Halloween Costume ideas 2015

तिहेरी तलाक आणि न्याय

तीन तलाक समस्या नसून त्याचा दुरूपयोग ही समस्या आहे

-एम.आय.शेख

ऐ माओं, बहेनों, बेटियों दुनिया की जिनत तुमसे है
मुल्कों में बसती हो तुम्हीं कौमों की इज्जत तुमसे है
इस्लामचा अभ्यासक या नात्याने मी जबाबदारीने एक विधान करू इच्छितो की इस्लाममध्ये अशी कोणतीही तरतूद नाही ज्यामुळे मुस्लिमांना शरमेने मान खाली घालावी लागेल, खजील व्हावे लागेल. अगदी एकावेळी तीन तलाक देण्याची तरतूद ही अशी नाही की ज्यामुळे अपमानित व्हावे लागेल. फक्त तीला समजून घेतल्या गेले नाही म्णून देशात या संबंधी प्रचंड गैरसमज निर्माण झालेले आहेत. इस्लामला समजून घेतांना बहुसंख्यांकांमध्ये पूर्वग्रही पक्षपात आडवा येतो तर समजाऊन सांगतांना मुस्लिमांना त्यांची मुखदुर्बलता नडते.
    २२ ऑगस्टला सुप्रिम कोर्ट ने एका दमात तीन तलाक देण्यावर प्रतिबंध लादल्या बरोबर देशभरात जल्लोष केला गेला. माध्यमांमध्ये तर अरबी समुद्राला पावसाळयात येते तशी भरती आली. गल्ली पासून दिल्लीपर्यंत प्रतिक्रिया दिल्या गेल्या. कांही मुस्लिम महिलांनी तर पेढे वाटून आपल्या अज्ञानाचे जाहीर प्रदर्शन केले. काही टिकाकारांचा उत्साह तर टी.व्ही.च्या स्क्रीन मध्ये मावत नव्हता. मात्र एक गोष्ट कोणीच लक्षात घेतली नाही की १९६६ साली मुंबई येथे तलाक पीडित महिलांचा मोर्चा घेऊन जेव्हा हमीद दलवाई मंत्रालयावर गेले होते, त्यावेळेस त्यांच्या सोबत फक्त ६ मुस्लिम महिला होत्या व त्याच मुद्यावर २०१७ मध्ये सुप्रिम कोर्ट धाव घेणाऱ्या मुस्लिम महिलांची संख्या पाच होती. म्हणजे एवढे वर्षे या प्रश्नावर रणकंदन करूनही एक महिला कमीच झाली होती. तीन तलाकच्या निर्णयामुळे माध्यमांमध्ये उडालेला धुराळा एव्हांना बसलेला आहे. म्हणून या आठवड्यात मी आपल्याला या प्रश्नांशी संबंधीत मुद्यावर चर्चा करणार आहे.
तीन तलाक संबंधीचे अज्ञान
    आयीन-ए- मुस्तफा के सिवा हल हो मुश्किलें
    सब अक्ल का फरेब निगाहों का फेर है
तलाक संबंधीच्या अज्ञानाचे फक्त एक उदाहरण मी वाचकांच्या कोर्टात सादर करतोय. ते हे की २२ ऑगस्टला सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आल्याबरोबर २३ ऑगस्टला लोकसत्ता सारख्या आघाडीच्या दैनिकाने पान क्र. ७ वर आपल्या संपादकीयाच्या पहिल्याच परिच्छेदामध्ये लिहिले की, ’’ तोंडी तलाक ही धार्मिक चूक होती आणि सर्वोच्च न्यायालयाने ती मंगळवारी दुरूस्त केली’ हे विधान धडधडीत खोटे आहे. सत्य परिस्थिती अशी आहे कि, सर्वोच्च न्यायालयाने फक्त एका दमात तीन तोंडी तलाक देण्यावर प्रतिबंध लादलेला आहे. तो ही सहा महिन्यासाठी. बाकी एक आणि दोन तोंडी तलाक देण्याची पद्धती अजूनही कायम आहे. उलट त्यावर सुनावणी करण्यासाठी कोर्टाने स्पष्ट नकार दिलेला आहे.
    इस्लाममध्ये तोंडी तलाक देण्याची पद्धत ही ’धार्मिक चूक’ नाही तर सर्वश्रेष्ठ अल्लाहने विषम दाम्पत्यांना नकोशा झालेल्या विवाह बंधनातून सुलभपणे मुक्त करण्यासाठी त्यांच्यावर दाखविलेली दया आहे. या तरतुदीमुळे अनेक महिलांचे जीव वाचतात. दोघांचीही कोर्ट कज्जे करण्यापासून सुटका होते. लोकसत्ता सारख्या आघाडीच्या दैनिकाचे जर इस्लामबद्दल एवढे अज्ञान असेल तर बाकींच्याबद्दल काय बोलणार? आता लोकसत्ताने म्हटलेल्या धार्मिक चूक या वाक्याचा समाचार घेऊ. शरियत ईश्वरीय कायदा आहे म्हणून त्यात कुठलीही चूक नाही. याच कारणामुळे तो अपरिवर्तनीय आहे. मात्र आकलनामध्ये झालेल्या चुकीचे खापर लोक इस्लामच्या डोक्यावर फोडतात.
तीन तलाकचा उगम
    तीन तलाकची तरतूद कुरआनमध्ये नाही, हे सत्य एव्हाना भारताच्या बहुसंख्य लोकांना माहित झालेले आहे. मग ही पद्धत आली कोठूण? तर या बद्दल थोडक्यात समजून घेऊया. जमाअते इस्लामीचे संस्थापक मौ. अबुल आला मौदूदी रहे. सुरे तलाकच्या आयतींवर भाष्य करताना लिहितात की, ’ नसाई(हदीस संग्रह)मध्ये म्हटलेले आहे कि, एकदा प्रेषित सल्ल. यांना सूचना दिली गेली की, एका व्यक्तीने आपल्या पत्नीला एका दमात तिहेरी तलाक देवून टाकलेली आहे. त्यावर खाली बसलेले प्रेषित सल्ल. रागाच्या भरात ताडकन उठून उभे राहिले आणि ओरडून म्हणाले कि, ‘‘अल्लाहच्या पुस्तकाचा खेळ चालविला आहे काय? अजून मी तुमच्यात जीवंत आहे.’’ प्रेषितांचा या संदर्भातील राग पाहून त्यांच्या समोर बसलेल्या एका सहाबी रजि. यांनी उठून प्रेषितांना विनंती केली की, ‘‘ मी त्याचे शीर धडापासून वेगळे करू का?’’ दूसऱ्या एका प्रकरणात अब्दुल रज्जाक नावाच्या व्यक्तीने हजरत उबादा बिन अलसामित रजि. संबंधी म्हटलेले आहे कि, त्यांच्या वडिलांनी त्यांच्या पत्नीला एका दमात एक हजार वेळा तलाक दिली. या संदर्भात हजरत उबादा यांनी प्रेषित सल्ल. यांच्याकडे जावून यासंबंधी विचारणा केली तेव्हा प्रेषित सल्ल. यांनी सांगितले कि, ‘‘अल्लाहच्या मर्जीविरोधात जावून त्याने आपल्या पत्नीला तलाक दिल्यामुळे ती त्याच्या निकाहमधून विभक्त झाली. राहिलेल्या ९९७ तलाक संबंधी निर्णय सर्वश्रेष्ठ अल्लाह घेईल, मग तो त्यासाठी हजरत उबादाच्या वडिलांना अजाब देईल किंवा क्षमा करील.‘‘
    हजरत अब्दुल्लाह बिन उमर यांनी आपल्या पत्नीला रजस्वला असतांना एक तलाक दिली होती. तेव्हा प्रेषित सल्ल. यांनी ती तलाक लागू झाली नसल्याचे सांगितले. तेव्हा त्यांनी प्रेषित सल्ल. यांना विचारले की, ‘‘जर का मी तिला रजस्वला नसतांना व तिच्याशी शरीर संबंध केले नसतांना एका वेळेस, एका दमात तीन तलाक दिली असती तर पुन्हा तिच्याशी वैवाहिक संबंध प्रस्थापित करू शकलो असतो का?’’ तेव्हा प्रेषित सल्ल. यांनी उत्तर दिले, ‘‘ नाही, तीन तलाकमुळे ती तुझ्यापासून वेगळी झाली असती आणि ते कृत्य गुन्हेगारी कत्य ठरले असते.’’ (तफहिमुल कुरआन खंड ५, पेज नं.५५५-५५६)
    कुरआन हा ईश्वरीय ग्रंथ असून तो प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्यावर नाझिल (अवतरित) झालेला आहे. म्हणून त्यांच्यापेक्षा अधिक कुरआन दुसऱ्या कोणाला समजू शकते असा दावा करता येत नाही. एकदा एका सहाबींनी आई आएशा रजि. यांना प्रेषित सल्ल. यांच्या जीवनाबद्दल संक्षेपामध्ये वर्णन करण्याची विनंती केली, तेव्हा आई आएशा रजि. यांनी एका वाक्यात उत्तर दिले की, ‘‘प्रेषित मुहम्मद सल्ल. यांचे जीवन म्हणजे ते चलते फिरते कुरआन होते‘‘ याचाच अर्थ असा की, ते साहब-ए-कुरआन होते. या नात्याने त्यांचा निर्णय जगातल्या मुस्लिमांसाठी अंतिम निर्णय आहे. मग जगातील काही मुस्लिम देशांनी जरी तीन तलाकच्या प्रथेवर प्रतिबंध आणला असला तरी ते उदाहरण खऱ्या मुस्लिमांसाठी मार्गदर्शक उदाहरण होऊ शकत नाही. प्रेषित सल्ल. यांची यासंदर्भातील कृती हे आमच्यासाठी आदर्श उदाहरण आहे. इतर मुस्लिम देशात तर दारू, जुगार, वेश्याव्यवसाय सगळेच सुरू आहे. त्यामुळे त्या देशांचे आचरण भारतीय मुस्लिमांसाठी आदर्श उदाहरण ठरू शकत नाही.

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget