‘लंकेश पत्रिका’ या कन्नड वृत्तपत्राच्या संपादिका आणि कट्टर उजव्या विचारसरणीच्या महिला यांची काही समाजकंटकांनी हत्या केली. ही एक भारतीय समाजाला कलंक लावणारी घटना आणि लेखनस्वातंत्र्य, सत्य विचार मांडणे आणि त्यावर बोलणे राजकारण्यांना पटत नाही म्हणून.
यापूर्वी अंधश्रद्धेविरूद्ध लढा देणारे कट्टर विचारवंत असलेले डॉ. दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी यांची हत्या याच प्रकरणातून झालेली आहे. अद्याप या हत्यांचा छडा लागू शकला नाही. त्यामुळे गुन्हेगार मोकाट भटकत आहेत. त्यांना राजकीय आसरा असल्यामुळे त्यांना अटक होणे शक्य नाही. त्याचप्रमाणे आता झालेल्या हत्येच्या प्रकरणाबाबत काय होईल? याची शाश्वती नाही. हेही गुन्हेगार पडद्याआड लपविले जातील काय? हा प्रश्न आहे.
आमच्या मते गौरी लंकेश यांच्या कट्टर विचाराला उत्तर देण्याची त्यांची क्षमता नाही म्हणून हे कृत्य करीत असतात. परंतु ते अशा कट्टर विचारधारकांच्या विचाराला मारू शकत नाहीत, कारण तेच विचार घेऊन अनेक विचारवंत, पत्रकार, विद्वान निर्माण होऊन तेच विचार तेजत ठेवून नवभारत निर्माण करू शकतात आणि हे विचार अमर ज्योत राहतात.
‘‘या विचारांचा लढा कधीच ते संपवू शकत नाहीत, कलमकार तुटू शकतो, परंतु कलम तुटू शकत नाही. समाजकटंकांनो राखा याद, नका लागू विचारवंतांच्या नादी, फसेल तुमच्या गळ्यात फास!’’
- नजीर अहमद एम. अत्तार, पुणे.
Post a Comment