो तर तुमच्या आज्ञेचे नेहमी पालन करीत राहील, तुमच्या इच्छेनुसार वागत राहील आणि नोकराच्याच सीमेत राहील. बादशाहाच्या राज्यात राहून तुम्ही बादशाहीचा दावा कधीच करू शकत नाही. किंवा दुसऱ्याची बादशाही मान्य करून त्यांच्या आज्ञेचे पालन सुद्धा तुम्ही करू शकत नाही, अन्यथा तुम्ही विद्रोही ठराल आणि विद्रोहासाठीच्या शिक्षेला तुम्हाला सामोरे जावे लागेल.

या उदाहरणांवरून तुम्हाला कङून चुकले असेल की ईश्वराच्या य. अफाट साम्राज्यात आपली स्थिती दासाची आणि तीदेखील एका आज्ञाकारी दासाची आहे. तुम्ही स्वतःच्या मर्जीनुसार चालू लागला तर तोंडघशी पडाल. ईश्वराला जेव्हबा इच्छा होईल आमची बोळवण करील. मातीत मिसळून आपल्या शरीराचा एक एक कण छिन्विच्छिन्न लोईहल. तसेच अग्नीत जळून खाक होईल. तसेच आपले शरीर पाण्यात वाहून माशांचे भोजन बनले असेल किंवा समुद्राच्या पाण्यात विरघळून जाईल. तरीदेखील चहूकडून ईश्वर आपणास (संपूर्ण मानवजातीला) बोलावून एकत्र करील. तेव्हा ईश्वर तुम्हाला विचारील की, तुम्ही माझे दास होता तर बादशाहीचा दावा करण्याचा अधिकार तुम्हाला कोठून मिळाला? माझे दास असून तुम्ही दुसऱ्याचे दासत्व कसे स्वीकारले? हा विद्रोह तुमच्यासाठी कसा उचित ठरला? सांगा, तुमच्यापैकी कुणाजवळ या प्रश्नाचे उत्तर आहे? कोणता वकील आपले कायद्याचे डावपेच वापरून तिथे बचावासाठी मार्ग काढणार? आणि कोणत्या शिफारशीवर तुम्ही भरोसा ठेवता की ज्यामुळे तुम्हाला या विद्रोहाच्या गुन्ह्याची शिक्षा भोगण्यापासून वाचविल?

आपण सर्वजण परीक्षा देत आहोत. आमच्या बुद्धीची, आमच्या हृदयाची, आमच्या कर्तव्याची आणि आमच्या ईश्वरोपासनेची कठीण परीक्षा आहे. आता आमच्यापैकी प्रत्येकाला स्वतः कठीण निर्णय घ्यावयाचा आहे की तो आपल्या निर्माणकर्ता प्रभूचा विश्वासू आणि सच्चादास बनू इच्छितो की नमकहराम दास? हा निर्णय घेण्यास तुम्ही स्वतंत्र आहात. मनुष्याने हा मार्ग स्वीकारायचा की तो मार्ग स्वीकारायचा हे त्याच्या मनावर आहे. कुरआनमध्ये पण अल्लाहने स्पष्ट केले आहे की,

"धर्माच्या बाबतीत कोणतीही जोरजबरदस्ती नाही. सत्य असत्यापासून वेगळे केले गेले आहे." (कुरआन, २:२५६)


 - तबस्सुम परवीन

पुसद


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget