Halloween Costume ideas 2015

अल्माइदा : ईशवाणी (सुबोध कुरआन)

(११५) अल्लाहने उत्तर दिले, ‘‘मी ते तुमच्यावर अवतरणार आहे,१२९ परंतु त्यानंतर तुमच्यापैकी जो कोणी द्रोह करील त्याला मी अशी शिक्षा देईन जी जगात कोणाला दिली गेली नसेल.’’ -
(११६) तात्पर्य, जेव्हा (या उपकारांची आठवण करून दिल्यानंतर) अल्लाह फर्माविल, ‘‘हे मरयमपुत्र इसा! काय तू लोकांना सांगितले होतेस की अल्लाहशिवाय मला आणि माझ्या  मातेसदेखील ईश्वर बनवा?’’१३० तेव्हा तो उत्तरादाखल सांगेल, ‘‘पवित्र आहे अल्लाह, माझे हे काम नव्हते की ती गोष्ट सांगावी  जी सांगण्याचा मला अधिकार नव्हता, जर मी तसे  सांगितले असते तर अवश्य तुला माहीत झाले असते, तू जाणतो जे काही माझ्या मनात आहे, मी जाणत नाही जे काही तू जाणतोस, तू तर सर्व गुप्त हकिगतीचा ज्ञानी आहेस.
(११७) मी त्यांना त्याशिवाय काहीच सांगितले नाही ज्याची मला तू आज्ञा दिली होती. ते हे की अल्लाहची बंदगी (भक्ती) करा जो माझा पालनकर्ता आहे आणि तुमचा पालनकर्तादेखील.  मी त्या वेळेपर्यंतच त्यांचा निरीक्षक होतो जोपर्यंत मी त्यांच्या दरम्यान होतो. जेव्हा तू मला परत बोलावून घेतलेस तेव्हा तूच त्यांचा निरीक्षक होतास आणि तू तर सर्वच गोष्टींचा निरीक्षक आहेस.
(११८) आता जर तू त्यांना शिक्षा केलीस तर ते तुझे दास आहेत व जर तू माफी दिली तर तू प्रभुत्वसंपन्न व बुद्धिमान आहेस.’’
(११९) तेव्हा अल्लाह फर्माविल, ‘‘हा तो दिवस आहे, ज्या दिवशी खऱ्यांना त्यांची सचोटी लाभदायक ठरेल. त्यांच्याकरिता अशी उद्याने आहेत ज्यांच्या खालून कालवे वाहात आहेत, येथे  ते सदैव राहतील. अल्लाह त्यांच्यावर प्रसन्न झाला व ते अल्लाहवर. हेच महान यश आहे.’’
(१२०) पृथ्वी व आकाशांवर आणि त्यात आqस्तत्वात असलेल्या सर्वांवर राज्य अल्लाहचेच आहे आणि प्रत्येक वस्तूवर तो प्रभुत्व राखतो.


१२९) कुरआन याविषयी गप्प आहे की ही जेवणाची थाळी उतरविली गेली किंवा नाही. दुसऱ्या एखाद्या विश्वसनीय माध्यमाद्वारासुद्धा याचे उत्तर सापडत नाही. शक्य आहे की ही थाळी  उतरली असेल. तसेच शक्य आहे की हवारींनी नंतरची धमकी ऐकून आपली विनंतीवजा मागणी मागे घेतली असेल.
१३०) खिस्ती लोकांनी अल्लाहबरोबर फक्त इसा मसीह (अ.) आणि पवित्र आत्म्यालाच खुदा बनविले नाही तर इसा मसीह (अ.) यांची माता आदरणीय मरयमलासुद्धा एका स्थायी   स्वरूपात खुदा (पूजनीय) बनविले. आदरणीय मरयम (अ.) यांच्या ईशत्व आणि अति पावनतेविषयी एकही संकेत बायबलमध्ये आला नाही. इसा मसीह (अ.) यांच्यानंतर तीनशे  वर्षांपर्यंत खिश्चन जग या कल्पनेपासून अनभिज्ञ होते.
इ.स. तिसऱ्या शतकाच्या अंतिम काळात सिकंदरिया च्या काही धार्मिक विद्वानांनी व आचार्यांनी प्रथमत: आदरणीय मरयम (अ.) यांना ईश्वराची आई म्हटले. यानंतर हळूहळू मरयम  यांना ईशत्व बहाल करण्यात आले आणि त्यांची पूजा होऊ लागली. परंतु प्रारंभी चर्च याला स्वीकारण्यास तयार नव्हता आणि मरयमची पूजा करणाऱ्यांना मार्गभ्रष्ट समजले जात असे.   परंतु जेव्हा नस्तुरीयसच्या या श्रद्धेवर की इसा मसीहच्या स्वत:च्या अस्तित्वात दोन स्थायी भिन्न भिन्न व्यक्तित्व एकत्रित झाले; खिस्ती जगात वाद-विवादाचे एक तुफान उठले तर   त्याला थोपण्यासाठी इ. स. ४३१ मध्ये अफी सुस शहरात एक सभा आयोजित केली. या सभेमध्ये चर्चच्या सरकारी भाषेत पहिल्यांदा आदरणीय मरयम (अ.) यांच्यासाठी `मादरे खुदा' ची उपाधि (खुदाची आई) दिली गेली. याचा परिणाम असा झाला की मरयमच्या पूजेचा रोग जो चर्चच्या बाहेर फैलावला होता, तो आता चर्चच्या आत फैलावत गेला. कुरआन अवतरणकाळापर्यंत आदरणीय मरयम (अ.) इतकी मोठी देवी बनली की बाप, बेटा आणि पवित्र आत्मा तिन्ही तिच्यासमोर तुच्छ बनले. तिची मूर्ती चर्चमध्ये प्रत्येक ठिकाणी  बसविण्यात आली व त्या मूर्तीपुढे उपासनाच्या प्रत्येक पद्धतीने भक्ती केली जाऊ लागली.
कैसर जस्टीनने आपल्या एका कायद्याच्या प्रस्तावनेत आदरणीय मरयम यांना आपल्या राज्याचा समर्थक आणि सहाय्यक ठरवितो. या राज्याचा प्रसिद्ध जनरल नरसीस नामक   युद्धभूमीत आदरणीय मरयम यांच्यापासून मार्गदर्शन घेत होता. पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या काळातील कैसर हिरकल याने आपल्या ध्वजावर ``ईश-माता''चित्र रेखाटलेले होते. त्या कैसर   राजाला विश्वास होता की या चित्राच्या बरकती (समृद्धी) मुळेच हा ध्वज कधीही झुकणार नाही. नंतरच्या काळात मात्र सुधार आंदोलनाच्या प्रभावाने प्रोटेस्टेन्ट इसाई (खिस्ती) यांनी   मरयमच्या पूजेविरुद्ध मोठा आवाज उठविला. परंतु रोमन कॅथॉलिक चर्च आजपर्यंत याच मार्गावर (मरयमची पूजा) चालत आहे.

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget