Halloween Costume ideas 2015

अल्बकरा : ईशवाणी (सुबोध कुरआन)

अलबकरा
(२१०) (सर्व मार्गदर्शन व उपदेशां नंतरसुद्धा लोक सरळमार्गावर येत नाहीत) तेव्हा-काय ते या गोष्टीच्या प्रतिक्षेत आहेत की, अल्लाहने मेघांच्या छत्रावर आरूढ होऊन देवदूतांच्या थव्यासह स्वत: येऊन निर्णय करावा?२२८ शेवटी सर्व गोष्टी अल्लाहपुढेच सादर होणार आहेत. (२११) इस्राईलच्या संततीला विचारा की आम्ही त्यांना किती स्पष्ट संकेत दिले. (शिवाय हेही विचारा की) अल्लाहची कृपा (ईशमार्गदर्शन) प्राप्त झाल्यानंतर जो समाज त्या कृपेला विकृत करतो त्याला अल्लाह कशी कठोर शिक्षा देतो.२२९ (२१२) ज्या लोकांनी नाकारण्याची नीती अवलंबिली त्यांच्यासाठी भौतिक जीवन अत्यंत प्रिय आणि मनाला आवडेल असे बनविलेले आहे. असे लोक ईमानधारकांचा उपहास करतात परंतु पुनरुत्थानाच्या दिवशी धर्मपरायण लोक त्यांच्या तुलनेने उच्च स्थानावर असतील. उरली भौतिक जीवनाची उपजीविका त्याविषयी अल्लाहला अधिकार आहे की ज्याच्यासाठी इच्छिल त्याला अगणित देतो. (२१३) प्रारंभी लोकांचा एकच धर्मसमूह होता (नंतर ही स्थिती राहीली नाही आणि मतभेद माजले) तेव्हा अल्लाहने  पैगंबर पाठविले जे शुभवार्ता देणारे आणि सावधान करणारे आणि त्यांच्यासोबत ग्रंथ अवतरले त्यांच्यामध्ये निर्णय करण्यासाठी ज्यामध्ये ते मतभेद करीत होते. मतभेद त्यांनी निर्माण केला ज्यांच्याकडे सत्याचे ज्ञान दिले होते. त्यांनी स्पष्ट मार्गदर्शन प्राप्त झाल्यानंतर आपसांतील दुराग्रहामुळे त्यामध्ये मतभेद केले२३०... 

२२८) हे शब्द चिंतन करण्यायोग्य आहेत. येथे एका महत्वपूर्ण तथ्याला प्रकाशित करण्यात आलेले आहे. या जगात मनुष्याची खरी परीक्षा यातच आहे की तो सत्याला न पाहता मान्य करतो किंवा नाही. मान्य केल्यानंतर इतके नैतिक सामथ्र्य ठेवतो की नाही, की अवज्ञेचे स्वातंत्र्य असूनही आज्ञापालन करतो. याचमुळे सांगितले जात आहे, की त्यावेळेची वाट पाहू नका जेव्हा अल्लाह आणि त्याच्या साम्राज्यातील कार्यकर्ते (फरिश्ते) दूत स्वत:समोर येऊन ठेपतील. तेव्हा तर निर्णयच घेतला जाईल. ईमान धारण करणे आणि आज्ञापालनाच्या मार्गांचा स्वीकार करणे याचे वास्तविक महत्व आणि मूल्य तोपर्यंतच आहे जोपर्यंत वास्तवता  तुमच्या जाणीवेपासून लपलेली आहे आणि तुम्ही केवळ तर्काने तिला मान्य करून आपल्या बुद्धी कौशल्याचे आणि स्वेच्छेने त्याचे अनुपालन करून आपल्या नैतिक सामथ्र्याचा तुम्ही पुरावा देता. परंतु जेव्हा सत्य समोर येईल आणि डोळे फाडून तुम्ही पहाल की अल्लाह आपल्या महान राजसिहांसनावर आसनस्त आहे आणि या समस्त सृष्टीचे राज्य त्याच्याच आदेशाने चालत आहे आणि हे ईशदूत जमीन व आकाशांच्या व्यवस्थापनात व्यस्त आहेत. तुमचे अस्तित्व त्याच्या मुठीत बेबस जखडलेले आहे. अशावेळी तुम्ही ईमान आणले आणि आज्ञापालनास तयार झालात तर याचे मूल्य शून्य आहे. त्या वेळी तर कट्टर विद्रोही, कट्टर अपराधी आणि अवज्ञाकारीसुद्धा विद्रोहाचा, अपराधाचा आणि अवज्ञेचा विचार करू शकणार नाही. ईमान आणण्याची आणि आज्ञापालन करण्याची सवलत तोपर्यंतच आहे जोपर्यंत पडदा उठण्याची वेळ येऊन ठेपत नाही. जेव्हा ती वेळ आली तर मग सवलत नाही की परीक्षा नाही. ती वेळ तर निर्णयाची वेळ असेल, निकालाची वेळ असेल.

२२९) या प्रश्नासाठी बनीइस्राईलची निवड दोन कारणामुळे केली गेली होती. एक तर पुरातन निशाण्यांच्या निर्जव अवशेषाऐवजी जिवंत लोकसमुदाय उत्तमरित्या शिक्षण व प्रशिक्षण प्राá करण्यास योग्य आहे. दुसरे म्हणजे बनीइस्राईल असा लोकसमुदाय होता ज्यांना ईशग्रंथ आणि ईशदुतत्वाची मशाल देऊन जगाच्या मार्गदर्शनासाठीच्या अधिकारपदावर नियुक्त करण्यात आले होते. त्यानी नंतर दुनियादारी, दांभिकता, कपट आणि ज्ञान व व्यवहाराच्या भ्रष्टतेत लिá होऊन या वरदानापासून स्वत:ला वंचित ठेवले. आता ज्या लोकसमुदायाला या जगाच्या नेतृत्वाच्या अधिकारपदावर नियुक्त केले आहे, त्यास उत्तम शिकवण आणि प्रशिक्षण तर बनीइस्राईलच्या परिणामापासून आणि  दु:स्थितीपासूनच मिळू शकते.
२३०) अनभिज्ञ लोक जेव्हा आपल्या अटकलीने धार्मिक इतिहास रचतात तेव्हा वर्णन करतात की प्रथमत: मनुष्याने आपल्या जीवनाची सुरवात अनेकेश्वरत्वाच्या अंधारातूनच केली होती. नंतरच्या काळात प्रगतीद्वारे अंधकार नष्ट होत गेला आणि त्याजागी प्रकाश आला. प्रकाश फैलावत गेला आणि मनुष्य एकेश्वरत्वाच्या प्रकाशापर्यंत येऊन पोहचला. याच्याविरुद्ध कुरआन स्पष्ट करतो की जगात मानवीजीवनाची सुरवात पूर्ण प्रकाशात झाली. अल्लाहने ज्या मानवाला सर्वप्रथम निर्माण केले होते, त्याला माहीती करून दिली होती की, सत्य काय आहे आणि सरळमार्ग कोणता आहे. यानंतर काही काळापर्यंत आदमची संतती सरळमार्गावर चालत राहिली आणि एक सत्यवादी समुदाय बनून राहिली होती. नंतर लोकांनी नवनवीन मार्ग शोधून काढले आणि वेगवेगळया रूढी परंपरांना चिटकून बसले आणि मार्गभ्रष्ट झाले. हे यामुळे घडले नव्हते की त्यांना सत्याचे ज्ञान व माहीती दिली नव्हती. परंतु लोकांनी सत्याला जाणूनसुद्धा काही लोक विशेषाधिकार प्राप्तीसाठी एक दुसऱ्यावर अत्याचार व अन्याय करू लागले होते. याच मार्गभ्रष्टतेला दूर करण्यासाठी अल्लाहने वेळोवेळी पैगंबरांना पृथ्वीवर नियुक्त केले. या पैगंबरांना आपापल्या नावाने एक एक नवीन धर्म बनविण्यासाठी जगात अल्लाहने नियुक्त केले नव्हते. सर्व पैगंबरांना अल्लाहने तर यासाठीच नियुक्त केले होते की लोक ज्या सत्यमार्गाला विसरुन गेले होते; त्याला त्यांच्यासमोर स्पष्ट करावे. त्या सत्यमार्गाला प्रकाशमान करावे आणि लोकांना पुन्हा एक समुदाय बनवावे.

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget