Halloween Costume ideas 2015

एमपीजेचे राज्यव्यापी बंधुता अभियान

आपल्या सामाजिक कार्यासाठी प्रसिद्ध असलेली व अनेक यशस्वी आंदोलनाची जनक एमपीजे अर्थात मुव्हमेंट फॉर पीस अँड जस्टीस ने महाराष्ट्रात १५ ऑगस्टपासून बंधुता अभियान सुरू केलेले आहे. ज्याची सांगता गांधी जयंती अर्थात २ ऑक्टोबरला होईल. अशी माहिती प्रदेशाध्यक्ष मुहम्मद सिराज यांनी दिली. या
अभियानादरम्यान देशाच्या घटनात्मक मुल्यांची जाणीव जनतेला करून देण्याचा प्रयत्न केला जाईल. या अभियानाचा मुख्य उद्देश सामाजिक सलोखा वाढविणे आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचे म्हणजे भारतात संवैधानिक विचारांना चालना देणे आहे. असे विचार जे नागरिकांच्या व्यक्तिगत जीवनाचा सन्मान करतात आणि राष्ट्राची एकता आणि अखंडता सुनिश्चित करतात. अलिकडे देशामध्ये राष्ट्रवादाच्या नावाखाली वेगवेगळया प्रकारचे विचार पेरून देशातील साध्या भोळया जनतेला भ्रमित करण्याचे काम जोमाने सुरू आहे. वास्तविक पाहता देशात एकच राष्ट्रवाद आहे तो म्हणजे घटनात्मक राष्टवाद. घटनेच्या चौकटीच्या बाहेर जाऊन कुठलाच राष्ट्रवाद कल्याणकारी राष्ट्रवादी असू शकत नाही. म्हणून आपल्या घटनेच्या पूर्व पिठीकेमध्ये म्हटलेले आहे कि, आम्ही भारताचे लोक भारताला एक संपूर्ण प्रभूत्व संपन्न, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकतंत्रात्मक गणराज्य बनविण्यासाठी आणि त्याच्या सर्व नागरीकांना न्याय, स्वातंत्र्य आणि बंधुभाव मिळवून देण्याचा दृढ संकल्प करीत आहोत. या अभियानाअंतर्गत एमपीजेने म्हटलेले आहे कि, ’ देशाची सद्यःपरिस्थती आणि आपल्या जबाबदाऱ्या’ या शिर्षकाखाली जनसभांचे आयोजन करण्यात येईल. सोबतच एमपीजे कॅडरसाठी घटनात्मक बंधुभाव या विषयावर दोन दिवसाच्या कार्यशाळेचेही आयोजन करण्यात येईल. औरंगाबाद येथे झालेल्या जनसभेमध्ये एमपीजेचे प्रदेशाध्यक्ष मोहम्मद सिराज यांनी सध्याच्या सामाजिक आणि राजनीतिक परिस्थीतीबद्दल चिंता व्यक्त करतांना म्हटले आहे कि, आता वेळ आलेली आहे देशात फोफावू पाहणाऱ्या फासिस्ट (अतिवादी) शक्तींना रोखण्यासाठी सगळयांनी मिळून काम करावयास हवे. या सभेमध्ये ॲड. सुभाष सल्विन्गकर, ज्येष्ठ साम्यवादी नेते भालचंद्र कांगो, बालासाहेब गरूड आणि मोहम्मद ओवेस यांनीही आपले विचार व्यक्त केले.

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget