महाराष्ट्रात महिला अत्याचारांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. पुरोगामी म्हणविणार्या महाराष्ट्रात गत चार वर्षात जवळपास 28 हजार 154 महिला अत्याचाराच्या घटना शासनदफ्तरी नोंदविल्या गेल्या आहेत. त्यातील 27 हजार 464 परिचितांमधील आहेत. बलात्काराच्या गुन्ह्यात तीन वर्षात पोलिसांनी 14 हजार 77 जणांना अटक केली आहे. यातही परिचितांचा आकडा 95 टक्क्यावर आहे. त्यामुळे राज्यातील कौटुंबिक व्यवस्था आणि मित्रत्वातील पावित्र्यता धोक्यात आली आहे. यावर उपाय लवकर शोधून वेळीच जनजागृती केली नाही तर भविष्यात पुरूषांच्या चारित्र्यात अधिक घट होवून परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. प्राथमिक स्तरातील काही घटना ह्या पोलिसांत नोंदविल्या जात नाहीत. त्यांचीही सर्व्हेक्षणाद्वारे आकडेवारी काढली तर फार मोठी निघेल. त्यासाठी प्रत्येक पालकाने सजग राहिले पाहिजे. नैतिक व्यवस्थेला बळ देण्यासाठी जनजागृती वाढविली पाहिजे.
फेब्रवारीच्या सुरूवातीलच म्हणजे 1 फेब्रुवारीला सांगली शहरात एका प्रेमी युगुलाला बेदम मारहाण करून काही तरूणांनी त्या तरूणीचा सामुहिक विनयभंग केला व या घटनेचे चित्रीकरण केले. तसेच हिंगणघाट (जि. वर्धा) येथील 25 वर्षीय तरूण प्राध्यापिकेने जेव्हा विवाहित विकेश नागराळे याला नकार दिला तेव्हा विकेशने 3 फेब्रुवारीला तिच्यावर पेट्रोल टाकून भर रस्त्यात पेटवून दिले. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करून सुद्धा ती वाचू शकली नाही आणि शेवटी 10 फेब्रुवारी रोजी तिची प्राणज्योत मालवली. 4 फेब्रुवारीला सिल्लोड तालुक्यातील संतोष मोहिते नावाच्या एका बीअरबार चालकाने एका स्त्रीच्या घरात घुसून तिला जाळून टाकले. 6 फेब्रुवारीला दिल्लीच्या गार्गी गर्ल्स कॉलेजमध्ये वार्षिक युवक महोत्सवाच्या दरम्यान, सुरू असलेल्या संगीत कार्यक्रमामध्ये हजारोंच्या संख्येने तरूण घुसले व मिळेल त्या मुलीला ओरबडू लागले. कॅम्पसमध्येच त्यांनी दारू ढोसली, अंडी खाल्ली, फरसान खाल्ला आणि मुलींवर लैंगिक हल्ले केले. एकेका मुलीला अनेक मुलांनी अक्षरशः ओरबडले. त्यांनी अशा पद्धतीने लैंगिक हल्ले केले की, त्या हल्ल्यांचे वर्णन शब्दामध्ये करता येणे शक्य नाही. ह्या सामुहिक विनयभंगाच्या घटनेनंतर मुलींनी जेव्हा महाविद्यालयाच्या महिला प्राचार्यांकडे तक्रार केली तेव्हा त्यांनी कुठलाही प्रतिसाद दिला नाही. 7 फेब्रुवारीला दिनेशचंद्र मोहतूरे नावाच्या महाराजाने भंडारा जिल्ह्यातील मोहदूरा गावात सुरू असलेल्या भागवत सप्ताहाच्या निमित्ताने प्रवचन देण्यासाठी येवून यजमानाच्या घरातील सुनच पळवून नेली.
याच आठवड्यात लोकमतमध्ये जमीर काझी यांनी महाराष्ट्रातील महिलांवर होणार्या लैंगिक अत्याचाराचा आढावा घेतला. तेव्हा त्यांना आढळून आले की, महाराष्ट्रात दोन तासात एक बलात्कार होतोय आणि रोज 34 महिलांचा विनयभंग केला जातो. ही तर झाली ढोबळ आकडेवारी. परंतु, देशाचे एकंदरित चित्र पाहिले आणि गार्गी गर्ल्स कॉलेजच्या मुलींवर तरूणांनी केलेला सामुहिक लैंगिक हल्ला पाहिला तर देशाच्या सर्वसाधारण पुरूषांचे चारित्र्य किती खालच्या पातळीवर पोहोचले आहे, याची परिचिती येते. मनोरंजनाच्या नावाखाली रात्रंदिवस लैंगिक उत्तेजना वाढविणारे कार्यक्रम, द्विअर्थी संवादाने भरलेले अश्लिल चित्रपट आणि पॉर्न तसेच सोबतीला दारूचा मुबलक पुरवठा एखाद्या समाजातील पुरूषांना गटारीपर्यंत नेण्यासाठी या सर्व गोष्टी पुरेशा आहेत. चित्रपटांचा आणि वाहिन्यांचा परिणाम होत नाही, असे ज्यांना वाटते त्यांनी आपले मत पुन्हा एकदा तपासून पाहण्याची गरज निर्माण झालेली आहे. महिलांवर अत्याचाराची लाट जरी फेब्रुवारीमध्ये आली असल्याचे वाटत असले तरी महिलांवरील हल्ले हे नित्याचीच बाब झाली आहे. अजून हैद्राबाद येथील तरूण महिला पशुवैद्यकीय अधिकार्यावर झालेल्या गँगरेपकरून ठार मारण्याची घटना विस्मृतीत गेली नाही तोच हिंगणघाटच्या तरूण प्राध्यापिकेच्या मृत्यूची बातमी आली.
दिल्लीत घडलेल्या निर्भया प्रकरणानंतर कायदा कडक करण्यात आला. त्याचाही काही परिणाम नाही झाला. याचे कारण म्हणजे समाजामध्ये लैंगिक भावना चाळवण्यासाठी अनेक मार्ग सहज उपलब्ध आहेत. त्यास देशातील तरूण बळी पडत आहेत. त्यांच्या लक्षातच येत नाही की आपण कशाच्या आहारी जात आहोत ते. सतत लैंगिक विचार, लैंगिक क्लिप्स, लैंगिक उत्तेजना वाढविणारे वाहिन्यांवरील कार्यक्रम, लैंगिक शक्ती वाढविण्याचा दावा करणार्या औषधाच्या जाहिराती, कंडोम्सच्या जाहिराती, फॅशन शोचे आयोजन इत्यादीमुळे देशातील पुरूषांसमोर नियमितपणे जे दाखविले जाते त्याचा निश्चितपणे परिणाम पुरूषांच्या मानसिकतेवर होतो व ते संधी मिळेल तेव्हा महिलांवर लैंगिक हल्ले करण्यासाठी प्रवृत्त होतात.
या सर्व हल्ल्यांपासून महिलांना सुरक्षित करण्यासाठी इस्लामने जी आचारसंहिता स्त्री-पुरूषांसाठी ठरवून दिलेली आहे तिची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. समाजाचे वातावरण जास्तीत जास्त पवित्र कसे ठेवता येईल, यासाठी इस्लामने हलाल आणि हरामची संकल्पना दिलेली आहे. दारू आणि अश्लिलता याला हराम ठरविलेले आहे. कुटुंब व्यवस्था मजबूत ठेवण्यासाठी महेरमची व्यवस्था केली आहे. स्त्रीला परद्याची व्यवस्था दिलेली आहे. तर पुरूषांना परस्त्रियांपासून दूर राहण्याची शिकवण दिलेली आहे. एकंदरित समाजामध्ये पावित्र्याचा स्तर उंच ठेवण्याकडे इस्लामची मोठी शक्ती खर्ची जाते. आणि त्याचा परिणाम समाजामध्ये महिलांच्या सुरक्षिततेमध्ये होतो. याचा अनुभव आखाती देशातील लाखो भारतीय पुरूषांना याची देही याची डोळा होतो. जे तेथे कामानिमित्त गेले आहेत. जगातील सर्वात सुरक्षित महिला या आखाती देशामधील महिला मानल्या जातात. कारण या ठिकाणी स्त्री आणि पुरूष या दोघांसाठी शरियतने ठरवून दिलेली परद्याची पद्धत सक्तीने राबविली जाते.
- बशीर शेख, उपसंपादक

Post a Comment