सुरजपाल अमु याने अतिशय खालच्या थराचे आणि द्वेष पसरविणारे भाषण दिले. त्याच्यानंतर त्याला भाजपाच्या राज्य कार्यकारिणीत प्रवक्ता बनविले. गौरक्षा- बीफ च्या मुद्यावरून झालेल्या अख्लाकच्या हत्तेच्या आरोपींमधील एकाचा मृत्यू झाला. एक माजी केंद्रीय मंत्री (महेश शर्मा) याने त्याला श्रद्धांजली वाहिली आणि त्याच्या पार्थिवाला तिरंग्यात गुंडाळले. लिंचिंगच्या 8 आरोपींना जमानतीवर सोडून दिले. एक अन्य केंद्रीय मंत्री (जयंत सिन्हा) याने जेलमधून बाहेर आल्यानंतर आरोपींना फुलांचा हार घालून स्वागत केले.
या घटनांच्या मुळाशी, जे लोक सद्यस्थितीत द्वेष पसरवत आहेत आणि हिंसा भडकावत आहेत त्यांच्या विरूद्ध कोणतीही कार्यवाही होत नसल्यानेे आम्ही आश्चर्यचकीत झाले नाही पाहिजे. अजूनही जास्त वेळ झाला नाही जेव्हा आंदोलनकर्त्यांना ‘गोळ्या मारा‘ चे आव्हान करणाऱ्या राज्य मंत्र्याला कॅबिनेटमध्ये पदोन्नती दिली होती. आपण सर्वांना आठवणीत असेल की, आपले प्रधानमंत्री, जे आपली ’मन की बात’ मधून आम्हा सर्वांना माहिती देत असतात, जुनैद आणि रोहित वेम्युलाच्या मृत्यूवर एक तर ते गप्प राहिले अथवा अनेक दिवसानंतर काहीतरी बोलले.
जानेवारी 2022 च्या 1 तारखेपर्यंत आम्हाला आपल्या प्रधानमंत्र्यांनी पाच दिवस अगोदर घडलेल्या दोन विचलित आणि चिंतीत करणाऱ्या घटनेच्या संबंधात आपल्या विचारांनी आम्हाला माहिती दिली नाही. यातील एक घटना 19 डिसेंबरला झाली होती. या दिवशी सुदर्शन टि.व्ही. चे मुख्य संपादक सुरेश चाव्हानके याने युवक-युवतींना शपथ दिली. कार्यक्रमाचे आयोजन हिन्दू वाहिनीद्वारे केले गेेले होते. या संघटनेचे संस्थापक उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि गोरखनाथ पीठाचे महंत योगी आदित्यनाथ आहेत. शपथ अशा प्रकारची होती की, ’’हम सब शपथ लेते हैं, अपना वचन देते हैं, संकल्प करते हैं कि हम भारत को एक हिंदू राष्ट्र बनाएंगे, अपनी अंतिम सांस तक इसे एक हिंदू राष्ट्र रखेंगे. हम लड़ेंगे और मरेंगे. अगर जरूरत पड़ी तो हम मार भी डालेंगे.’’
हरिद्वार येथे एक अन्य कार्यक्रमात शेकडो भगवाधारी साधु आणि साध्वी यांनी इस्लामिक आतंकवाद आणि आमच्या जबाबदाऱ्या विषयावर मंथन करण्यासाठी एकत्रित आले. येथे एक ’धर्म संसद’ होती. ज्याचे आयोजन गाजियाबाद मंदिराचे मुख्य पुजारी नरसिम्हानंद यांनी केले होते. त्यांनी आयोजनाची दिशा स्पष्ट करताना आपल्या भाषणात सांगितले की, (मुसलमानांच्या) आर्थिक बहिष्कारावर काम चालणार नाही. आपणास आपल्या हत्यारांना अजून चांगले बनवावे लागेल. जास्तीत जास्त मुले आणि उत्कृष्ट हत्यारे आपली रक्षा करू शकतात.
मुसलमानांविरूद्ध हत्यारबंद हिंसेचे आव्हान करताना त्यांनी, ’शस्त्रमेव जयते’ ची घोषणा दिली. एका अन्य व्हिडीयोमध्ये, नरसिम्हानंद हिन्दू युवकांना (लिट्टे नेता) ’प्रभाकरण’ आणि ’भिंडरावाले’ बनण्याचे आव्हान करताना दिसत आहे. ते प्रभाकरण सारखे बनणाऱ्या हिन्दू युवकांना एक करोड रूपयांचे पुरस्कार देण्याची घोषणाही करतात.
हिन्दू महासभेच्या महासचिव अन्नपूर्णा माँ (जी पूर्वी पूनम शकुन पांडे म्हणवत होत्या) ने म्हटले की, आम्हाला 100 सैनिकांची आवश्यकता आहे जो त्यांचे (मुसलमान) 20 लाख मारू शकतील. तिने पुढे म्हटले की, माता शक्तीचे वाघाचे पंजे आहेत. फाडून ठेवतील. ही तीच महिला आहे जीने काही वर्षा अगोदर मेरठ मध्ये गांधीजींच्या हत्येच्या दृश्याचे पुनर्दृश्य करून दाखविले होते आणि त्याच्यानंतर मिठाई वाटली होती.
बिहार येथून आलेले धरम दास महाराज यांनी सांगितले, जेव्हा संसदेत प्रधानमंत्री मनमोहन सिंह यांनी म्हटले होते की, मुसलमानांचा या देशातील संसाधनांवर पहिला हक्क आहे त्याच वेळेस जर मी संसदेत उपस्थित असतो तर नथूराम गोडसे सारखं, मनमोहन सिंह यांच्या शरीरावर बंदुकीने सहा गोळ्या झाडल्या असत्या.
हे धर्म संसेदीतील कार्यवाहीचा काही सा सार आहे. या आयोजनांची सुरूवात विश्व हिन्दू परिषदने बाबरी मस्जिद च्या विध्वंसानंतर केली होती. आश्चर्यजनक हे आहे की, हे व्हिडीओज समाज माध्यमांवर सहज उपलब्ध होत असतानाही पोलीसांनी या घटनेबद्दल आतापर्यंत कोणावरही कार्यवाही केलेली नाही.
जे असे बोलत आहेत ते कायद्याच्या दृष्टीकोनातून न्नकीच गुन्हेगार आहेत. परंतु त्यांना माहित आहे की, त्याच्या विरूद्ध कुठलीच कार्यवाही होणार नाही. त्यांना माहित आहे की, आपल्या अशा भाषणांचे सत्ताधारी मनोमन कौतुक करतात. असेही होवू शकते की, या प्रकारच्या बोलण्याने, अशा पद्धतीचे भडकाऊ बोलणे, निवडणुकीच्या तयारीचा एक भाग असेल. मजेशीर गोष्ट अशी आहे की, हे सगळे तेव्हा होत आहे जेव्हा मुनव्वर फारूकीला त्याच्या अशा चुटकुल्यामुळे अटक केले गेले होते जे त्याने म्हटलेही नव्हते. आणि त्याच्यानंतर त्याचे अनेक शो रद्द करण्यात आले आहेत.
अशा प्रकारच्या बोलण्यामुळे अल्पसंख्यांकांवर कोणता प्रभाव पडेल? ते या देशाचे समान नागरिक आहेत. काय त्यांच्या मनात भीतीयुक्त भाव निर्माण होणार नाही? काय त्यांच्यावर आर्थिक बहिष्कार आणि त्यांचे जीव घेण्याच्या धमक्यांनी त्यांच्यामध्ये आपल्या मोहल्ल्यात सिमीत राहण्याची प्रवृत्ती अधिक वाढणार नाही?
या प्रकरणावरून परेशान आणि चिंतीत झालेल्या जमियत-ए-उलेमा-ए- हिन्द चे महमूद मदनी यांनी केंद्रीय गृह मंत्री यांना या घटनेबद्दल एक पत्र लिहिले आहे.
काय अल्पसंख्यांक आयोग या अत्यंत आपत्तीजनक भाषणांचा बोध घेऊन कार्यवाही करेल? काय पुलिस जितेन्द्र त्यागी (पूर्वीचे वसीम रिजवी) याच्या विरूद्ध एफआईआर नोंदवून पुढील कार्यवाही करणार नाही? काय सुप्रिम कोर्ट या समस्येबद्दल स्वतः बोध घेणार नाही? या पातळीच्या हिंसाचाराबद्दल उघडपणे भडकावण्याचा आणि द्वेष पसरवण्याचा हा तमाशा पाहून संपूर्ण जग हादरले आहे. देश कोणत्या दिशेने चालला आहे, याचा अंदाज जागतिक प्रसारमाध्यमांना काही प्रमाणात आधीच आला होता. 2020 मध्ये डेली गार्डियनमध्ये प्रकाशित झालेल्या एका लेखात असे म्हटले आहे की, खरेतर जनतेच्या सर्वांगीण हितासाठी काम करणे कठीण आहे, यामुळे की सत्ताधारी पक्षाच्या त्रुटीं, ज्याचा धर्माशी काही संबंध असो वा नसो,कडे लक्ष वेधण्यासाठी अथकपणे द्वेष भावना पसरविणाऱ्या गोष्टी बोलण्याचा ट्रेंड 1990 च्या दशकाच्या सुरुवातीपासून सुरू झाला आणि तो दुसऱ्या सहस्राब्दीच्या सुरुवातीच्या वर्षांत चालू राहिला. द्वेष पसरविणाऱ्या गोष्टी भारतीय लोकशाहीचा भाग बनत गेल्या.
अल्पसंख्यांकाविरूद्ध द्वेषाची भावना शिगेला पोहोचली आहे. अविभाजित भारतात हिन्दू आणि मुस्लिमांना एकमेकांचे शत्रु बनविण्यासाठी ज्या सांप्रदायिक राजकारणाची सुरूवात झाली होती, जी आज फक्त मुस्लिमांवर केंद्रीत झाली आहे. प्रत्येक संधीचा वापर मुस्लिमांच्या दानवीकरणासाठी केला जात आहे. मागील सात वर्षात भाजपा सरकारच्या शासन काळात या प्रवृत्ती अधिक वाढल्या आहेत. अमेरिकन प्रसारमाध्यमांकडून इस्लामी दहशतवाद असे शब्द रचून या समाजाच्या जखमेवर मीठ शिंपडले जात आहे.
या परिस्थितीवर नागरी समाजाने काहीतरी करण्याची आज गरज आहे.
उशिरा का होईना, ’इतरांच्या’ विरुद्ध हिंसा आणि द्वेष त्याच समाजासाठी घृणास्पद बनतो.
जो त्याला हवा देतो. सर्व बिगर भाजप पक्षांनी एका मंचावर येऊन द्वेषाच्या सौदागरांविरोधात आवाज उठवला पाहिजे. परस्पर प्रेम वाढवण्यासाठी आणि द्वेषापासून दूर राहण्यासाठी सामाजिक आंदोलनाची गरज आहे. भक्ती आणि सुफी संत आणि महात्मा गांधी आणि मौलाना आझाद यांनी दाखविलेल्या मार्गावर आपल्याला चालायचे आहे. तरच देशात आणि समाजात शांतता आणि सौहार्दाचे वातावरण निर्माण होईल.
- राम पुनियानी
(इंग्रजीतून हिंदी भाषांत अमरीश हरदेनिया, हिंदीतून मराठी भाषांतर बशीर शेख, एम.आय.शेख. )
(लेखक आयआयटी मुंबई येथे शिकवित होते आणि 2007 चा राष्ट्रीय सांप्रदायिक सौहार्द पुरस्कार प्राप्तकर्ता आहेत)
Post a Comment