Halloween Costume ideas 2015

हारुन अल् रशीद आणि किरण बेदी

केंद्रशासित पुडुचेरी या राज्याच्या नायब राज्यपाल किरण बेदी या स्वत: वेश पालटून (स्वत:ला झाकून घेऊन) दुचाकीवरून राज्याचा फेरफटका मारीत असतात. अशी बातमी प्रसिद्ध झालेली आहे. विशेषत: रात्रीची गस्त घालीत असतात. रात्रीच्या वेळी महिलांना त्यांच्या राज्यात सुरक्षितता वाटते की नाही त्यांची पाहणी करतात आणि त्यानुसार हाताखालच्या प्रशासनाला सूचना देत असतात. त्या स्वत: भारताच्या पहिल्या महिला आय.पी.एस. अधिकारी आहेत. त्यांनी दिल्लमध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्याचे एक वरिष्ठ पोलीस अधिकारी म्हणून आदर्श अशी सेवा बजावली होती. त्याशिवाय सामाजिक कार्यातही त्यांनी अहमहमिकेने भाग घेतला असून सध्याची नेमणूक पुडुचेरीचे नायब राज्यपाल म्हणून झाली आहे. परंतु त्यांच्यातील पोलीसाची कर्तव्यभावना कायम राहिलेली आहे.
राज्यपाल हे पद तसे शोभेचे असते, परंतु बेदी मॅडमनी ते सेवाभावी केलेले आहे. आपपल्याकडेही पूर्वीचे काही राजे, अधिकारी असाच वेष पालटून प्रशासनावर वचक बसवित असत आणि जनतेची उपेक्षित कामे मार्गी लावत असत. अरेबियन नाईटमधील हारुन अल् रशीद या खलीफांची गोष्ट त्यावरून आठवते.
- ज्ञानेश्वर भि. गावडे, फोर्ट, मुंबई.
Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget