Halloween Costume ideas 2015

रमजान परिवर्तन आणि संयमाचा महिना


मुस्लिमांच्या वैयक्तिक आणि सामूहिक जीवनात सर्वांगीण सकारात्मक बदल घडवून आणणे हा रमजान महिन्याचा मुख्य उद्देश आहे. जीवनाच्या प्रत्येक पैलूसंदर्भात अल्लाहचा आदेश स्वीकारण्याची खऱ्या तळमळीचा संदेश यातून मिळतो.  याचे आणखी एक प्रकटीकरण म्हणजे तक्वा. तक्वा म्हणजे इश्वराच्या इच्छेनुसार जबाबदार जीवन जगण्याची वृत्ती. अल्लाह सदैव उपस्थित आणि पाहत असल्याची भावना मनात सातत्याने बाळगणे. याचे आणखी एक लक्षण म्हणजे कुरआनशी असलेला खोल संबंध. कुरआनच्या विचारसरणी, दृष्टिकोन, आत्मा आणि निर्देशाप्रमाणे चारित्र्याचा   विकास.  कुरआनच्या आदेशांची अंमलबजावणी करण्यासाठी प्रबळ इच्छाशक्ती आणि शिस्त विकसित करणे, हे चौथे प्रमुख प्रकटीकरण आहे.  या रमजानचे पाचवे वैशिष्ट्य म्हणजे गोरगरीबांचे दु:ख जाणणे आणि त्यांच्याशी खरी सहानुभूती असणे.  कठोर परिश्रम आणि समर्पण, वेळेचे व्यवस्थापन आणि वेळेचा कार्यक्षम वापर हे त्याचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. हे असे गुण आहेत जे एखाद्या व्यक्तीमध्ये किंवा समाजात जन्माला येतात, मग ते सर्व मानवतेसाठी प्रकाशाचा किरण आणि दयेचा स्रोत बनतात. केवळ परंपरा आणि औपचारिक समारंभाचा सोपस्कार पूर्ण करण्याऐवजी या महिन्यात उपवासाच्या उद्देशांवर लक्ष केंद्रित करणे आणि हा महिना खऱ्या अर्थाने परिवर्तनाचा आणि क्रांतीचा महिना बनवणे ही आपली जबाबदारी आहे. मी अल्लाहकडे प्रार्थना करतो की हा महिना बदलाचा आणि क्रांतीचा स्रोत बनावा, आमीन  

- सय्यद सआदतुल्ला हुसैनी 

अध्यक्ष, जमात-ए-इस्लामी हिंद


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget