Halloween Costume ideas 2015

भांडवलशाही साम्राज्य आणि स्त्रिया : इस्लामी दृष्टीकोन

इस्लाम प्रत्येक स्तरावर न्यायाचा कैवारी आहे. त्याचे सिद्धान्त, जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रातील अन्याय आणि शोषणाला मुळातून उखडून टाकतात. इस्लामी धर्मशास्त्रामध्ये महिलांसंबंधीचे सिद्धान्तसुद्धा समानता आणि न्यायाचे द्योतक आहेत आणि त्यामुळे भांडवलशाहीवर्गाचे स्त्रियांच्या शोषणाचे सर्व मार्ग बंद केले जातात. इस्लाम स्त्रियांचे ’स्त्रीत्व’ आणि त्यांच्या ’अस्मिते’चे रक्षण आणि प्रतिष्ठा प्रदान करतो. स्त्रियांना त्यांचे सर्व अधिकार, त्यांचे नारी-व्यक्तीत्व, त्यांची अस्मिता आणि आवश्यकता लक्षात घेऊन दिले जातात. अशा प्रकारे मुस्लिम स्त्रीला इस्लाममध्ये खरी लैंगिक समानता मिळत असल्यामुळे भांडवलशाहीमार्फत बेंबीच्या देठापासून ओरडून दिल्या जाणार्‍या तथाकथित लैंगिक समानतेच्या फसव्या घोषणांमुळे ती धोका खात नाही.
    व्यवसाय आणि अर्थव्यवस्थेसंबंधी इस्लामचा दृष्टीकोन - इस्लामने स्त्रीला तिचे शिक्षण आणि योग्यतेनुसार समाज आणि संस्कृतीची सेवा करण्याची अनुमती दिली आहे. अल्लाहचे शेवटचे पैगंबर मुहम्मद (सल्ल.) यांच्या काळात बर्‍याचशा स्त्रिया निरनिराळी आर्थिक कार्ये तडीस नेत असत. आमच्या विद्वानांनी आर्थिक आवश्यकते व्यतिरिक्त आपला वेळ आणि आपल्या योग्यतेचा उत्कृष्ट उपयोग समाज आणि संस्कृतीची सेवा, उत्पन्नात वाढ आणि ईशमार्गात खर्च करण्यासाठी स्त्रियांना काम करण्याची अनुमती दिली आहे. (मौलाना जलालुद्दीन उमरी यांचे पुस्तक ’कुटुंब व्यवस्था’, पृ. 117-121, आवृत्ती 2008).

 स्त्रीयांवर कोणतीही आर्थिक जबाबदारी नाही
भांडवलशाही धारणेनुसार आपल्यासाठी आवश्यक असलेल्या आर्थिक बाबीसाठी स्त्रीला स्वत:वर अवलंबून राहण्याचे स्वप्न दाखविले आहे. याचे कारण असे सांगितले आहे की स्वातंत्र्य तिला शक्तीमान (एम्पॉवर्ड) बनविते. इस्लामच्या दृष्टीने हा विचार चुकीचा आहे. इस्लामने आपापसातील सहयोग, भागीदारी आणि प्रेम हा कुटुंबाचा पाया ठरविला आहे. घरच्या जबाबदार्‍यांमध्ये कामाच्या विभागणीला कुटुंबाचा पाया ठरविला आहे. त्यानुसार स्त्रीया कुटुंबाची देखरेख आणि काळजीवाहक बनविले. आर्थिक काम करण्यास स्त्रीला फक्त परवानगी दिली आहे. तिच्यावर कोणतीही आर्थिक जबाबदारी टाकलेली नाही. घरच्या आर्थिक व्यवहाराची पूर्ण जबाबदारी फक्त पुरूषावर आहे. पत्नीच्या सर्व खर्चाची जबाबदारी ही पतीवर आहे.
    ” पुरूष स्त्रियांवर विश्‍वस्त आहेत, या आधारावर की अल्लाहने त्यांच्यापैकी एकाला दुसर्‍यावर श्रेष्ठत्व दिले आहे. आणि या आधारावर की पुरूष आपली संपत्ती खर्च करतात. (दिव्य कुरआन, 4:34).
” अशा अवस्थेत मुलांच्या पित्याने परिचित पद्धतीनुसार, जेवण-खाण व कपडे-लत्ते दिले पाहिजेत.” (दिव्य कुरआन, 2:233).
    अल्लाहचे पैगंबर मुहम्मद (स.) म्हणाले, ”स्त्रियांचा तुमच्यावर हक्क आहे की तुम्ही त्यांना चांगल्या पद्धतीने खाऊ-पिऊ द्यावे आणि कपडे द्यावेत.” (हदीस : मुस्लिम).
    जर पती नसेल (म्हणजे स्त्री विधवा असेल किंवा घटस्फोटित असेल) तर इस्लाम स्त्रीच्या पालनपोषणाची जबाबदारी तिच्या पित्यावर टाकतो आणि जर पालनपोषण करणारा कोणीच नसेल तर तिच्या पालनपोषणाची जबाबदारी इस्लामी राज्याची असते. पत्नी जरी कमावती असली तरी तिच्या पूर्ण कमाईवर फक्त   तिचाच अधिकार असतो. पती आणि सासुरवाडीचे नातेवाईक स्त्रीला नोकरी करण्यास भाग पाडू शकत नाही आणि नोकरी करणार्‍या स्त्रीस आपली कमाई देण्याससुद्धा भाग पाडू शकत नाहीत आणि कमाविणार्‍या स्त्रीच्या सर्व उदरनिर्वाहाच्या खर्चाचीसुद्धा जबाबदारी पतीवरच असते.
    ”आणि जे काही अल्लाहने तुमच्यापैकी एखाद्याला दुसर्‍याच्या तुलनेत अधिक दिले आहे. त्याची अभिलाषा धरू नका, जे काही पुरूषांनी कमविले आहे त्यानुसार त्यांचा वाटा आहे आणि जे काही स्त्रियांनी कमविले आहे. त्यानुसार त्यांचा वाटा होय, अल्लाहजवळ त्याच्या कृपेची प्रार्थना करीत राहा, नि:संशय अल्लाहला प्रत्येक वस्तूचे ज्ञान आहे.” (दिव्य कुरआर, 4:32).
    इस्लामचा हा सिद्धान्त स्त्रीसाठी नोकरी किंवा आर्थिक व्यवहाराला फक्त तिची आवड किंवा सांस्कृतिक सेवा इथपर्यंत मर्यादित करतो. सामान्य परिस्थितीमध्ये स्त्री एकतर स्वत:ला कामात मग्न ठेवण्यासाठी आर्थिक व्यवहार आणि नोकरी करू शकते किंवा आपले ज्ञान आणि कला यांचा उपयोग करण्यासाठी किंवा कोणत्याही मोठ्या सांस्कृतिक किंवा सामाजिक आवश्यकतेची पूर्तता करण्यासाठी हे काम तिच्या जबाबदारीमध्ये सामील नाही, म्हणून या कामासाठी तिला तणावात राहण्याची आवश्यकता नाही किंवा कोणताही त्रास घेण्याचीही आवश्यकता नाही. जर तिची परिस्थिती किंवा कामाच्या जागेची अवस्था आणि काम करण्याची जागा अनुकूल असेल (म्हणजे) हे काम किंवा कार्यमग्नता तिच्यासाठी सुखद अनुभव आहे) आणि याबराबरच तिची कौटुंबिक जबाबदारी आणि धार्मिक अपेक्षांची पूर्तता सहज शक्य असल्यास ती स्वत: आपल्या निर्णयानुासर आणि पतीच्या परवानगीने असे काम करू शकते. यामुळे मिळणार्‍या कमाईतून स्वत:वर, आई-वडिलांवर किंवा नातेवाईकांवर, गरीबांवर आणि अल्लाहच्या मार्गात किंवा ती इच्छित असेल तर आपल्या मर्जीप्रमाणे पती आणि मुलांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी खर्च करू शकते. परंतु, हे सर्व काही तिच्या मर्जीवर आणि खुशीवर अवलंबून आहे. याप्रमाणे स्त्रीसाठी आर्थिक कार्य स्वेच्छिक काम होउन जाते. ती जेव्हा इच्छिल तेव्हा ते करील आणि तिचा आपल्या मूळ जबाबदारीच्या आडवे काम येत आहे असे वाटेल तर किंवा आपले आरोग्य, मनाची शांती किंवा कौटुंबिक जीवनासाठी हानिकारक वाटत असेल तर ती ते काम सोडू शकते. इस्लामचा हा संतुलित दृष्टिकोन स्त्रीला पारंपरिक समाजाप्रमाणे घरामध्ये बंदिस्त करून तिच्या योग्यतेस नष्ट करण्याचे कारणही बनत नाही किंवा आधुनिक आणि तथाकथित विकासशील समाजाप्रमाणे दुप्पट जबाबदारी टाकून तिचे आरोग्य आणि सुख-शांतीही नष्ट करण्याचे माध्यम बनत नाही. 

स्त्रीची खरी जबाबदारी घर आहे
इस्लाम हे सुद्धा सांगतो की स्त्रीची खरी जबाबदारी, जिच्यासंबंधी ती अल्लाहसमोर उत्तरदायी आहे. तिचे घर आहे. तिने पहिले प्राधान्य घराला द्यावयाचे आहे कारण ते तिच्या जबाबदारीत सामील आहे. ते तिच्या पतीच्या सुख-शांतीस कारणीभूत आहे, ” आणि त्याच्या संकेतचिन्हांपैकी ही आहे की त्याने तुमच्यासाठी तुमच्यामधून पत्नी बनविल्या. जेणेकरून तुम्ही त्यांच्यापाशी संतोष प्राप्त करावा. आणि तुमच्या दरम्यान प्रेम आणि करूणा उत्पन्न केली, निश्‍चितच यात बरीच संकेतचिन्हे आहेत, त्या लोकांसाठी जे मनन व चिंतन करतात.” (दिव्य कुरआन, 30:21).
पती, त्याचे घर आणि मुलांच्या बाबतीत अल्लाहसमोर जबाबदार आहे,” तुमच्यापैकी प्रत्येकजण जबाबदार आहे आणि तुमच्यावर अवलंबून असलेल्यांच्या बाबतीत जबाबदार आहे. स्त्री आपल्या पतीचे घर आणि त्याची मुले यांच्या बाबतीत उत्तरदायी आणि रक्षक आहे.” (हदीस : बुखारी)
    ”उंटावर स्वार होणार्‍या (अरबांच्या) स्त्रियांमध्ये सर्वोत्कृष्ट कुरैशांच्या (स्त्रिया) प्रामाणिक आणि संयमी असतात, ज्या आपल्या छोट्या मुलांच्या बाबतीत दयाळू आणि पतीच्या व्यवहारांची रक्षण करणार्‍या असतात.” (हदीस : बुखारी).
Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget