Halloween Costume ideas 2015

अल्बकरा : ईशवाणी (सुबोध कुरआन)

(२१७) ...हेच ते लोक आहेत जे नरकवासी आहेत आणि सदैव नरकातच खितपत पडतील.२३३ (२१८) आणि ज्या लोकांनी ईमान धारण केले आणि ज्यांनी अल्लाहच्या मार्गात घरादाराचा त्याग केला आणि जिहाद केला२३४ हेच लोक अल्लाहच्या कृपेची आशा करतात. अल्लाह यांच्या उणिवांना माफ करील आणि आपल्या कृपेचा त्यांच्यावर वर्षाव करील. (२१९) ते तुम्हाला दारू आणि जुगाराविषयी विचारतात. त्यांना सांगा की दोन्हीमध्ये मोठी खराबी आहे. जरी त्यामध्ये लोकांसाठी काही लाभ आहे परंतु त्यांचा अपराध त्यांच्या लाभापेक्षा अधिक मोठा आहे.२३५ ते तुम्हाला विचारतात की अल्लाहच्या मार्गात काय खर्च करावा? सांगा,जे काही तुमच्या आवश्यकतेपेक्षा अधिक असेल.२३५(अ) अशाप्रकारे अल्लाह तुम्हाला स्पष्ट आदेश देत आहे जेणेकरून तुम्ही चिंतन करावे भौतिक आणि मरणोत्तर जीवनाचे. (२२०) ते तुम्हाला अनाथांविषयी विचारतात. त्याना सांगा, त्यांच्या उद्धारासाठी जो काही अवलंब कराल तो उत्तम असेल.२३६ आणि त्याना तुम्ही आपल्यासोबत खर्च व राहण्यासाठी सामील कराल तर काहीच हरकत नाही शेवटी ते तुमचे भाऊबंदच आहेत. आणि अल्लाह  अनाचारी आणि सुधारकांना चांगल्याप्रकारे जाणतो. आणि अल्लाहने इच्छिले असते तर याविषयी तुम्हाला त्याने अडचणींत टाकले असते नि:संशय अल्लाह प्रभुत्वशाली आणि तत्वदर्शी आहे.

२३३) मुस्लिमांमधील काही भोळेभाबडे लोकांच्‌या मनावर नेकी आणि समझोत्याविषयीचा एक चुकीचा विचार घर करून बसला होता. ते मक्केतील अश्रद्धावंत, द्रोही लोक आणि यहुदी लोकांच्‌या वरील आक्षेपाने प्रभावित झाले होते. या आयतद्वारा त्यांना समजून सांगण्यात आले की, तुम्ही अशी अपेक्षा करू नका की तुमच्‌यात आणि त्यांच्‌यात समेट घडून येईल. त्यांचे आक्षेप समेटासाठी नाहीत तर ते तुम्हाला बदनाम करू इच्छितात. त्यांना हे खटकत आहे की तुम्ही त्या जीवन धर्माला का स्वीकारले आहे आणि त्याकडे जगाला का बोलवता? जोपर्यंत ते आपल्‌या विद्रोहावर अडून बसले आहेत आणि तुम्ही या जीवन धर्मावर कायम आहात, तोपर्यंत तुमच्‌यात आणि त्यांच्‌यात समेट होणार नाही. (यांच्‌यापासून सावध राहा. हे तुमचे कट्टर शत्रु आहेत. ते) तुम्हाला सत्यधर्माशी दूर करून नरकाग्नीत कायमचे ढकलून देण्यास तत्पर आहेत.
२३४) जि हादचा अर्थ होतो एखाद्या ध्येयाला प्राप्त करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणे. जिहाद हा केवळ युद्धाचा समानार्थ नाही. युद्धासाठी तर "किताल' हा शब्‌द प्रयोग होतो. जि हाद यापेक्षा व्‌यापक अर्थ ठेवून आहे आणि यात प्रत्येक प्रकारचे प्रयत्न सामील आहेत. मुजाहिद त्या व्‌यक्तीला म्हणतात, जो क्षणोक्षणी आपल्‌या ध्येयप्राáीच्‌या ध्यासामध्ये राहातो. बुद्धीने त्याच्‌यासाठी विचार करतो, मुखाने आणि लेखणीने त्याचाच प्रचार करतो, हातापायाने त्याच्‌याचसाठी धावपळ करतो. आपली संपत्ती त्यासाठी खर्च घालतो आणि त्या प्रत्येक अडथùयांचा आपल्‌या शक्तीनिशी सामना करतो जे ध्येयपूर्ती मार्गात येतात. जेंव्हा प्राण अर्पण करण्याची वेळ येते तेंव्हा खुशीने प्राणार्पण करतो. याचे नाव आहे जिहाद आणि अल्लाहच्‌या मार्गातील जिहाद हे आहे की हे सर्वकाही अल्लाहच्‌या प्रसन्नताप्राप्तीसाठी आहे. जि हाद करण्याचा एकमात्र उद्देश हाच आहे की अल्लाहने अवतरित केलेला जीवनधर्म (इस्लाम) त्याच्‌या भूमीवर स्थापित व्‌हावा आणि अल्लाहचे बोल (कलमा) साèया वचनांवर वर्चस्वी ठरावे. याव्‌यतिरिक्त मुजाहिदचे दुसरे कोणतेच जीवन ध्येय असत नाही.
२३५) दारू आणि जुगार विषयीचा हा पहिला आदेश आहे, ज्‌यात याला फक्त अप्रिय म्हटले गेले आहे. जेणेकरून मनाने आणि बुद्धीने यांची अवैधता स्वीकारण्यास तयार व्‌हावे. नंतर  दारू सेवन करून  नमाज   पढण्यासाठी मनाई केली   गेली  व  शेवटी  दारू, जुगार  आणि  इतर  सर्व अशा  गोष्टींना  निर्विवाद  हराम (अवैध)   ठरविले    गेले. (पाहा  कुरआन ४:४३, ५:९०)
235अ) या आयतचे आजकाल विचित्र अर्थ काढले जात आहेत. परंतु आयतच्‌या शब्‌दरचनेवरून स्पï कळून येते की लोक आपल्‌या संपत्तीचे मालक होते. प्रश्न हा विचारत होते की आम्ही अल्लाहच्‌या प्रसन्नता प्राप्तीसाठी काय खर्च करावा? सांगितले गेले की त्या संपत्तीतून प्रथम आपली गरज पूर्ण करा नंतर जे उरले त्याला अल्लाहच्‌या मार्गात खर्च करा. हा आपल्‌या मर्जने केलेला खर्च आहे जो दास आपल्‌या निर्माणकत्र्या प्रभुच्‌या मार्गात स्वखुशीने खर्च करतो.
२३६) या आयतचे दिव्‌य अवतरण होण्यापूर्व कुरआनमध्ये अनाथांच्‌या अधिकारांचे रक्षण करण्यासाठी सतत कडक आदेश आले होते आणि हेसुद्धा बजावून सांगितले गेले, ""अनाथांच्‌या संपत्ती जवळसुद्धा फिरकू नका.'' तसेच ""जो कोणी अनाथांची संपत्ती अत्याचाराने हडप करतो तो आपले पोट आगीने भरतो.'' या कडक आदेशांना ऐकून ते लोक ज्‌यांच्‌या देखरेखीखाली अनाथ मुले होती; इतके भयभीत झाले की त्यांनी अनाथांचे खाणेपिणेसुद्धा आपल्‌याशी वेगळे करून टाकले. इतकी सावधानी केल्‌यावरसुद्धा त्यांना भीती होती की अनाथांची संपत्ती त्यांच्‌या संपत्तीत मिसळून जाऊ नये. याचसाठी त्यांनी पैगंबर मुहम्मद (स.) यांच्‌याशी माहीत करून घेतले की या अनाथ मुलांशी आम्ही कशी वागणूक ठेवावी?

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget