Halloween Costume ideas 2015

चिंतन ते आचरण - मानव आदराचा प्रवास

-मुहम्मद सलमान अहमद
(अध्यक्ष, एस.आय.ओ. दक्षिण महाराष्ट्र)

१) प्रेम व बंधुभाव
मानवतेच्या आदराच्या मार्गातील महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे मानवतेविषयी प्रेम असणे ही होय. तो समाज की ज्यामध्ये मानवतेशी प्रेमाच्या भावनेला स्थान नसते. तो कायद्याच्या भीतीने काही प्रमाणात तर
सहिष्णूतेच्या मार्गाचा अंगिकार करू शकतो. परंतु खऱ्या अर्थाने तो मानवतेच्या आदराचा अधिकार पार पाडू शकत नाही. कारण मानवतेचा आदर ही एक अशी भावना आहे की जिला कायद्याच्या बळावर किंवा जोरजबरदस्ती करून कुठल्याही समाजावर लादता येत नाही. तर ती मनामध्ये व माणसाच्या मानसिकतेतून घडणारी एक प्रक्रिया आहे. ज्याची प्रचिती व्यक्ती व समाजाच्या आचरणातून दिसून येते. आम्ही पाहतो की ज्या समाजात प्रेम व सहानुभूतीचा अभाव असतो तेथे कायद्याची सक्ती देखील निरर्थक ठरते. ईश्वराच्या या धरतीवर अलिकडील काळात घटित होणाऱ्या हिंसाचाराच्या घटना व मानवाधिकारांची होणारी पायमल्ली, अपराध, दहशत, दंगे, सामूहिक हल्ले या सर्व घटनांवरून हे स्पष्ट होते की आज मानवतेला प्रेम, सहानुभूती व बंधुभावाची नित्तांत गरज आहे. या प्रेम, सहानुभूती व बंधुभावाचे वर्तुळ जितके विस्तीर्ण होईल तेवढ्याच प्रमाणात समाजामध्ये मानवतेविषयी आदरभावाचा विस्तार होऊ शकेल.
इस्लामी शिकवणच तो एक सफल उपाय आहे जी तुकड्यांच्या स्वरूपात विखुरलेल्या संपूर्ण मानवजातीला पुन्हा एकदा एकात्मता व बंधुभावाच्या माळेत गुंफून टाकू शकते.
‘‘लोकहो, आम्ही तुम्हाला एका पुरूष व एका स्त्रीपासून निर्माण केले आणि मग तुमची राष्ट्रे आणि वंश बनविले जेणेकरून तुम्ही एकमेकांना ओळखावे. वास्तविकत: अल्लाहजवळ तुमच्यापैकी सर्वात जास्त प्रतिष्ठित तो आहे जो तुमच्यापैकी सर्वात जास्त ईशपरायण आहे. निश्चितच अल्लाह सर्वकाही जाणणारा आणि खबर राखणारा आहे.’’ (कुरआन ४९:१३)
‘‘संपूर्ण मानवजाती अल्लाहचे कुटूंब आहे’’ (बहेकी)
संपूर्ण मानवजाती एकाच ईश्वराची निर्मिती व एकाच मात्यापित्याची संतती असणे हा विचार जागतिक बंधुत्वाचा असा आदर्श प्रस्तुत करतो ज्याला देश, वर्ण, पंथ, भाषा व संस्कृती सारखे खोटे दावे व संकुचित वृत्ती अजिबात तोडू शकत नाही. हा विचार जेथे मुस्लिम, हिंदू व अन्य समुदायांना एक दुसऱ्याचे रक्तपात करण्यापासून दूर ठेवण्याची क्षमता बाळगतो. तेथेच एकदुसऱ्यांच्या अधिकारांच्या रक्षणासाठी स्वत:च्या प्राणांची आहुती देण्यासाठी तयार करतो.
२) मूलभूत मानवाधिकार
मानवतेचा आदर या अधिकाराला मानवाच्या इतर मूलभूत गरजा उदा. धार्मिक स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, आचार विचाराचे स्वातंत्र्याच्या यादीमध्ये ठेवले जाऊ शकत नाही अपितु मानवतेचा आदर हा तो मूलभूत आधार आहे की ज्याच्यावर या अधिकारांची इमारत उभी राहते आणि हा आदर जन्मत: प्रत्येक मनुष्याला सारख्या प्रमाणात त्याच्या पालनकत्र्याकडून निश्चित करण्यात आला आहे. मानवाच्या मुलभूत अधिकारांची यादी ही फार लांबलचक आहे. परंतु याच्यापैकी काही महत्वपुर्ण अधिकार जे इतर अधिकारांच्या बाबतीत सहाय्यक ठरतात ज्यांचा उल्लेख भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत केला गेला आहे.
१) न्याय (सामाजिक, आर्थिक व राजनैतिक)
२) स्वातंत्र्य (विचार, अभिव्यक्ती, धार्मिक व उपासनाविषयक)
३) समानता (अवस्था व संधी)
या अधिकारांच्या उल्लेखासोबतच घटनेच्या प्रस्तावनेतील हे मूलभूत अधिकार सर्व नागरिकांना मानवीय आदर व राष्ट्रीय बंधुभाव व एकात्मतेच्या वाढीवर भर देण्यासाठीदेखील ताकीद करण्यात आलेली आहे. कमी अधिक प्रमाणात का होईना संयुक्त राष्ट्र संघाच्या वतीनेही या मूलभूत अधिकारांची पूर्तता करण्यावर चर्चा घडवून आणण्यात आली आहे व या अधिकारांच्या रक्षणावर भर देण्यात आला आहे.
१) जगात सद्यस्थितीत शरणार्थींची संख्या ६५० लाखाहून अधिक आहे, जवळपास दर मिनिटाला २४ व्यक्ती आपलं घरदार सोडत आहेत. (एम्नेस्टी आंतरराष्ट्रीय अहवाल)
२) एका अंदाजानुसार केवळ युध्दात मारल्या गेलेल्यांची संख्या ही १२२ दशलक्ष व काहींच्या मते १६० दशलक्ष एवढी आहे. (मॅथ्यू व्हाइट)
३) केवळ भारतात दर १५ सेकंदाला एका पाच वर्षाखालील मुलाचा मृत्यू होतो. दरवर्षी जवळपास २ दशलक्ष योग्य औषधोपचार व वैद्यकीय सुविधेअभावी कुपोषणाचे बळी ठरत आहेत. (द गार्डीयन)
४) जगभरात दरवर्षी जवळपास ८ लाख लोक आत्महत्या करत आहेत. ज्यापैकी १७ टक्के म्हणजेच १ लाख ३५ हजार भारतीय आहेत. दर तासाला एक विद्यार्थी आत्महत्या करतो. (एन.सी.आर.बी. -२०१५)
५) या वेळी जगातील जवळपास २१ दशलक्ष लोकसंख्या ही मानवी तस्करीची बळी ठरत आहे. दरवर्षी ६ ते ८ लाख लोक याचे बळी पडत आहेत. (युनिसेफ)
६) जगातील ५० टक्के धनसंपत्ती ही एवूâण लोकसंख्येच्या १ टक्का लोकांकडे आहे व उर्वरित ५० टक्क्यांवर ९९टक्के जनसंख्या जीवन जगत आहे. जगातील ६२ व्यक्तींजवळ जगातील ५० टक्के लोकांच्या एवूâण संपत्तीपेक्षा जास्त संपत्ती आहे. स्वत: भारतातही केवळ एक टक्का श्रीमंत मंडळी ही देशातील ५८ज्ञ्  संपत्तीचे मालक आहेत. (ऑक्सफॅम अहवाल)
७) जवळपास १० दशलक्ष जनता दरवर्षी म्हणजे प्रत्येक १० सेकंदाला उपासमारी व तीच्याशी निगडीत कारणाने मृत्यूमुखी पडत आहे. (यूएन फूट प्रोग्रॅम रिपोर्ट)
८) उपासमारी व तिच्याशी संबंधित अन्य गरजांपोटी ८२० दशलक्ष लोकसंख्या प्रभावित आहे. याच्यापैकी ३० टक्क्यांहून अधिक संख्या ही भारतीयांची आहे. भारतात या समस्येने पीडित जवळपास ३००० ते ७००० लोक आपले प्राण गमावत आहेत. दरवर्षी मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या ही जवळपास २५ लाख ऐवढी आहे. (यूएन अहवाल)
समस्यांच्या व अडीअडचणीच्या या घोर काळोखमय वातावरणात इस्लामी जीवनव्यवस्थाच एकमेव आशेचीे किरण आहे. ज्याच्या साहाय्याने जगातील मानवतेला जुलूम व अत्याचाराच्या या भयानक काळोखमय वातापरणातून मुक्ती मिळू शकते.
मानवाधिकारांच्या रक्षणाच्या संदर्भात इस्लामी शिकवणीचे आदर्श चित्र पवित्र कुरआन व प्रेषित (स.) यांच्या जीवन चारित्र्याच्या माध्यमाने व त्याचे प्रतिनिधी (खुल्फा-ए-राशिदा) यांच्या आचरणातून दिसून येते.
‘‘याच कारणास्तव बनी इस्राईलकरिता आम्ही हे फरमान लिहिले होते की, ‘ज्याने एखाद्या मानसाला खुनाबद्दला अथवा पृथ्वीतलावर उपद्रव पसरविण्याव्यतिरिक्त अन्य कारणाने ठार केले तर त्याने जणू काही सर्व मानवांना ठार केले. आणि ज्याने कोणाला जीवनदान दिले त्याने जणू काही सर्व मानवजातीला जीवन प्रदान केले.’ परंतु त्याची अवस्था अशी आहे की आमचे प्रेषित वरचेवर त्यांच्यापाशी उघड उघड आदेश घेऊन आले. तरीसुध्दा त्यांच्यात मोठ्या संख्येने पृथ्वीवर अतिरेक करणारे लोक आहेत.’’ (कुरआन ५:३२)
‘‘ती व्यक्ती श्रध्दावंत होऊ शकत नाही जी स्वत: पोटभर जेवते परंतु तिचा शेजारी उपाशी झोपतो.’’ (बहेकी)
मानवाधिकाराच्या या भागात इस्लामची ही शिकवण आपल्या मुलभूत अधिकारांपासून वंचित व अत्याचार पीडित जनता जी बहुसंख्येवर आधारीत आहे, तिच्या समस्यांचे निराकरण करीत समानता व न्यायावर आधारित समाजाची स्थापना करू शकते एका निरापराध व्यक्तीची हत्या व रक्षणाला संपूर्ण मनुष्यजातीची हत्या व रक्षणाशी जोडून, मानवी प्राणाला तो मान सन्मान व आदर इस्लामी शिकवणीनुसार प्रदान केला जातो की ज्याचा अंदाजही कोणी लावला नसेल. धनदौलतीवर मानवाला प्रभूत्व न देता त्याला ईश्वराची ठेव समजणे व नंतर तिला संपूर्ण मानवजातीवर खर्च करण्याची शिकवण देणे हा इस्लामी शिकवणीच्या आर्थिक व्यवस्थेचा तो उज्ज्वल पैलू आहे की जो आर्थिक विषमतेसारख्या शेकडो समस्यांचे निराकरण करण्याचे सामथ्र्य ठेवतो. जेथे आपल्या संस्कारमूल्यांशी निगडीत शिकवणीच्या आधारावर इस्लाम जुलूम व अत्याचाराचे मार्ग बंद करतो तेथेच समानता व न्याय तसेच शिक्षेच्या तरतुदीनुसार अपराधाच्या परिणामाला एक धडा म्हणून समाजापुढे प्रस्तुत करतो व समाजाला नवजीवन प्रदान करतो.
३) न्याय व समता
प्रेम आणि बंधुत्वासोबतच मुलभूत मावाधिकराच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण गोष्ट जी मानवी आदराच्या दृष्टिकोनातून आवश्यक आहे, ती म्हणजे समाजात समता व न्यायाची स्थापना करणे होय. समता व न्यायाशिवाय शांती व मानवतेची कामना करणे असे आहे जसे पिकांची खतपाण्याची काळजी न घेता चांगल्या दर्जेदार पिकाची अपेक्षा बाळगणे. जर समानता व न्यायाच्या संदर्भात देशाच्या वर्तमान परिस्थितीचा आढावा घेतला तर फार भयानक चित्र डोळ्यांसमोर उभे राहते. खालील मुद्यांच्या आधारे या बाबतीत थोडे अवलोकन केले जाऊ शकते.
१) २०१६ च्या सुरूवातीच्या पाच महिन्यात भारतात सांप्रदायिक दंगलींच्या २७८ घटना घडल्या. (गृहमंत्रालय भारत सरकार)
२) २०१५ मध्ये ३४,६०० पेक्षा जास्त बळजबरी अत्याचाराच्या घटना घडल्या. (एनसीआरबी-२०१५ अहवाल)
३) भारतात जवळपास २.८१ कोटी प्रकरणे न्यायालयात प्रलंबीत आहेत. (एनसीआरबी अहवाल)
४) २०१४ च्या अहवालानुसार देशात तुरुंगातील कैद्यांची संख्या ही ४,१८,५३६ एवढी आहे. ज्यांच्यापैकी ६८ जणांवरील आरोप अजून ही सिध्द झालेले नाहीत. (एनसीआरबी अहवाल)
५) मागील काही महिन्यांत झुंडीच्या माध्यमातून दहशतीच्या (मॉब लिंचिंग) घटना व त्यांच्यातून हत्या करण्याच्या घटना २० पेक्षा जास्त घडल्या आहेत. (इंडियन एक्सप्रेस)
समानता व न्यायाची स्थापना करणे ही मुस्लिम समुदायाची महत्त्वपूर्ण जबाबदारी आहे. या अनुषंगाने इस्लामची महत्त्वपूर्ण शिकवण पुढीलप्रमाणे आहे.                  (पान  ६  वर)
‘‘हे श्रध्दावंतांनो! न्यायाचे ध्वजवाहक बना आणि अल्लाहसाठी साक्षीदार बना, यद्यपि तुमच्या न्यायाचा व तुमच्या साक्षीचा आघात तुम्हा स्वत:वर अथवा तुमच्या आईबापावर व तुमच्या नातेवाईकांवर जरी होत असेल तरीदेखील! मामल्यातील पक्षकार मग तो श्रीमंत असो अथवा गरीब, अल्लाह तुमच्यापेक्षा जास्त त्यांचा हितिंचतक आहे. म्हणून आपल्या मनोवासनेच्या अनुकरणात न्यायापासून दूर राहू नका आणि जर तुम्ही पक्षपाताची गोष्ट बोललाच अथवा त्याला बगल दिली तर समजून असा की जे काही तुम्ही करता अल्लाहला त्याची माहिती आहे.’’ (कुरआन ४:१३५)
‘‘जर प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या मुलीने जरी चोरी केली असती, तर तिचेही हात छाटण्यात आले असते.’’ (बुखारी)
समानता व न्यायाच्या मैदानात इस्लामची ही शिकवण समस्यांचे समुळ उच्चाटन करण्याचे सामर्थ्य ठेवते. ही शिकवण केवळ प्रशासनालाच जबाबदार धरीत नाही तर समाजाच्या सर्वच वर्गाला व संस्थांना या दिशेने आपली भुमिका पार पाडण्यासाठी पायबंद घालते. मैत्री असो वा शत्रुत्व समानता व न्यायापासून तोंड वळवणे म्हणजे ईशभयाशी द्रोह व ईश्वराच्या प्रकोपाला निमंत्रण देणारे कार्य असल्याचे घोषित करीत तत्कालिन प्रशासकाला तत्कालिन हुकूमशाहच्या तुलनेत वास्तविक हुवूâमशाहसमोर उत्तरदायी बनवते. कायद्याच्या दृष्टिकोनातून गरीब व श्रीमंत सर्वांना समान लेखून ईश्वराशिवाय सर्वांच्या गुलामगिरीतून मुक्त करून अन्ययाची दारे ही शिकवण बंद करते. इस्लामी शिकवण या सर्वांना सोडून ईशवाणीला आपले हत्यार व पायाभूत भिंतीच्या स्वरूपात उभी करते की जिच्यावर मानव आदराची प्रचंड व विशालकाय इमारत कुठल्याही विषमतेशिवाय प्रस्थापित केली जाऊ शकते.
मानवतेचा एक महत्त्वपूर्ण पैलू :
मानवी आदराच्या संदर्भात इस्लामी शिकवणीचा एक महत्त्वपूर्ण पैलू हादेखील आहे की तो आदराला कुठल्याही एका व्यक्ती, एक समाज व वर्गाची समस्या मानीत नाही तर तो यांचा संबंध अत्याचारी व अत्याचारपीडित, हत्या करणारा व ज्याची हत्या झाली आहे तो, राजा व प्रजा या प्रत्येकाशी त्याचा संबंध जोडून प्रस्तूत करतो. कुठल्याही व्यक्तीकडून एखाद्या निरापराध व्यक्तीच्या करण्यात आलेल्या हत्येला केवळ त्या मयताचा अनादरच मानीत नाही तर खुन्याला स्वत: त्याच्या माणुसकीच्या विरूध्द घोषित करतो. आदराच्या या उत्कृष्ट व महत्त्वपूर्ण पैलुच्या माध्यमाने इस्लाम दुर्बल व अत्याचारपीडितांच्या मानसन्मान व आदराला बळ प्रदान करतो व बलशाली लोकांना जुलूम व अत्याचारापासून दूर ठेण्याचा प्रयत्न करतो. आदराचा हा पैलू आणि पारलौकिक जीवनात उत्तरदायित्वाची भावना जुलूम व अत्याचाराच्या विरोधावर इस्लाम एक मजबूत मानसिक व संस्कारित शस्त्र आहे.
‘‘(या सर्वांचा फैसला त्या दिवशी होईल) जेव्हा प्रत्येक जन आपल्याच बचावाच्या काळजीत पडलेला असेल आणि प्रत्येकास त्याने केलेल्या कृत्यांचा मोबदला पुरेपूर दिला जाईल आणि कुणावरही तिळमात्रदेखील अन्याय होणार नाही.’’ (कुरआन १६:१११)
प्रेषित मुहम्मद (स.) सांगतात की ‘‘आपल्या भावाची मदत करा, मग तो अत्याचारी असो वा अत्याचारपीडित.’’ अनुयायींनी विचारले, ‘‘हे प्रेषित (स.) अत्याचारपीडिताची तर मदत केली जाऊ शकते, परंतु अत्याचार करणाऱ्याची मदत कशी करावी?’’ प्रेषित (स.) यांनी सांगितले, ‘‘अत्याचाऱ्याला त्याच्या अत्याचारापासून थांबवणे ही त्याची मदत करणे आहे.’’ (बुखारी)
मानव आदर व मुस्लिम समुदाय :
मानवी आदराचा इस्लामी दृष्टिकोन, त्याच्याशी संबंधित शिकवण व वर्तमान परिस्थितीला चांगल्या प्रकारे समजून घेतल्यानंतर एक महत्त्वपूर्ण प्रश्न मुस्लिम समुदायातील लोकांच्या अपेक्षित भूमिकेबद्दल निर्माण होतो. जागतिक मानवता, तिच्या आदराच्या अनुषंगाने मुस्लिम समुदायाच्या अपेक्षित भूमिकेचे निर्धारण इस्लामी शिकवणीच्या आधारावर सहजपणे केले जाऊ शकते.
‘‘हे श्रध्दावंतांनो! अल्लाहसाठी सत्यावर अढळ राहणारे व न्यायाची ग्वाही देणारे बना. एखाद्या गटाच्या शत्रुत्वाने तुम्हाला इतके प्रक्षोभित करू नये की तुम्ही न्यायापासून विमुख व्हाल. न्याय करा, हे ईशपरायणतेशी अधिक निकटवर्ती आहे. अल्लाहचे भय बाळगुन कार्य करीत राहा. जे काही तुम्ही करता, अल्लाह त्याची पुरेपूर खबर ठेवणारा आहे.’’  (कुरआन ५:८)
‘‘मानवांमध्ये सर्वश्रेष्ठ तो आहे जो मानवजातीला फायदा पोहचवत असेल.’’  (कंजुल आमाल)
मुस्लिम समुदायाच्या अपेक्षित भूमिकेच्या संदर्भात इस्लामी शिकवणीचा विचार केला तर मानवी आदराच्या संदर्भात ज्या कार्याची जबाबदारी या समुदायावर येते ती ही की या समुदायाने आफरातफरी व नैराश्यापासून अलिप्त राहून पूर्ण आत्मविश्वासाने आपल्या आदर व मानसन्मानासोबतच संपूर्ण मानवतेच्या उध्दारासाठी व कल्याणासाठी प्रयत्नशील असावे, इस्लामच्या या शिकवणीला एक आदर्श व परिपूर्ण उपाययोजनेच्या स्वरूपात प्रवचन व आचरणाच्या माध्यमातून जगासमोर प्रस्तुत करावे. आपल्या व्यक्तीगत व सामुहिक वागणुकीच्या माध्यमातून आपली योग्य साधने व विचारांनी स्वत:ला मानवतेचा हितिंचतक या नात्याने प्रस्तुत करावे. स्वत: न्यायावर कायम राहावे व संपूर्ण जगातील मानवतेला समानता व न्यायासाठी प्रोत्साहित करावे आणि या सर्व गोष्टींपेक्षाही जास्त स्वत:ला व ईश्वराच्या सर्व दासांना अल्लाहशिवाय इतर सर्व प्रकारच्या शक्तींच्या गुलामगिरीतून मुक्त करण्याचा ध्यास घ्यावा व हे दाखवून द्यावे की अल्लाहशिवाय अन्य कोणापुढेही नतमस्तक होण्यापेक्षा जास्त अपमानित करणारे किळसवाणे कार्य दुसरे कोणते न पूर्वी होते न आज आहे. ही गोष्ट लोकांना पटवून देणे ही काळाची गरज आहे व ही मुस्लिम समुदायाची महत्त्वपूर्ण जबाबदारी आहे.
मानव आदराचा प्रवास :
पवित्र कुरआनमध्ये दोन प्रकारच्या दृष्टिकोनातून मानव आदर व त्याच्या मानसन्मानाचा उल्लेख करण्यात आला आहे. एक म्हणजे जन्मत: मनुष्याला प्राप्त आदर व मानसन्मान हा आहे. जो संपूर्ण मानवजातीला कसल्याही प्रकारचा भेदभाव न करता त्याला प्राप्त होतो. या आदराचा संबंध या ऐहिक जगापुरता व येथील जीवनातील घडामोडींशी संबंधित आहे. परंतु पवित्र कुरआन मध्ये आणखीण एका आदराचा उल्लेख करण्यात आलेला आहे जो आदर त्याला मरणोपरांत जीवनात ईश्वराच्या दरबारात मिळणार आहे. या आदराचा संबंध ईशभीरूतेशी आहे, हे निश्चित करण्याचा अधिकार केवळ आणि केवळ ईश्वरालाच आहे. या ऐहिक जीवनाशी निगडीत पहिल्या आदराचा संबंध हा मानवतेचा मुलाधार आहे तर दुसरा आदर हा पारलौकिक जीवनातील सफलतेशी संबंधित आहे. पहिल्या टप्प्यापासून दुसऱ्या टप्प्यापर्यंत प्रवास करणारा प्रवाशीच सफल व इतर सर्व असफल आहेत. ईश्वराकडे प्रार्थना आहे की त्याने प्रत्येक प्रवाशाला त्याच्या योग्य स्थळापर्यंत पोहचवावे. आमीन. (उत्तरार्ध)
(अनुवाद : सलीम खान, औरंगाबाद)
Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget