Halloween Costume ideas 2015

पूरग्रस्त परिस्थितीतून सावरण्यासाठी ‘जमाअत’चे कौतूकपात्र कार्य ः काळे

शिरोळ (आशपाठ पठाण) 
कोल्हापूर जिल्ह्यात चार महिन्यांपूर्वी आलेल्या पूरस्थितीने जनजीवन विस्कळीत केले होते. या पूरपरिस्थितीतून सावरण्यासाठी विविध सामाजिक संघटना व नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात मदत मिळाली. यामध्ये जमाअत-ए-इस्लामी हिंदचे कार्य कौतुकास्पद राहिले. त्यांनी अथक परिश्रम घेत पूरपरिस्थितीतून लोकांना बाहेर काढले. मेडिकल कॅम्प लावले. आता जमाअत कनवाड येथील नागरिकांसाठी घरकूल बांधणी करून देत आहे. हे अतिशय लोकोपयोगी कार्य असून, यापुढील काळातही प्रशासन आपल्याला लागेल ती मदत करण्यासाठी तयार आहे, असे किशोर काळे म्हणाले.
    जमाअत ए इस्लामी हिंद महाराष्ट्र व आयडियल रिलीफ कमिटी ट्रस्ट च्या वतीने पुरग्रस्तांसाठी बांधण्यात येणार्‍या घराच्या पायाभरणीचा उदघाट्न कार्यक्रम 26 जानेवारी रोजी कणवाड येथे झाला. यावेळी ते बोलत होते.
    कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जमाअतचे महाराष्ट्र उपाध्यक्ष सय्यद जमीर कादरी होते. प्रमुख पाहूणे म्हणून जयसिंगपूरचे पोलीस उपाधीक्षक किशोर काळे, बीडीओ शंकर कवितके, मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गणी अजरेकर, डाव्या आघाडीचे चंद्रकांत यादव, कणवाडचे सरपंच बाबासो आरसगोंडा, ग्रामसेवक अनिल बिडकर, इम्तियाज पन्हाळकर, अंजुम देसाई, आर्किटेक आसीफ जमादार उपस्थित होते.
    शिरोळ तालुक्यातील कणवाड हे गाव जमातने दत्तक घेतले आहे. या गावात 38 घरे व स्वच्छ पाण्यासाठी दोन प्युरिफायर उपलब्ध करून दिले जाणार आहेत. प्रारंभी कार्यक्रमाची सुरूवात कुरआन पठणाने झाली. प्रास्ताविक करताना मझहर फारुख म्हणाले, महापुरात सर्व लोक जात-पात विसरून एक दुसर्‍याच्या मदतीला धावून आले. त्यामुळे मोठया संकटाला तोंड देऊ शकलो. फक्त गावात चांगली घरे, स्वछता असल्याने गाव आदर्श होत नाही तर गावातील प्रत्येक व्यक्ती एक दुसर्‍याच्या समस्यांना सोडविण्यासाठी, मदत करण्यासाठी पुढे येणे गरजेचे आहे, असे विचार जोपासणार्‍या गावाला आदर्शगाव म्हंटले पाहिजे.
    सरपंच बाबासो आरसगोंडा म्हणाले, जमाअत ए इस्लामी या संघटनेच्या कामाचे कौतुक  केले. निरपेक्ष भावनेने हे लोक अहोरात्र काम करतात हे महत्वाचे आहे. समाज सेवेचा ध्यास तरुणांनी धरावा व जिद्दीने काम करावे, असा संदेश त्यांनी दिला.             बी. डी. ओ शंकर कवितके म्हणाले, 2019  मध्ये आलेला महापूर सर्वात मोठा महापूर हेाता. निसर्गावर मानवाकडून अतिक्रमण तर होत नाही या प्रकारची भीती त्यांनी व्यक्त केली. निसर्गाने जे नियम घालून दिले होते ते नियम आपण तोडायला सुरुवात केली, त्यामुळे अश्याप्रकाचे संकटे येत असल्याचे ते म्हणाले. सय्यद कादरी म्हणाले,प्रेषित मुहंमद (स.) यांनी लोकांची मदत करण्याची शिकवण समस्त मानवजातीला दिली आहे, त्यांच्या आदर्श जीवन पद्धतीवर चालण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. याचाच एक भाग म्हणून आपल्या कणवाड या गावात 38 कुटूंबाना घरे बांधून देण्यात येणार आहेत असे कादरी म्हणाले.  आज जवळ-जवळ जगात सर्वच ठिकाणी पर्यावरण या विषयावर चर्चा होत असल्याचे दिसून येत आहे, आम्ही सर्वजण पर्यावरणाला धोका पोहोचेल असे वागतो. याबाबतीत विचार करण्याची आवश्यकता आहे, आज महापूर एवढ्या मोठया प्रमाणात का येत आहेत, कमी वेळात पावसाचे प्रमाण जास्त का आहे, यावर तज्ज्ञांचे मत आहे कि, लोक पर्यावरणावर अत्याचार करत आहेत, आपल्या जीवन शैलीत बदल करून पर्यावरणाला धोका होणार नाही असे वर्तन ठेवले पाहिजे,असे कादरी म्हणाले.  उपस्थितांचे आभार कणवाडचे उपसरपंच अख्तर पटेल यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नदीम सिद्दीकी, अन्वर पठाण, अशपाक पठाण, अखिल इनामदार, इस्माईल शेख, अख्तर पठाण आदींनी यांनी परिश्रम घेतले.
Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget