Halloween Costume ideas 2015

महानाट्य रंगमंच

नाव बदल” प्रकरणाला उधाण आलंय. सर्वसकट धार्मिक अस्मिता चिकटवत, चिथावण्याचा कर्मठ मार्ग खुला झालाय. गाव, वाड्या, रस्ते, पूल, पुतळे योजना, शहरे यांची नावे बदलून ’मासपिपल’ वर सातत्याने ’माकड’ होण्याची प्रक्रिया लादली जातेय. माध्यमाच्या उथळ चर्चेचा मारा करून फेक न्यूजचा सुळसुळाट होत आहे. टी.व्ही. मालिका, सिनेमा ही प्रभावी माध्यम द्वेष उदात्तीकरणातून प्रचंड बळकट होत आहेत. नको त्या मुल्यप्रतिमांचा गोडवा अति षडयंत्री हुशारीने समाजमनापर्यंत पोहचवला जातोय. राफेल असो किंवा नोकरी रोजगाराचे प्रश्नावर अस्मितेची चादर टाकून केवळ नारील्या धर्मांधतेची झापडं / चष्मे फुकटात विकले जात आहेत. एकूण 2019 च्या राजकीय प्लॅटफॉर्मची रंगीत तालीम आणि तयारीचं महानाट्य रंगलय. या महानाट्यावर आपण सगळे मूक प्रेक्षक बनून राहिलोय.
    बरं यावर बोलण्यासाठी लिहिण्यासाठी सरसावणार्या हातांना बळ देण्याऐवजी चळवळींच्या फसव्या मुखवट्यांतून आपण बहुतेक अशा चांगल्या मंडळीचे हे खच्चीकरण करतोय. सर्वच मुद्दे, खोटे रेटून बोलणारे हिंदूत्वापर्यंत आणि पर्यायाने फॅसिझमपर्यंत नेतायेत. मौनाची मुक संमती भयभीतपणे आपण यांचे गुलाम होतोय.
    कोणत्याही खर्या समस्यावर, देशाची असहिष्णुता, असमतोलपणावर न बोलता, ध्रुवीकरणाच्या मुद्याला खतपाणी घालणारी बेताल वक्तव्य दोन्हीकडून होताहेत. बहुजन प्रतिके, महामानव, विचारवंतांना संपवून किंवा त्यांना समरसतेच्या बाजूने वळवून विवेकी विचाराला मुर्खत्वात काढणार्या अंधभक्तीच्या गर्दीत आपण हरवतोय. अलिकडेच पुतळे आणि शहरांच्या नामकरणातून तसेच मौलाना मदनी ते ओवेसींच्या नेतृत्वाबद्दलच्या सहेतूक वक्तव्यातून अभिजन बहुजनाचा वाद चव्हाट्यावर येतोय. दाक्षिणात्य पेरूमल मुरूगन पासून सडेतोड बोलणार्या अभिनेता प्रकाशराजच्या पाठीशी आपण किती कसे उभे राहिलो? बच्चनच्या पिक्चरला गर्दी करून हजारोंची दिवाळी करणार्यांनी कधी जनआंदोलनाचा उडालेला बोजवारा पाहिलाच नाही का? टिळकांपासून डॉ. घाणेकर काशिनाथच्या बायोपिक फिल्मस् मधून उजव्या नव्या मुल्यांना सर्वमान्य बनविणार्या कृतीतून आपण तारीफ करत राहिलोय. तर ’स्वतःला’ ’अर्बननक्सल’ म्हणून पुढे येणार्या गिरिश कर्नाड वगैरे प्रभूतीचे काय? पर्यावरण, सिंचन, बेरोजगारी, महागाई, भगवी पाठ्यपुस्तके, सामाजिक सुरक्षा आणि उद्योग, नोटबंदी यासारख्या मुद्दयांवर योग्य न बोलता.. केवळ संवैधानिक तरतुदींशी जमेल तेवढी प्रताडणा करत दुस्वास करण्याचा पायंडा घट्ट होतोय. सनातनी प्रतिगाम्यांचे मुद्दे खोडून टाकताना देखील व्यवस्थापुरक बुद्धीवादी उथळपणात मश्गुल करण्यात येताहेत. दोनेक दिवसात नव्या फसव्या मुद्दयांचा बाजार भरविला जातो. हळूहळू चर्चा रंगविली जाते. मोबाईलच्या छोट्या स्क्रीनपासून मल्टीप्लेक्सच्या महागड्या उच्चभ्रू मुव्हीजपर्यंत आणि साध्या बॅनरपोस्टरपासून डिजीटली फ्लेक्सपर्यंत नवीन प्रश्नांकित मुद्दा पेरला जातो. मुद्दे बळकट करून, जाहिरातींचा पाऊस मोठा, पैसा मोठा आणि सत्य खोटे होतेय. वाचनाचा अभाव, इतिहासाबद्दलची निव्वळ भावनिक मिमांसा, गुलामीनशेची बेहोशी यामुळे सध्याच्या स्थिती आणि येणार्या पिढींच्या भविष्याची आपण वाट लावतोय. आता सजगसुजाण असणार्यांनी सरळ मुद्दयांवर व्यक्त व्हावं..भावनिकतेच्या टेंपररी मृगजळापाठी लागून ’एकता’ संपविण्याच्या कटात आपण नाही, एवढंच समाधान न माणता या संघी षड्यंत्राला मोडून काढण्यास्तव विवेकी संयमित व्यवस्थेचे वाहक होण्यासाठीचे प्रवासी ठरू.नाहीतर काल्पनिक मनोरे रचत, रंजनाचा खूळखूळा भुलत, उलट्या भूतमय प्रवासाची वळण आपल्याला खाऊन टाकतील हे नक्की!
मुख्तसर सा गुरूर भी जरूरी है जीने के लिए,
ज्यादा झूक के मिलो तो पीठ पायदान बन जाती है
 
- साहिल शेख
8668691105
Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget