एनपीआर
एनपीआर म्हणजे नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर. ही देशातील सामान्य निवास्यांची एक नोंदवही आहे. जी की भारतीय नागरिकत्वाचा कायदा 1955 व सिटीझन्स रजिस्ट्रेशन्स अँड इश्यु ऑफ नॅशनल आयडेंटीटी कार्ड रूल्स 2003 मधील तरतुदींच्या आधीन राहून तयार केली जाणार आहे. याची प्रक्रिया येत्या 1 एप्रिलपासून सुरू होणार आहे. यामध्ये देशात राहणार्या अशा सर्व लोकांची माहिती गोळा केली जाणार आहे जे एखाद्या ठिकाणी सहा महिन्यापासून राहत आहेत किंवा पुढील सहा महिने ज्यांचा राहण्याचा इरादा आहे. यात विदेशी आणि घुसखोरांची सुद्धा नोंद घेतली जाते. यात फक्त माहिती घेतली जाते कागदपत्रांची मागणी केली जात नाही.
जनगणना
जनगणना कायदा 1948 अनुसार दर 10 वर्षांनी जनगणना केली जाते. पहिली जनगणना 1951 साली केली गेली होती. शेवटची जनगणना 2011 साली झाली होती. पुढील जनगणना 2021 मध्ये होईल. ती दोन टप्प्यांमध्ये होईल. पहिल्या टप्प्यात घरांची यादी तयार केली जाईल. हे काम एनपीआर सोबतच 1 एप्रिलपासून सुरू होईल. जनगणनेचा दूसरा टप्पा 28 फेब्रुवारी 2021 ला सुरू होईल. ज्यात लोकांची मोजदाद केली जाईल. जनगणनेमध्ये घर, घरात राहणारे लोक, त्यांचे उत्पन्नाचे मार्ग, साक्षरता, शिक्षण, घरातील सोयी सुविधा, प्रजनन, मृत्यू, भाषा, अनुसूचित जाती जमाती, अपंगत्व, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, घर कच्चे का पक्के, शेती आहे का? असेल तर जिरायती का बागायती इत्यादी माहिती गोळा केली जाते. याचे एकूण 29 कॉलम आहेत. त्यात फक्त टिकमार्क केले जाते. कोणाचीही व्यक्तिगत माहिती जसे मतदान कार्ड, आधार कार्ड इत्यादी मागितले जात नाही. नाव देखील विचारले जात नाही. फक्त संख्या मोजली जाते.
एनआरसी
एनआरसीमध्ये फक्त देशातील अधिकृत नागरिकांचीच नोंद घेतली जाते. सध्या एनआरसी फक्त आसामसाठी लागू केलेला आहे. संपूर्ण देशात त्याची प्रक्रिया लागू करण्याचा सरकारचा इरादा नाही. एनआरसीमध्ये फक्त नागरिकांची सविस्तर माहितीच घेतली जात नाही तर सर्व कागदपत्रे दाखवावी लागतात. एनआरसीमध्ये नागरिकत्वाचा (रहिवाशी) पुरावा मागितला जातो.
Post a Comment