राज्यातील सर्वच दुकाने व आस्थापनांचे नामफलक मराठी भाषेमध्ये असावेत हा महाराष्ट्र सरकारचा निर्णय योग्य व स्वागतार्ह आहे.परंतु फक्त मराठी नामफलक लावून चालनार नाही तर सर्वच स्तरातून मराठी भाषेचा उगम व्हायला हवा.
जही महाराष्ट्रातील परप्रांतीय लोक आपापल्या मातृभाषेला प्राधान्य देतात व मराठी भाषेला दुरावतात.परंतु महाराष्ट्रात राहणाऱ्या परप्रांतीयांना मराठी भाषा बोलने अनीवार्य करण्याची नितांत गरज आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीच्या मुखातून मराठी भाषेचा उच्चार नीघने अती आवश्यक आहे. आजही अनेक सरकारी क्षेत्रात व खाजगी क्षेत्रात इंग्रजी व हिंदी भाषेला प्रथम प्राधान्य दिल्याचे दिसून येते. इंग्रजी व हिंदी भाषेचा वापर व्हावा परंतु मराठी भाषेचा सुध्दा सन्मान होने तितकेच गरजेचे आहे. याकरीता मराठी वाचने,बोलने व लिहीने अनिवार्य व्हायला हवे. आजही सीबीएससीच्या (इंग्रजी)शाळांमध्ये मराठी भाषेचा उपयोग नाहीच्या बरोबरीनेच दिसून येतो.
शिक्षकांपासून तर विद्यार्थ्यांपर्यंत चालता-बोलता लहान-मोठ्यांच्या मुखातून हिंदी व इंग्रजी भाषांचा उपयोग जास्त होतांना दिसून येतो. या ठिकानीसुध्दा सरकारने मराठी भाषेची सक्ती करने गरजेचे आहे.माझा सांगण्याचा उद्देश म्हणजे आपण महाराष्ट्रात राहतो तेव्हा तळागाळातील प्रत्येक लहान-मोठ्याच्या मुखातून मराठी भाषेचा उच्चार निघने अति आवश्यक आहे. यामुळे खूप कमी वेळात संपूर्ण महाराष्ट्र मराठीमय व्हायला वेळ लागणार नाही. राज्यातील दुकानावरील नामफलक मराठीत राहुन चालणार नाही तर दवाखाने, खाजगी कार्यालये, हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या पाट्या, हॉटेल, रेस्टॉरंट इत्यादीसह संपूर्ण ठिकाणचे नामफलक मराठीत असायला पाहिजे.मराठी भाषेला उंचावण्यासाठी राजकारण व्हायला नको तर सर्वांनीच मराठी भाषेचा मान कसा उंचावता येईल याकडे सामाजिक संघटना, राजकीय पुढारी, पक्ष-विपक्ष यांनी जातीने लक्ष देण्याची गरज आहे.कारण आपणच महाराष्ट्रात राहून मराठी भाषेऐवजी इंग्रजी किंवा हिंदीचा वापर जास्त केला तर मराठी भाषेला तडा जाऊ शकतो. आपलेच काही मराठी भाषीक हिंदीला प्रथम प्राधान्य देतात ही चिंताजनक बाब आहे. माझ्यामते मी सरकारला आग्रह करेल महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या घरी मराठी वृत्तपत्र यायलाच हवे.हिंदी किंवा इंग्रजी वृत्तपत्र वाचावेत परंतु त्यात मराठी वृत्तपत्रांचा भर होने गरजेचे आहे.महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकांनी मराठी वृत्तपत्रांचे वाचन नियमित केले तर मराठी भाषा महाराष्ट्राच्या सिंहासनावर विराजमान व्हायला काहीच वेळ लागणार नाही.मराठी भाषा ही माय भाषा आहे, (उर्वरित आतील पान 7 वर)
तीला यत्किंचितही तडा जाणार नाही याची काळजी संपूर्ण महाराष्ट्र वासीयांनी घेतली पाहिजे.मराठी भाषेचा अंकुर हा महाराष्ट्रातून निघाला आहे. त्यामुळे त्या अंकुराला वटवृक्ष करण्याची जबाबदारी तळागाळातील संपूर्ण महाराष्ट्र वासीयांची आहे.मराठी भाषेत ऐवढा गोडवा आहे की जगात तो गोडवा कुठेही दिसून येणार नाही.कारण महाराष्ट्रात प्रत्येक 40 किलोमीटर अंतराच्या नंतर आपल्याला वेगवेगळ्या मराठी भाषेचा गोडवा पहायला मिळतो.त्यामुळेच महाराष्ट्राला संतांची भूमी म्हणून सुद्धा ओळखले जाते. हे महाराष्ट्राचे अहो भाग्यच म्हणावे लागेल.कारण मराठी भाषेतील प्रत्येक शब्दाशब्दात गोडवा दिसून येतो.महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात राहणारा देशातील कोणत्याही राज्यातील व्यक्ती असो त्याला मराठी भाषेचे ज्ञान असणे गरजेचे आहे.त्यामुळे त्याला मराठी वाचता,बोलता व लिहीता यायलाच पाहिजे.त्यामुळे माय मराठीचा सन्मान वाढेल व महाराष्ट्राची मान उंचावेल.महाराष्ट्रात रहाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने महाराष्ट्र माझा,मराठी माझी हा मुलमंत्र सर्वांनीच अंगीकारला तर संपूर्ण महाराष्ट्र अवश्य मराठीमय होईल.
- रमेश कृष्णराव लांजेवार, नागपूर
मो. 9325105779
Post a Comment