Halloween Costume ideas 2015

अल्माइदा : ईशवाणी (सुबोध कुरआन)

(९७) अल्लाहने आदरणीय गृह, काबाला लोकांकरिता (सामुस्रfयक जीवनाच्या) प्रस्थापनेचे साधन बनविले आणि आदरणीय महिने व कुर्बानीची जनावरे आणि पट्टेसुद्धा (या कार्यात  साहाय्यक बनविले)११३ जेणेकरून तुम्हाला कळावे की अल्लाह आकाशांच्या व पृथ्वीच्या सर्व परिस्थितीचा जाणकार आहे आणि त्याला प्रत्येक गोष्टीचे ज्ञान आहे.११४
(९८) सावध व्हा, अल्लाह शिक्षा देण्यातसुद्धा कठोर आहे आणि त्याचबरोबर फार क्षमाशील व दयाळूदेखील आहे.
(९९) पैगंबरावर तर केवळ संदेश पोहचविण्याची जबाबदारी आहे, यानंतर तुमच्या उघड व गुप्त सर्व गोष्टींना जाणणारा अल्लाह आहे.
(१००) हे पैगंबर (स.), यांना सांगा की पवित्र आणि अपवित्र कोणत्याही परिस्थितीत एकसारखे नाहीत मग अपवित्र गोष्टींचे आधिक्य तुम्हाला कितीही मोहित करणारे असो,११५ म्हणून   हे सबुद्ध लोकांनो, अल्लाहच्या अवज्ञेपासून दूर राहा, आशा आहे की तुम्हाला यश लाभेल.
(१०१) हे श्रद्धावंतांनो, अशा गोष्टी विचारीत जाऊ नका ज्या तुम्हासमोर उघड केल्या गेल्या तर तुम्हाला त्या वाईट वाटतील.११६ परंतु जर तुम्ही त्या अशावेळी विचारल्यात जेव्हा कुरआन अवतरित होत असेल तर त्या

११३) अरबमध्ये काबागृहाचे महत्त्व एक पवित्र उपासनागृह म्हणूनच नाही तर त्याची केंद्रीयता आणि पावनतेमुळे ते स्थान पूर्ण देशाचे आर्थिक आणि सांस्कृतिक जीवनाधार बनलेले  होते. हज आणि उमरासाठी संपूर्ण देश या काबागृहाकडे आकर्षित होऊन येत असे. या संमेलनामुळे अरब लोकांत एकता निर्माण होत होती. वेगवेगळया कबिल्याचे आणि क्षेत्राचे लोक  आपसात सांस्कृतिक संबंध बनवित. काव्याच्या प्रतियोगीतांद्वारा त्यांच्या साहित्य आणि भाषेत विकास घडून येत होता आणि व्यापार उदिमांमुळे पूर्ण देशाची आर्थिक गरजपूर्तीता होत   होती. आदरणीय महिन्यांच्यामुळे अरबांना वर्षातील एकतृतीयांश काळ शांतीकाळ म्हणून प्राप्त् होत असे. याच काळात देशाच्या एका टोकापासून ते दुसऱ्या टोकापर्यंत ये-जा सुरक्षितपणे  होत होती. कुर्बानीच्या जनावरांची आणि इतर साहित्याची मोठी उलाढाल होत असे. कुर्बानीच्या जनावरांच्या गळयात पट्टा बांधलेला असे. त्याला पाहून कोणीही त्या जनावराची चोरी करत नसे की कत्तल करीत नसे.
११४) तुम्ही या व्यवस्थेवर विचार केला तर तुम्हाला स्वत: आपल्या देशाच्या सांस्कृतिक आणि आर्थिक जीवनातच स्पष्ट साक्ष मिळेल की अल्लाह आपल्या सृष्टीच्या (निर्मितीच्या)  हिताचे आणि आवश्यकतांचे पूर्ण ज्ञान राखून आहे. अल्लाह आपल्या एक एक आदेशाने मानवी जीवनाच्या अनेकानेक क्षेत्रांना लाभान्वित करतो. अशांतीचेही अनेक शतके जे पैगंबर  मुहम्मद (स.) यांच्या येण्याअगोदरची होती त्यांत तुम्ही स्वत:च्या हितांपासून, अधिकारांपासून अपरिचित होता आणि स्वत:चा विनाश करू पाहात होता. परंतु अल्लाह तुमच्या गरजांना  पूर्ण जाणून होता. अल्लाहने फक्त एका काबागृहाची केंद्रीयता स्थापन करून तुमच्यासाठी ती कायमस्वरूपी व्यवस्था करून ठेवली आहे ज्यामुळे तुमचे राष्ट्रीय जीवन आबाधित राहिले  आहे. दुसऱ्या अनेक गोष्टींना सोडून फक्त याच एका गोष्टीकडे लक्ष केंद्रित केले तर तुम्हाला विश्वास होईल की अल्लाहने तुम्हाला जे आदेश दिलेले आहेत; त्यात तुमचीच भलाई आहे.  त्या आदेशांत तुमच्यासाठी अनेक हित निहित आहेत ज्यांना तुम्ही स्वत: समजू शकत नाही की आपल्या उपायांनी पूर्ण करू शकत नाही.
११५) ही आयत मूल्यांकनविषयीचा दुसराच आदर्श ठेवते. हा मानवी आदर्शापेक्षा अगदी वेगळा आदर्श आहे. जाहीररित्या तर शंभर रुपये हे पाच रुपयापेक्षा अनिवार्यत: अधिक मूल्यवान  आहेत. कारण ते शंभर आहेत आणि हे पाच. परंतु ही आयत म्हणते की शंभर रुपये अल्लाहची अवज्ञा करून प्राप्त् केले असतील तर ते अपवित्र आहेत, आणि पाच रुपये अल्लाहचे  आज्ञापालन करून कमविले गेले तर ते पवित्र आहेत. अपवित्र संख्येत कि तीही मोठे असोत ते पवित्र गोष्टीबरोबर होऊ शकत नाही. घाणीच्या एका ढिगापेक्षा सुगंधाचा एक थेंब अधिक   मूल्यवान आहे आणि लघवी (मुत्र) ने भरलेल्या एका टाकी पेक्षा स्वच्छ पाण्याची एक ओंजळ जास्त मूल्यवान आहे. म्हणून एका सच्च्या बुद्धिमान व्यक्तीला अनिवार्यत: हलाल (पवित्र)  गोष्टीवरच समाधानी राहिले पाहिजे. मग ते कितीही हलके आणि कमी असोत. मनुष्याने हरामाकडे हाथ कधीही पैâलावू नये मग तो कितीही अधिक आणि शानदार का असेना.
११६) पैगंबर मुहम्मद (स.) यांना काही लोक विचित्र प्रकारचे आणि निरर्थक प्रश्न करीत असत. इस्लामी जीवनपद्धतीशी त्यांचे काही देणे घेणे नसे आणि जगाविषयी संबंधित ते प्रश्न  नसत. एके ठिकाणी पैगंबर मुहम्मद (स.) यांना भरसभेत एका महाभागाने प्रश्न विचारला, ``माझा खरा बाप कोण आहे?'' अशाप्रकारे लोक निरर्थक प्रश्न विचारत व अशांचे   निश्चयीकरण करू पाहात असत ज्यांना अल्लाहने काही कारणांमुळे अनिश्चित ठेवले आहे. उदा. कुरआनमध्ये संक्षिप्त्पणे हा आदेश दिला आहे की हज तुमच्यावर फर्ज (अनिवार्य) आहे.   एकाने आदेश ऐकून त्वरित पैगंबर मुहम्मद (स.) यांना प्रश्न केला, ``काय प्रत्येक वर्षी फर्ज केला आहे?'' यावर पैगंबर मुहम्मद (स.) यांनी काहीच उत्तर दिले नाही. त्याने पुन्हा  विचारले पैगंबर मुहम्मद (स.) स्तब्ध बसले. तिसऱ्यांदा त्या व्यक्तीने विचारल्यानंतर पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ``तुमच्यावर कींव करावीशी वाटते. माझ्या तोंडून होय  निघाल्यास प्रत्येक वर्षी हज अनिवार्य होईल आणि मग तुम्हीच त्याचे पालन करू शकणार नाहीत आणि अवज्ञा करू लागाल.'' अशाप्रकारच्या निरर्थक आणि अनावश्यक प्रश्न न   विचारण्यास या आयतद्वारे सांगण्यात आले आहे. पैगंबर मुहम्मद (स.) लोकांना अधिक प्रश्न विचारण्यापासून आणि विनाकारण कीस काढण्यापासून रोखत असत. हदीसमध्ये आले  आहे, ``मुस्लिमांपैकी सर्वात मोठा अपराधी तो आहे ज्याने एखाद्या गोष्टीविषयी प्रश्न केला जी लोकांवर हराम केली नव्हती नंतर केवळ त्याच्या पुन्हा पुन्हा प्रश्न विचारल्यामुळे ती  गोष्ट हराम ठरविली गेली.'' एका दुसऱ्या हदीसमध्ये आहे ``अल्लाहने तुमच्यावर काही जबाबदाऱ्या टाकल्या आहेत. त्यांंना बरबाद करू नका. काहींना हराम केले आहे त्यांच्याजवळसुद्धा  फटकू नका. काही सीमा निश्चित केल्या आहेत म्हणून त्यांचे सीमोल्लंघन करू नका. काही गोष्टींविषयी स्तब्धता पाळली आहे म्हणून त्यांचा कीस काढत बसू नका.'' या दोन्ही  हदीसकथनावरून एक महत्त्वपूर्ण तथ्यापासून सचेत करण्यात आले आहे. म्हणजे ज्या गोष्टींना शरियत देणाऱ्याने (अल्लाहने) संक्षिप्त् रूपात वर्णन केले आहे आणि त्यांचे विस्तृत  विवेचन केले नाही. जे आदेश संक्षिप्त् रूपात दिले आहेत आणि मात्रा, संख्या आणि इतर गोष्टी निश्चित केल्या नाहीत. त्यात संक्षिप्त्ता असणे व विस्तृत विवेचनाचा अभाव यामुळे  नाही की शरीयत देणाऱ्याकडून चूकभूल झाली किंवा विस्तृत विवेचन करावयास हवे होते. परंतु विसरून राहिले असे नाही तर याचे मूळ कारण हे आहे की शरियत (धर्मशास्त्र) देणारा  या गोष्टींना विस्तृत विवेचन देऊन सीमित करू इच्छित नव्हता. तसेच लोकांसाठी आदेशात व्यापकता ठेऊ इच्छित होता. आता जो कोणी एखाद्या गोष्टीचा कीस काढत असेल व  विस्तृत विवेचनाला, निश्चित केलेल्या गोष्टींना आणि बंधनात वाढ करू इच्छित असेल. शरियत देणाऱ्याच्या शब्दांशी छेडछाड करून येनकेनप्रकारे संक्षिप्त्ला विस्तृत, अबाधतेस बाधित   व अनिश्चितेला निश्चित बनवून सोडतो; अशी व्यक्ती मुस्लिमांना मोठ्या संकटात टाकते. नैसर्गिक मामल्यात जितके विस्तृत विवेचन असेल तर ईमान धारण करणाऱ्यांसाठी  अधिकाधिक संभ्रम निर्माण होईल आणि आदेशात जितकी बंधने अधिक असतील तेव्हा आज्ञापालन करणाऱ्यांसाठी आदेशाचे उल्लंघन करण्याची शक्यता बळावते.

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget