Halloween Costume ideas 2015

...तर हा दानव दोघांना गिळून टाकील!

 -शाहजहान मगदुम

धर्माला कसलीही सीमा नसते आणि आस्था बाधित होण्यासाठी कोणताही तर्क कामी येत नाही. याचाच लाभ घेऊन आपल्या देशात सांप्रदायिक शक्ती बौद्ध समाजाला मुस्लिमांशी लढविण्यासाठी रोहिंग्या मुस्लिम दहशतवादी असल्याचे सांगून बौद्ध महिलांशी दुव्र्यवहाराच्या खोट्या बातम्या व कहाण्या फोटोशॉपद्वारा रंगवून पसरविल्या जात आहेत. रोहिंग्या मुस्लिमांवर होत असलेल्या अत्याचारांबाबत अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत. एकीकडे मुस्लिमांकडूनच नव्हे तर सभ्य समाजातील प्रत्येक वर्गाकडून याबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे; तर दुसरीकडे काही लोकांनी (विशेषत: मुस्लिमेतर) इस्लाम धर्मालाच लक्ष्य बनविले. खरे पाहता काही बौद्धांनी केलेल्या अथवा बौद्धांच्या समूहाने केलेल्या गुन्ह्यापायी संपूर्ण बौद्ध समाजाला दोषी ठरविणे चुकीचे ठरेल. रोहिंग्या मुस्लिम सरकारी दहशतवादाला बळी पडले आहेत, ही गोष्ट खरी आहे आणि त्यात तथाकथित बौद्ध धर्माचे अनुयायीदेखील सहभागी आहेत, काही धर्मावलंबीदेखील आहेत परंतु त्यांना संपूर्ण बौद्ध समाजाचे प्रतिनिधी ठरविले जाऊ शकत नाही.‘अहिंसक धर्मा’चा अत्याचार इतका व्रूâर आहे की संयुक्त राष्ट्र संघाने रोहिंग्यांना जगातील सर्वाधित अत्याचारपीडित अल्पसंख्याकांपैकी एक म्हटले आहे. जगात बहुसंख्यक, अल्पसंख्यकांवर वर्चस्व प्राप्त करू इच्छितात. बहुसंख्यक कट्टरवादी सत्तेवर येताच त्यांच्यावर पूर्वीपेक्षा अधिक अत्याचारांत वाढ होते आणि त्यांना दुय्यम दर्जाचे नागरिक ठरविले जाते. याच तत्त्वानुसार म्यानमारमध्ये स्वत:ला अहिंसक म्हणविणाऱ्या बौद्ध धर्माचे अनुयायी अल्पसंख्यक रोहिंग्या मुस्लिम आणि अन्य धर्मीयांवर हिंसक हल्ले करीत आहेत. जेव्हा जेव्हा एखाद्या देशात ज्या धर्माचे अनुयायी सत्तारूढ होतात तेव्हा ते त्या धर्माला संरक्षण (सामाजिक, आर्थिक, राजकीय साहाय्य) प्रदान करतात आणि त्या धर्माचा प्रचार-प्रसार करतात. या प्रसार-प्रचारासाठी सत्ताधारी धर्माचे अनुयायी अन्य धर्म व समुदायांच्या लोकांवर अत्याचार करू लागतात. जसे- हिटलरने नाझी धर्माच्या उत्कर्षासाठी लाखो ज्यूंना ठार करविले. त्याचप्रमाणे भारताबाबत म्हणायचे झाले तर बहुसंख्यक कट्टरवादी लोक याला हिंदू राष्ट्र बनविण्यासाठी अल्पसंख्यकांवर (विशेषत: मुस्लिमांवर) हल्ले करीत आहेत. श्रीलंकेत बहुसंख्यक बुद्धिस्टांना अल्पसंख्यक तमिळांवर वर्चस्व प्राप्त आहे. पाकिस्तानातूनदेखील तेथील अल्पसंख्यक मुस्लिमेतरांवर हल्ले झाल्याच्या बातम्या येत असतात. हीच शृंखला म्यानमारमध्ये बुद्धिस्टांकडून रोहिंग्या मुस्लिमांवर होत असलेल्या अत्याचारावर पूर्ण होते. म्यानमारमधून स्थलांतर करून लाखो रोहिंग्या लोक श्रीलंका, थायलंड, इंडोनेशिया, मलेशिया, बांग्लादेश आणि भारतासह इतर अनेक देशांमध्ये निर्वासितांचे जीवन जगत आहेत. रोहिंग्या समुदायाला म्यानमारचे नागरिकत्व प्राप्त नाही. बौद्ध त्यांना बाहेरून आलेले उपरे समजतात. मात्र रोहिंग्या समुदायाचा इतिहास म्यानमारमध्ये सुमारे ६०० वर्षे जुना आहे. जगभरात बौद्ध धर्म करुणा, मैत्री व शांततेसाठी प्रसिद्ध आहे. बौद्ध धर्माचे दर्शन प्रतित्यसमुत्पाद व मध्यममार्ग काम, लोभ, इच्छा, तृष्णा, हिंसा यासारख्या व्याधींपासून बचाव करणे आणि मानवरक्षा, प्रेम, करुणा, मैत्रीवर आधारित आहे. परंतु खरोखरच आज तथागत बुद्धांच्या या वचनांचा अंगीकार करण्यात आला आहे काय? असा प्रश्न उपस्थित होतो. बौद्ध समाजात रोहिंग्या मुस्लिमांविरूद्ध द्वेष पसरविण्याच्या दृष्टिकोनातून संपूर्ण मुस्लिम समाजाविरूद्ध घृणा बाळगणाऱ्या सांप्रदायिक शक्तींबरोबर असे सर्व लोकांचा समावेश असेल जे म्यानमारमध्ये उद्धवलेल्या परिस्थितीत बौद्ध धर्माला लक्ष्य बनवू इच्छितात. या ठिणगीचे रूपांतर भारतात आगीत होऊ न देण्यासाठी बौद्ध आणि मुस्लिम दोघांनी समजुतीने घेतले पाहिजे, अन्यथा हा दानव दोघांना गिळून टाकील. मानवतेचे शत्रू हा खेळ संपूर्ण भारतात खेळू शकतात. आपल्या देशात निर्वासितांच्या बाबतीतदेखील आता हिंदू-मुस्लिम भेदभाव बाळगला जात असल्याचे आढळून येत आहे. कारण वेंâद्रातील मोदी सरकारने एकीकडे राष्ट्रीय सुरक्षेचा बहाणा करून रोहिंग्या निर्वासितांना देशातून हाकलून देण्याची तयारी केली आहे तर दुसरीकडे पाकिस्तानच्या पूर्व भागातून भारतात (अरुणाचल प्रदेश) सन १९६० मध्ये येऊन वसलेले चकमा (बौद्ध) आणि हजोंग (हिंदू) (सुमारे एक लाख) निर्वासितांना भारतीय नागरिकत्व देण्याची तयारी सुरू आहे. कारण सर्वोच्च न्यायालयाने २०१५ मध्ये त्यांना नागरिकत्व बहाल करण्याचा आदेश दिला होता.

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget