हजरत मुजाहिद (र.) म्हणतात की आईला कष्टात टाकण्यासाठी तिला आपल्या बाळाला दूध पाजण्यापासून मज्जाव करणं उचित नाही. तसेच एखाद्या विवश माणसाला कोणती वस्तू किंमत वाढवून विकू नका.
ह. अली (र.) म्हणतात की एक असादेखील काळ येणार आहे जेव्हा संपन्न लोक समाजासाठी योगदान देणार नाहीत.
अब्दुल्लाह बिन मअकल म्हणतात की एका विवश माणसाला किंमत वाढवून काही देणे म्हणजे व्याज घेण्यासारखे आहे.
इतरांना नुकसानित टाकण्याची दुसरी बाजू अशी की कुणी एखादे कार्य कुणाला आजार देण्यासाठी करत नाही, पण त्यामुळे दुसऱ्याला त्याच्यापासून त्रास होणार. जसे जोरदार वारा वाहात असताना आपल्या शेतातील वाळलेल्या पिकांना आग लावणं. पण जर वारे वाहाण्यापूर्वीच कुणी आग लावली असेल तर यात काही गैर नाही.
कुणी आपलं घर इतकं उंच बांधू नये किंवा उंचीवर खिडकी लावू नये, ज्यामुळे आपल्या शेजाऱ्याच्या घरात राहाणाऱ्यांची गैरसोय व्हावी किंवा त्याच्या घरी ऊन आणि हवा जाण्याचा मार्ग बंद व्हावा. अशाच प्रकारे शेतातील शेजाऱ्याच्या विहिरीजवळच आपणसुद्धा विहीर खोदू नये, ज्यामुळे त्याच्या विहिरीमधले पाणी कमी होईल.
हजरत समरह बिन जमदब म्हणतात, एका अन्सारी व्यक्तीच्या जागेत त्यांची (समरह यांची) काही खजुरीची झाडे होती. ते गृहस्त याच जागेत आपल्या मुलाबाळांसहित राहात असत. जेव्हा केव्हा ह. समरह आपल्या झाडांजवळ जात तेव्हा त्या अन्सारी कुटुंबाला त्रास होत असे. अन्सारींनी ह. समरह यांना सांगितले की एकतर तुम्ही ही झाडे काढून टाका किंवा अदलाबदल करा. समरह यांनी नकार दिला. अन्सारी प्रेषित मुहम्मद (स.) यांच्याकडे आले आणि तक्रार केली. प्रेषितांनी ह. समरह यांना सांगितले, ‘‘तुम्ही आपली झाडं अन्सारींना विकून टाका.’’ समरह यांनी नकार दिला. प्रेषितांनी पुन्हा तेच सांगितले. समरह यांचे उत्तरदेखील तेच होते. तरीदेखील ते तयार झाले नाहीत. प्रेषित म्हणाले, ‘‘तुम्ही इतरांना त्रास देणारे आहात.’’ आणि अन्सारीला म्हणाले, ‘‘तुम्ही जा आणि ती झाडं काढून टाका.’’ (अबू दाऊद)
अबू हुरैरा (र.) म्हणतात की प्रेषित महम्मद (स.) म्हणाले, ‘‘तुम्ही आपल्या शेजाऱ्याला तुमच्या भिंतीत खिळे ठोकण्यापासून रोखू नये.’’
एका व्यक्तीने प्रेषितांना विचारले की कोणकोणत्या वस्तू दुसऱ्यांना द्यायला हव्यात. प्रेषित म्हणाले, ‘‘पाणी.’’ त्याने पुन्हा विचारले की आणखी काय? प्रेषित म्हणाले, ‘‘मीठ.’’ आणखीन काय? असे त्या व्यक्तीने पुन्हा विचारले. प्रेषित म्हणाले, ‘‘भलाई करा, तुमचंही भलं होईल.’’ (अबू दाऊद)
Post a Comment