Halloween Costume ideas 2015

अल्माइदा : ईशवाणी (सुबोध कुरआन)

(१०१) ...परंतु जर तुम्ही त्या अशावेळी विचारल्यात जेव्हा कुरआन अवतरित होत असेल तर त्या तुमच्यासमोर उघड करण्यात येतील. आतापर्यंत जे काही तुम्ही केले ते अल्लाहने  माफ केले, तो क्षमाशील व सहिष्णू आहे.
(१०२) तुमच्यापूर्वी एका समुदायाने अशाचप्रकारचे प्रश्न केले होते, मग ते लोक याच गोष्टीमुळे अधर्मामध्ये गुरफटून गेले.११७
(१०३) अल्लाहने कोणालादेखील बहिरा ठरविले नाही अथवा सायबा किंवा वसीला आणि हाम,११८ पण हे अधर्मी अल्लाहवर खोटे आरोप ठेवतात आणि त्यांच्यापैकी बहुतेकजण निर्बुद्ध  आहेत. (की अशा भ्रामक कल्पनांवर विश्वास ठेवतात.)
(१०४) आणि जेव्हा त्यांना सांगण्यात येते की या, त्या कायद्याकडे जो अल्लाहने अवतरला आहे आणि या पैगंबराकडे, तर ते उत्तर देतात की आमच्यासाठी तर तीच पद्धत पुरेशी आहे  ज्यावर आमचे पूर्वज आम्हाला आढळले आहेत. मग काय हे पूर्वजांचेच अनुकरण करीत राहतील जरी त्यांना काहीही माहीत नसेल व सरळमार्गाची त्यांना जाणीवच नाही?
(१०५) हे श्रद्धावंतांनो, स्वत:ची काळजी घ्या, एखाददुसऱ्याच्या पथभ्रष्ट होण्याने तुमचे काहीही बिघडत नाही जर तुम्ही स्वत: सरळमार्गावर असाल,११९ अल्लाहकडे तुम्हां सर्वांना परत जायचे आहे मग तो तुम्हाला दाखवेल की तुम्ही काय करीत राहिला आहात.
(१०६) हे श्रद्धावंतांनो, जेव्हा तुम्हापैकी एखाद्याची मृत्यूघटका येईल आणि तो मृत्यूपत्र करीत असेल तर त्याच्यासाठी साक्षीचे प्रमाण  हे होय की तुमच्या समाजामधील दोन  न्यायप्रिय१२० व्यक्तींना साक्षीदार बनवावे, किंवा जर तुम्ही प्रवासात असाल आणि त्या वेळी मृत्यूचे संकट आले, तर परक्यांमधून दोन साक्षीदार घ्यावेत.१२१ मग जर एखादी शंका  निर्माण झाली तर नमाजनंतर दोन्ही साक्षीदारांना (मस्जिदमध्ये) थांबवून घ्यावे व त्यांनी अल्लाहची शपथ घेऊन सांगावे की, ‘‘आम्ही एखाद्या व्यक्तिगत फायद्यासाठी साक्ष विकणारे  लोक नाही, आणि जरी कोणी आमचा नातेवाईक असला तरी (आम्ही त्याचा पक्ष घेणार नाही), आणि अल्लाहप्रीत्यर्थ दिलेल्या साक्षीलादेखील आम्ही लपविणार नाही, जर आम्ही असे  केले तर गुन्हेगारांमध्ये आमची गणना होईल.’’


११७) म्हणजे त्यांनी प्रथम स्वत: धारणामध्ये व आदेशांमध्ये कीस काढला आणि एकेका बाबीत प्रश्नावर प्रश्न विचारून विस्तार व मर्यादांचे एक जाळे आपल्यासाठी निर्माण केले. नंतर स्वत: त्यात फसून श्रद्धाविषयीच्या भ्रष्टतेत आणि व्यावहारिक अवज्ञेत अडकले. या समुदायाशी तात्पर्य यहुदी समुदाय आहे. यांच्या पदचिन्हांवर चालण्यात कुरआन आणि पैगंबर  मुहम्मद (स.) यांनी चेतावनी अनेकदा देऊनसुद्धा मुस्लिमांनी काहीच कसर बाकी ठेवली नाही.
११८) या अरबांच्या अंधविश्वासाचा उल्लेख आहे. ज्याप्रकारे आमच्या देशात गाय, बैल आणि बोकड अल्लाहच्या नावाने किंवा एखाद्या मूर्तीच्या, कबरीच्या, देवताच्या किंवा पीराच्या  नावाने सोडले जातात आणि त्यांच्यापासून कष्ट करून घेतले जात नाही की त्यांचा बळी दिला जात नाही; किंवा त्यांच्यापासून कोणत्याही प्रकारचा लाभ घेणे अवैध आहे. अशाचप्रकारे  अज्ञानकाळात अरब लोकसुद्धा विभिन्न प्रकारे जनावरांना पुण्य समजून सोडून देत असत आणि त्या सोडलेल्या जनावरांचे वेगवेगळे नाव ठेवत असत. `बहिरा' त्या उंटीणीला म्हणत  असत जी पाचदा व्याली असेल आणि शेवटी तिला नर पिल्लू झाला असेल. अशा या उंटीणीचे कान चिरून तिला सोडून दिले जात असे, नंतर तिच्यावर कोणी स्वार होत नसे की तिचे  दूधसुद्धा पिले जात नसे. तसेच तिला बळी देत नसे की तिची लोकर काढली जात नसे. ती कोणत्याही शेतात जाऊन चरत असे आणि कुठल्याही पाणवठ्यावर जाऊन पाणी पित असे.  `साइबा' त्या उंटाला किंवा उंटीणीला म्हटले जात जे एखादा नवस फेडण्यासाठी आजारातून बरे झाल्यावर किंवा संकटातून वाचल्यानंतर कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सोडले जात असे.  तसेच जी उंटीणी दहावेळा व्याली असेल आणि प्रत्येक वेळी मादीलाच जन्म दिला असेल त्या उंटीनीलासुद्धा सोडून दिले जात असे. `वसीला' शेळीचे पहिले कोकरू नर जन्मले तर त्याला  देवाच्या नावाने बळी दिला जात असे. बकरीने प्रथमत: मादीला जन्म दिला तर तिला ठेवून घेतले जात असे. परंतु नर आणि मादी एकाच खेपेला जन्मले तर नराला बळी देण्याऐवजी  देवांच्या नावाने सोडून दिले जाई आणि याचे नाव `वसीला' होते. एखाद्या उंटाचा नातू कामाला योग्य होतो तेव्हा त्या म्हाताऱ्या उंटाला सोडून दिले जात असे तसेच एखाद्या उंटाच्या  वीर्याने दहा पिल्ले झाल्यास तर त्यालासुद्धा सोडून दिले जात असे. यास ``हाम'' म्हणत.
११९) म्हणजे याऐवजी मनुष्याने नेहमी हे पाहत बसावे की कोण काय करीत आहे आणि कोणाच्या श्रद्धेमध्ये काय खराबी आहे आणि कोणाच्या कामामध्ये काय वाईट आहे; त्याला तर  हे पाहिले पाहिजे की स्वत: काय करीत आहे. त्याला तर चिंता आपल्या विचारांची, चारित्र्याची आणि आचरणाची लागली पाहिजे. मनुष्य स्वत: अल्लाहचे आज्ञापालन करीत आहे,  अल्लाह आणि अल्लाहच्या दासांचे जे हक्क त्याच्यावर आहेत त्या सर्वांना तो अदा करीत आहे, तसेच धर्मपरायणता आणि सत्यवादीतेच्या अपेक्षांना तो चांगल्या प्रकारे पूर्ण करत आहे  आणि तो सदाचाराचा आदेश देतो आणि दुराचारापासून रोखतो तर निश्चितच अशा माणसासाठी एखाद्याची मार्गभ्रष्टता, दुराचार त्याच्यासाठी हानिकारक ठरू शकत नाही.
या आयतचा हा आशय कदापि नाही की मनुष्याने फक्त आपल्या मुक्तीचीच चिंता करावी आणि दुसऱ्यांच्या सुधारणेची काळजी करू नये. माननीय अबू बकर सिद्दीक (रजि.) या भ्रमाला  दूर करताना आपल्या एका भाषणात सांगतात. ``लोकहो! तुम्ही या आयतचे पठण करता आणि त्याचा चुकीचा अर्थ काढता. मी अल्लाहचे पैगंबर मुहम्मद (स.) यांना सांगताना ऐकले  आहे की, जेव्हा लोकांची ही स्थिती होईल कि ते वाईटाला पाहतील परंतु त्याला नष्ट करण्याचा प्रयत्न करणार नाहीत. अत्याचारीला अत्याचार करतांना पाहतील परंतु त्याचा हात  पकडणार नाही तर असंभव नाही की अल्लाह सर्वांना कोपग्रस्त करील. अल्लाह शपथ ! तुमच्यासाठी आवश्यक आहे की सदाचाराचा आदेश द्यावा आणि दुराचारापासून रोखावे, नाहीतर  अल्लाह तुमच्यावर अशा लोकांना श्रेष्ठत्व बहाल करील की जे तुमच्यापैकी सर्वात वाईट लोक असतील आणि ते तुम्हाला अनेक कष्ट देतील. नंतर तुमचे सदाचारी लोक अल्लाहशी प्रार्थना (दुवा) करतील परंतु ती कबूल होणार नाही.''
१२०) म्हणजे सदाचारी, सत्यप्रिय आणि विश्वासू मुस्लिम.
१२१) यावरून माहीत होते की मुस्लिमांच्या मामल्यात मुस्लिमेतरांना साक्षीदार बनविणे केवळ त्याच स्थितीत योग्य आहे जेव्हा कोणी मुस्लिम व्यक्ती साक्षीदार मिळत नसेल.

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget