Halloween Costume ideas 2015

पत्रकारांवर हल्ले करणाऱ्यांनो...

-शकील शेख

जब भी जुल्म होगा तो जवाब आएगा
कलम को दबाओगे तो सैलाब आएगा।
हम पत्रकार फौलादी इरादें रखते हैं
नाइन्साफी होगी तो इन्कलाब आएगा।

       
वारंवार पत्रकारांवर हल्ले करून, धमक्या देऊन आणि काही पत्रकारांना संपवून पत्रकारिता क्षेत्रात दहशत निर्माण करण्याचा काही हरामखोरांचा प्रयत्न आहे. मात्र त्यांचा हा प्रयत्न कदापिही यशस्वी होणार नाही. एका पत्रकाराला माराल तर शंभर पत्रकार उभे राहतील, शंभर पत्रकारांना माराल तर हजार उभे राहतील आणि हजार पत्रकारांना माराल तर लाख पत्रकार उभे राहतील! परंतु सत्य बाजू निर्भीडपणे मांडणारी पत्रकारिता आम्ही पत्रकार कधीच संपवू देणार नाही. कदाचित तुम्ही (पत्रकारांवर हल्ले करणारे) शक्तिशाली असालही, तुमची डोकी थोडी विचित्रही असतील आणि तुम्ही बंदुकीच्या जोरावर लेखणीला दाबण्याचा वारंवार प्रयत्नही कराल, मात्र तुम्हास एवढंच सांगणं आहे की, तुमच्यात पत्रकारांशी समोरासमोर लढण्याची तयारी नाही, तयारी म्हणण्यापेक्षा तुमची लायकी नाही, कारण तुमची लायकी असती तर तुम्ही विचारांची लढाई विचारांनीच लढला असता...
        पत्रकारांमुळेच लोकशाहीचा चौथा स्तंभ जिवंत आहे आणि हाच लोकशाहीचा चौथा स्तंभ जिवंत असल्यामुळे लोकशाही खऱ्या अर्थाने तग धरून आहे, जर हा लोकशाहीचा चौथा स्तंभ नसता तर लोकशाहीची काय अवस्था झाली असती याचा थोडासा विचार केला तर बरंच काही लक्षात येईल.
        समाज व देशासाठी स्वाभिमानी पत्रकार आपले संपूर्ण जीवन निस्वार्थपणे पणाला लावत असतात, विविध क्षेत्रात जाऊन स्वत:चं कल्याण करून घेण्याची संधी असताना, त्या क्षेत्राला बाजूला सारून पत्रकारांनी समाज आणि देशहित लक्षात घेऊन पत्रकारिता क्षेत्राला निवडलेले असते, स्वत:च्या स्वप्नांना तिलांजली देऊन पत्रकारितेचा खडतर प्रवास निवडलेला असतो, गोरगरीब व सर्वसामान्य नागरिकांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी आणि स्वाभिमानाने प्रत्येकाला जगता यावे म्हणून पत्रकार आपल्या लेखणीतून वेळोवेळी लिखाण करत असतात. एखाद्या विषयाचे सकारात्मक आणि नकारात्मक असे दोन्ही परिणाम काय होतील याबद्दल पत्रकार विश्लेषणात्मक लिहीत असतात. फक्त पत्रकारांनाच लिहिण्याचा आणि बोलण्याचा अधिकार आहे असं नाही, प्रत्येक नागरिकाला लिहिण्याचा आणि बोलण्याचा अधिकार आहे, परंतु काही चुकीच्या विचारसरणीची आणि राज्यघटनेला न मानणारी लोवंâ विचारांची लढाई विचारानेच न लढता पत्रकारांवर हल्ले करून व कट कारस्थान रचून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु त्यांना हे माहीत नाही की, पत्रकारांचा आवाज जेवढा दाबण्याचा प्रयत्न केला जाईल तेवढाच तो वाढत जाईल.
    लक्षात ठेवा, लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आणि देशहितार्थ पत्रकारांनी लेखणी उचलली आहे त्यामुळे पत्रकार शांत आहेत, जर लेखणीसोबत पत्रकारांनी बंदूक उचलली तर तुमचे (हल्ले करणाऱ्यांचे) काय हाल होतील याचा अंदाजही तुम्ही बांधू शकणार नाहीत.
Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget