गत आठवड्यात आपण 11 आरोग्यदायी फळांची माहिती पाहिली. यावरून निश्चित वाटते की आपण फळे सेवनास प्रारंभ केला असेल. राहिलेली उर्वरित आरोग्यदायी फळे खालीलप्रमाणे -
(12) खरबूज (मस्कमेलन) : कॉनटेलॉप : खूप कमी कॅलरी 100 ग्राममध्ये 17 ग्रॅम, आयर्न, विटॅमिन सी, पोटॅशिअम, बेटाकॅरोटेन असते. प्रतिकारशक्ती वाढवते. 99 टक्के पाणी. अलसरमध्ये उपयोगी. पोटॅशिअम असल्यामुळे बी.पी. कमी करते. फुफ्फुसांसाठी चांगले. * मधुमेही लोकही खरबूज खाऊ शकतात. * वजन कमी करण्यास उपयोगी * खरबूजचे बी ही उपयोगी असतात. किडनीसाठी उपयोगी.
(13) टरबूज (वॉटरमेलन) : 100 ग्राममध्ये 16 ग्राम कॅलोन. * वजन कमी करण्यास सक्षम * त्वचासाठी चांगले. * हाय लेवल ऑफ झिंक इन सीड्स ऑफ वॉटरमेलन. स्मरणशक्ती चांगली असते. अॅझेटोनर्स डिसीज मध्ये काम करते. * डायजेशनसाठी चांगले,पाचनक्रिया सुधारते. * गरोदर बायकांनी आवर्जुन खावे. * त्वचा व केसांसाठी चांगले * जखम जुडण्यास मदत करते.
(14) स्ट्रॉबेरी : कमी कॅलरी 100 ग्राममध्ये 40. अॅन्थ्रोसायनीन पिगमेंट असते जे अॅन्टीऑक्सीडन्ट असतात. * टॉ्नझीन पासून रोखते. शरीराला ताजेतवाने ठेवते. * वजन कमी करते. * मधुमेहींसाठी उपयोगी * हाडांना मजबूत करते.
(15) कविठ (वुड अॅपल/ मंकी अॅपल/ एलिफंट अॅपल) : पाचनक्रिया मध्ये चांगले. पाईल्स (मुळव्याध)मध्ये उपयोगी. मधुमेह कमी करते. किडनीच्या आरोग्यामध्ये उपयोगी. (16) नारळ (कोकोनट) : नारळपाणी हे कमी कॅलरी आणि फॅट फ्री असते. ज्यांचा बी.पी. कमी असते त्यांच्यासाठी अतीउत्तम. * मधुमेह कंट्रोल करते. * मुतखड्यात ही उपयोगी आहे. * शरीरात पाण्याची कमी दूर करते. (17) आलुबुखार (प्लम्स) : यात विटॅमिन बी कॉम्प्लेक्स असते. मेटाबोलीझम चांगले करते. फायबर आणि अॅन्टिऑक्सीडंटस् लवकर म्हातारपण येण्यास थांबवते.
(18) रताळे (याम) : यात विटॅमिन सी, विटॅमिन ए, विटॅमिन के, मॅग्नेशिअम आणि विटॅमिन बी6 असतात. त्वचेसाठी चांगले / श्वासोश्वास मध्ये उपयोगी (रेसपायरेटरी प्रॉब्लेम्स).(19) द्राक्षे (ग्रेप्स) : यात विटॅमिन के, सी असते. डोळ्यांच्या आरोग्यात चांगले. द्राक्षे कॅन्सर व हृदय आजारांपासून संरक्षण करते. (20) ऑरेंज- संत्रे : विटॅमिन सी ने भरपूर. हृदयासाठी चांगले रोगप्रतिकार शक्ती वाढते. कोलेस्ट्रॉल कमी करते. कॅन्सरपासून रक्षण करते. (21) मोसंबी (स्वीटलाईम) : 100 ग्रॅम मोसंबी मध्ये 30 कॅलरीज असते. हे संत्रे सारखे असते. पाचनतंत्र सुधारते. वजन कमी करते. विटॅमिन ए., सी. असतात. नियमित मोसंबी खाल्ल्याने आरोग्य चांगले राहते. फ्लू खोकला होत नाही.
(22) चिक्कू : 100 ग्रॅम चिक्कूमध्ये जास्त कॅलोरी 98 असते. कॅल्शिअम, विटॅमिन सी, बेटॅककॅरोट फायबर असते. गॅस्ट्रीटीज, स्टमक इमिटेशन कमी रकते. पॉलिफेनॉल्स असतात. अलसरला रोखते. त्वचेला हायड्रेटेड ठेवते. पातळ लोकांसाठी चांगले वजन वाढवते. गर्भवती महिलांसाठी याचे सेवन सुरक्षित असते. आयर्न (लोह) ही पुष्कळ प्रमाणात असते पण मधुमेह असलेल्या गर्भवती महिलांनी याचे सेवन टाळावे. (23) ड्रॅगेन फ्रूट : शरीरासाठी लाभदायक, जॅम, आईसक्रीम जेली, बनवता येते. विविध प्रकारचे गर लाल आणि पांढरा असतो. भरपूर प्रमाणात कॅल्शिअम, विटॅमिन बी,सी. लोह असते. सौंदर्य ही वाढते. पिम्पल्स, उन्हाने काळवलेली त्वचामध्ये उपयोगी, पोट साफ करते, मधुमेह कमी होते. ओमेगा 3 आणि ओमेगा 6 मुळे कोलेस्ट्रॉल वाढू देत नाही. डेंग्यू झाल्यास हाडे कमजोर होतात त्यात उपयोगी ल्यूकोपेन असते, कॅन्सरशी लढते. (24) अमरफळ (जापानी फळ) : पर्सिमॉन फ्रूट : टोमॅटो सारखे दिसणारे हे फळ असते. बाहेरची साल जाड असते. बी.पी. कमी करते. प्रतिकारशक्ती वाढवते. गर्भवती महिलांसाठी उपयोगी कॅल्शिअम, आयर्नचे भरपूर स्त्रोत आहेत. हाडांसाठी उपयोगी.
(25) लिंबू : विटॅमिन सी ने भरपूर, पोटॅशिअम ने भरपूर असते. बी.पी. कंट्रोल करते. साखर जास्त टाकून शरबत पिल्यास टवटवीत वाटते. हिरडे, दातदखी कमी होते. केसातला कोंडा कमी करते, सांधेदुखी असल्यास दररोज एक लिंबू आहारात सामिल करा हाडे मजबूत होतील. फळे खा, निरोगी रहा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे बाजारातून आणल्यानंतर गरम पाणीने धुवूनच फळे सेवन करावीत.
(26) सिताफळ (कस्टर्ड अॅपल, चेरिमोया) : सगळ्यांना आवडणारे फळ. विटॅमिन ए, सी, कॅल्शिअमनी भरपूर. वजन वाढवते. * त्वचा आणि केसांसाठी उपयोगी. पातळ लिंबू आणि मुलांसाठी उपयोगी हाडे, दात, मजबूत ठेवते. विटॅमिन बी.सी असते. त्यामुळे अस्थमा आणि हृदयरोगापासून रक्षण करते. (27) रामफळ : सिताफळ सारखाच पण पोटाच्या विकारात उपयोगी, कॅन्सरच्या प्रभावाला कमी करते, त्वचेसाठी चांगले, विटॅमिन ए आणि बी, सी असते. म्हणून एकझिमा, कोरडी त्वचामध्ये उपयोगी असते. रामफळाची पाने, कृमीनाशक असतात. ’बी’ पॉईझन्स असतात. हार्मोनिस नियंत्रीत ठेवते.
(28) जांभळे (सायझेजीअम जम्बोलॅनम) : मधुमेहसाठी उपयोगी, हृदयासाठी चांगले. 1 चमचा पावडर सकाळी घ्यावे.
(29) शहतूत (ब्लॅकबेरी) : डोळ्यांसाठी, त्वचेसाठी उपयोगी. ब्लड कॉटिंग, रक्तात कोलेस्ट्रॉल कमी करते. ब्रेनसेल्ससाठी चांगले, मस्तीष्कसाठी आरोग्यदायक याचे ज्यूस खोकल्यात उपयोगी असते.
अल्लाहचे किती जरी आभार मानले तेवढे कमीच आहेत. त्याने आपल्याला नावाजले. अल्लाह सर्वांना नेहमी निरोगी ठेवो. (आमीन)
- डॉ. सीमीन शहापूरे
8788327935
Post a Comment