Halloween Costume ideas 2015

‘खिलाफत’ - इस्लामी लोकशाही?


‘मुस्लिम देशात लोकशाही का नाही?’ हा एम. आय. शेख यांचा लेख वाचला. (शोधन, ११-१७/८) लेखक म्हणतात की, इस्लामला अभिप्रेत असलेली लोकशाही जगात अस्तित्वात नाही. मात्र इराणची लोकशाही थोडीफार इस्लामी लोकशाही आहे. वास्तविक ‘लोकशाही’ नामक राजकीय प्रणाली कुणाची उपज आहे? इस्लामची की पाश्चात्यांची की अमेरिकेची? ‘व्याज’ला कमीशन म्हटल्याने जसे हलाल होत नाही, तसेच मानवनिर्मित ‘लोकशाही’ नामक राजकारणाला ‘इस्लामी’ लेबल लावल्याने हलाल होत नसते. खिलाफत आणि लोकशाही मधला फरक काय? तो तर ‘एन्सायक्लोपीडिया’मध्येच बघावा लागेल. खिलाफतीला ‘इस्लामी लोकशाही’ म्हणणे ‘जावई शोध’ म्हणावा लागेल.
उमर, अबू बकर, उस्मान आणि अली (रजि.) यांची खलीफा म्हणून निवड कशी झाली? किती टक्के मतदान झाले व किती मते मिळाली, किती राज्यांनी या निवडणूक प्रक्रियेत भाग घेतला? विरोधी उमेदवारांना किती मते मिळाली? या सर्व मूलभूत तत्त्वांवर ‘लोकशाही’ आधारभूत असते. मग त्याला खिलाफत व्यवस्थेशी तुम्ही इतक्या सहजपणे कसे काय जोडता? कृपया खिलाफत जी अधिकृत मान्यताप्राप्त एकमेव इस्लामी राजकीय विचारधारा आहे, तिची व लोकशाहीची गफलत करू नये, असे मला वाटते. तुम्ही इराणचे तुणतुणे वाजवता. शिया इराणची कुरआनविषयी, प्रेषित मुहम्मद (स.) विषयी, खलीफांविषयी, सहाबांविषयी आणि जिब्रिलविषयी काय श्रद्धा आहे? त्याचा आधी अभ्यास करावा. ‘अकीदा मनात नाही पण रूप मौलवीचे, चिखलावरी जणू की थर शुभ्र मलईचे!’
- निसार मोमीन, पुणे.
Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget