Halloween Costume ideas 2015

आकांक्षापूर्तीचा खरा मार्ग

इन्सान की तलब वहीं पर पूरी होती है
जहाँ से तलब जगाई जाती है

मनुष्य ज्या वातावरणात प्रथम आपले डोळे उघडतो, ते वातावरण त्याला आवडू लागते. लहान बाळ त्याला दिसेल ती वस्तू तोंडात घालण्याचा प्रयत्न करतो. म्हणजेच प्रत्येक वस्तू खाण्यासाठीच असते असा त्याचा समज असतो ही त्याची पहिली आकांक्षा असते. मूल जेव्हा थोडेसे वाढते आणि बागडायला लागते तेव्हा त्याची इच्छा गोडधोड खाण्याची होते. त्याला रंगीबेरंगी कपडे आवडू लागतात आणि ते आपल्याला हवेत म्हणून ते हस्तगत करण्याची आकांक्षा निर्माण होते. मूल जेव्हा शाळेत जावू लागते तेव्हा वर्गामध्ये सर्वात जास्त गुण मिळविण्याची आकांक्षा त्याच्यात निर्माण होते. तरूण झाल्यावर चांगली पदवी मिळवून चांगली नोकरी मिळवून भरपूर संपत्ती कमाविण्याची आकांक्षा त्याच्यात निर्माण होते. हे सर्व प्राप्त करून झाल्यानंतर त्याला पत्नी म्हणून एक सुंदर तरूणीशी विवाह करण्याची आकांक्षा निर्माण होते. ती पूर्ण झाल्यावर आपल्याला गुटगुटीत बाळ व्हावे, अशी इच्छा निर्माण होते. मुलं झाल्यानंतर त्यांना चांगल्या शाळेत शिकविण्याची इच्छा निर्माण होते. मग तो त्यांचे भविष्य उज्ज्वल कसे होईल, यासाठी आयुष्यभर झटत असतो.
    येणेप्रमाणे प्रत्येक मनुष्य जन्मापासून मृत्यूपर्यंत कोणत्या न कोणत्या गोष्टी हस्तगत करण्यामध्येच व्यस्त असतो आणि इच्छित वस्तू हस्तगत करण्याच्या मागेच तो आयुष्यभर पळत असतो.
    परंतु, जर का या इच्छा, आकांक्षाना हस्तगत करण्यापेक्षा त्याने मूळ गोष्टीवर लक्ष केंद्रीत केले तर त्याला
    मनुष्याच्या मनामध्ये तीव्र इच्छा आणि आकांक्षा नसत्या तर त्या हस्तगत करण्यासाठी त्याने प्रयत्नच केले नसते व त्यांच्यातील क्षमतेचा विकासच झाला नसता. म्हणून प्रत्येक माणसाने आपल्या इच्छा आकांक्षेच्या पूर्तीसाठी फक्त अल्लाहकडेच मदत मागावी, कारण अल्लाहशिवाय दूसरी कोणतीही शक्ती नाही जी निस्वार्थपणे कोणालाही काही देऊ शकेल. आपल्याला अपेक्षित गोष्टी चुकीच्या पद्धतीने गोळा करणे, अनैतिक पद्धतीने संपत्ती जमा करणे आणि त्यातून आपल्या इच्छांची पूर्ती करणे हे स्वतःसाठीच नव्हे तर समाजासाठीही विनाशकारी असते. जे लोक अल्लाहने दाखविलेल्या सत्यमार्गावर चालत कष्टाने संपत्ती कमावितात आणि आपल्या इच्छा आणि आकांक्षांची पूर्ती नैतिक चौकटीत राहून करतात त्यांचे जीवन सफल तर होतेच शिवाय त्यांच्यामुळे समाजाचेही कल्याण होते.
    अल्लाहने मानसामध्ये इच्छा आणि आकांक्षा उत्पन्न करून त्याची परीक्षा घेण्याचे ठरविले आहे. अल्लाहने मनुष्यासमोर आकांक्षांची पूर्ती करण्यासाठीचे दोन मार्ग उपलब्ध करून दिलेले आहेत. एक- नैतिक मार्ग, जो की अल्लाहचा मार्ग आहे आणि दूसरा अनैतिक मार्ग, जो सैतानाचा आहे. जर अल्लाहच्या मार्गाचा आपण स्वीकार केला तर इच्छापूर्तींसह आत्मिक आनंदाची अवर्णनीय अशी अनुभूती आपल्याला होते. या उलट जर का सैतानाचा मार्ग चोखाळला तर सकृतदर्शनी यशस्वी झाल्यासारखे जरी वाटले तरी अशी व्यक्तीच नव्हे तर संपूर्ण समाज आयुष्यभर तणावग्रस्त राहतो. याचा अंतिम परिणाम वाईटच होतो. या मार्गात मनुष्य पथभ्रष्ट झाल्याने त्याचा आत्मा आजारी पडतो आणि त्या आजारपणातूनच सामाजिक गुन्हेगारीचा जन्म होतो. म्हणून प्रत्येक माणसाने आपल्या मुलांना अगदी लहानपणापासून सत्य मार्गाची शिकवण द्यावी व वाम मार्गाच्या प्रलोभनापासून दूर राहण्याची ताकीद करावी, जेेणेकरून त्यांचे आयुष्य यशस्वी होईल. मुलांसाठी आई-वडिल अल्लाहकडे मुलांना आकर्षित करण्याचे सर्वात मोठे साधन आहे. अल्लाहने म्हटलेले आहे की, ”तुम्ही सरळ माझ्याकडे आपल्या गरजा मांडा. मी त्या पूर्ण करण्यास समर्थ आहे.” अल्लाहकडे मागितल्यामुळे आपल्याला अपमानास्पद सुद्धा वाटत नाही. याउलट माणसाकडे मागितल्याने आपल्याला अपमानास्पद वाटते. म्हणून दुसर्‍याकडे मागण्यापेक्षा व चुकीच्या मार्गावर पळत राहण्यापेक्षा अल्लाहने दाखविलेल्या मार्गाने कष्ट करून माणसाने जर स्वतःचा संबंध अल्लाहशी जोडून घेतला तर तो कधीच अयशस्वी होत नाही. निर्विवादपणे अल्लाह सर्व सृष्टीचा मालक व चालक आहे. तो सर्व जीव, जंतूंच्या गरजा पूर्ण करण्यास समर्थ आहे. तो फक्त मनुष्यच नव्हे तर पशु-पक्षी आणि अन्य श्‍वापदे एवढेच नव्हे तर पाण्यातील अजस्त्र जीवांचा पोषणकर्ता आहे आणि हे काम तो लिलया करतो. तो सामर्थ्यशाली आहे, म्हणून आपल्याला आपल्या गरजा, इच्छा आणि आकांक्षाच्या पूर्तीसाठी फक्त त्याच्याकडेच रूजू व्हायला हवे. कारण अल्लाह आपल्या मानेच्या मुख्य रक्तवाहिनीपेक्षाही जवळ आहे.

- फेरोजा तस्बीह
मिरजोळी, 9764210789
कळून चुकेल की या सर्व गोष्टी हस्तगत करण्यामागचा मूळ उद्देश काय आहे? प्रत्येकाने विचार केला की आपल्या मनामध्ये ज्या इच्छा निर्माण होत आहेत त्या कोठून निर्माण होत आहेत? तर आपल्याला कळून चुकेल की आपल्या इच्छा कोठून निर्माण होतात? प्रत्येक माणसाच्या मनामध्ये इच्छा, आकांक्षा निर्माण करणारा व त्यांची पूर्ती करणारा एकमेव अल्लाह आहे, ज्याने त्याला जन्माला घातले आणि त्याच्या मनामध्ये इच्छा आणि आकांक्षा निर्माण केल्या.

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget