Halloween Costume ideas 2015

विचार करण्याची गोष्ट

- मुहम्मद फारूक खान

परलोकाची धारणा ही अत्यंत तर्कसंगत धारणा आहे. या धारणेत अशी कोणतीही बाब नाही, जी बुद्धी आणि तर्काशी विपरित असावी़ शिवाय कोणत्याही लोकाची धारणा अथवा कल्पना माणसाच्या परिचयाची मुळीच नसते़ अशातलाही भाग नाही़ कारण वर्तमानलोक अर्थातच इहलोक हेसुद्धा एक अशी वास्तविकता आहे, ज्यात आपण श्वास घेतो, जगतो आहोत़ आश्चर्याची बाब अशी की जगात राहून जगाचा इन्कार करण्याप्रमाणेच ठरेल़
  
विचार करण्यासाठी बाब अशी की, जर या जीवनाशिवाय अथवा इहलोकाशिवाय अन्य एखादे जीवन अथवा परलोक असणे शक्य नसेल तर मग हे जीवन अथवा इहलोक असे शक्य झाले? ही बाबही लक्षणीय होय आपण लहान बाळाला पाहतो की ते नेहमी लहान बाळ राहत नसते़ वयानुसार त्याच्यात वाढ होत असते़ या लहान मुलांचे युवकामध्ये रूपांतर होते़ मग जर हे एका निश्चित समयी एखादे विकसित रूप धारण करणारे असेल तर यामध्ये आश्चर्य वाटू नये़ एक वेळ अशी देखील येईल की, या गतीशील जगताच्या कार्यपरिक्रमाचे विशिष्ट चरण पूर्ण झाल्यावर ते अन्य एखादे विकसित स्वरूप धारण करणार असेल तर यात आश्चर्य वाटण्याचे कोणतेही कारण नाही़ उदाहरणार्थ, रात्र संपल्यावर दिवस उगवतो सर्वत्र प्रकाश पडतो आणि असे वाटते की पूर्ण जगच बदलून गेले़ मात्र बदललेले काहीही नसते़ आपणही तेच असतो आणि जगही तेच असते़ फक्त प्रकाशाचीच काय तेवढी वाढ झालेली असते़ दिवसाच्या प्रकाशात त्या सर्व वस्तु स्पष्ट दिसू लागतात, ज्या रात्री अंधारामध्ये दिसत नव्हत्या़ अगदी मोठमोठे पर्वतसुद्ध रात्रीच्या काळोखात अदृष्य झालेली असतात आणि दिवसा आपल्याला एखादा कणसुद्धा दिसतो़ ज्याअर्थी सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर पडताच या विश्वात एक महान परिवर्तन घडते, तर मग एखाद्या अशा जगताची कल्पना करणे कोणत्या आधारावर अशक्य आहे की या जगातील अन्याय, दु:ख, असत्य, अपरिपूर्णता व अज्ञानाचा अंधकार दूर होऊन सत्य, न्याय, परिपूर्णता, समाधान आणि सर्वत्र सुख-शांतीचा प्रखर प्रकाश पडेल, असत्य आणि दु:खाच्या अंधारात न दिसणाऱ्या समस्त बाबी आपल्यासमोर स्पष्ट होतील! कुरआनात म्हटले आहे़
“पृथ्वी आपल्या पालनकर्त्याच्या तेजाने उजळून निघेल, कर्माची नोंदवही समोर ठेवण्यात येईल, सर्व प्रेषित आणि साक्षीदार हजर केले जातील़ लोकांच्या दरम्यान सत्याधिष्ठित निर्णय दिला जाईल, त्यांच्यावर कोणताही अन्याय होणार नाही आणि प्रत्येकजनाला जी काही कर्मे त्याने केली होती, त्यांचा पुरेपूर बदला देण्यात येईल़” (कुरआन : 39-69)
    जगामध्ये व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असल्याचे आपण पाहतो़ सर्वांचे स्वभाव आणि आवडी-निवडी भिन्न आहेत, सर्वांचे कर्म आणि कार्य वेगवेगळे आणि सर्वच भल्या-बुऱ्या कर्मांत व्यस्त आहे़ याचे वास्तविक कारण एवढेच आहे की, माणसाने जगत आणि जीवनाच्या वास्तविकतेच्या प्रकट असलेल्या रहस्यावर सर्वांगाने विचार करणे शक्य व्हावे़    
    या वर्तमान जीवनासंबंधीसुद्धा साधारण माणूस सहसा जास्त विचार करीत नाही़ आज ज्ञान, संशोधन आणि माहिती तंत्रज्ञानाच्या काळातसुद्धा आणखीन असे असंख्य रहस्य आहेत ज्यावर अद्यापही प्रत्यक्षपणे प्रकाश पडला नाही़ शेवटी आपल्या विचारशक्ती आणि विवेकबुद्धीच्या आधारेच मानवास हे स्वीकारण करणे भाग पडले की त्याला ज्ञात असलेल्या असंख्य बाबींव्यतिरिक्त आणखीनही बऱ्याच बाबी अशा आहेत ज्या अद्यापही त्याला माहीत नाहीत अगर त्याच्या माहिती क्षितिजापलीकडे आहेत़ कुरआनाने मानवाच्या ज्ञानमर्यादा अशा शब्दांत स्पष्ट केले आहे़
” तुम्हाला बस थोडेसेच ज्ञान मिळाले आहे!” (कुरआन : 17-85)
    एखाद्या घन पदार्थास पाहावयाचे असल्याच त्याचा फक्त तीन टक्के भागच दिसतो़ एवढी मर्यादा त्याच्या माहिती व ज्ञानावर आहे़ म्हणूनच फक्त वरचा दर्शनीय भाग पाहून एखाद्या वस्तूची परिपूर्ण व्याख्या करणे आणि त्याचे विश्लेषण करणे कधीही कोणालाही शक्य नसते़ यासाठी मात्र काही न दिसणाऱ्या बाबी ग्राह्य धरण्यात येतात, काहीचा संबंध जोडावा लागतो आणि विविध पैलूंनी विचार करावा लागतो़ (क्रमश:)

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget