Halloween Costume ideas 2015

पवित्र कुरआनाचा ‘आसमानी किताब’ म्हणून आदर करीत छत्रपती शिवराय

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल समाजात काही राजकिय मंडळी गैर समज पसरवितात ते दूर करण्यासाठी अशा कार्यक्रमांचे आयोजन करणे गरजेचे आहे, अशी भावना कार्यक्रमाचे आयोजक अ‍ॅड. श्यामल गायगोळ यांनी व्यक्ती केली. एक हिंदू मंडळ कार्यक्रमाचे आयोजन करतो आणि त्यात एक मुस्लिम व्याख्याता शिवरायावर बोलतो ही एक अभिमानाची बाब आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी उपस्थितांतून उमटली. 


जळका भडंग पि.राजा (प्रतिनिधी)

 छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्यात कधीच भेदभाव केला नाही. सर्व अठरा पगड जातींना घेऊन स्वराज्य निर्माण केलं. त्यांनी गुणवत्तेच्या आधारावर सैन्य आणि प्रशासनात नियु्नत्या दिल्या जाती व धर्मपाहून नाही. गुणवत्ता हाच त्यांचा आधार होता, छत्रपती शिवाजी महाराजांनी आदेश दिला होता की जर मोहिमे दरम्यान आस्मानी किताब म्हणजे ’पवित्र कुरआन’ची प्रत कुठे दिसली तर त्याला सन्मानपूर्वक मशिदीत ठेवा. यावरून कुरआनप्रती महाराजांचे प्रेम, आदर व्यक्त होतो, अशी माहिती यावेळी प्रा. सय्यद सलमान यांनी दिली.

खामगाव तालुक्यातील जळका भडंग येथे 20 फेब्रुवारी रोजी शिवजयंतीच्या निमित्ताने ’छत्रपति शिवाजी महाराज इस्लाम,समज गैर गैरसमज’ या विषयावर व्याख्यान ठेवण्यात आले होते. यादरम्यान व्याख्याते प्रा. सय्यद सलमान विचार व्यक्त करत होते. कार्यक्रमाचे आयोजन अ‍ॅड.श्यामल गायगोळ मित्रमंडळ आणि जमाअते इस्लामी हिंद पि.राजा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. यावेळी मंचावर पि.राजाचे ठाणेदार आडे, सरपंच, जमाते इस्लामी हिंद खामगावचे जिल्हाध्यक्ष व पि.राजा चे शहराध्यक्ष उपस्थित होते. पुढे बोलताना प्रा. सय्यद सलमान म्हणाले, छत्रपती शिवरायांनी मुस्लिम संत याकूत यांच्या खर्चासाठी कोकणात केळशी येथे 653 एकर जमीन आज्ञपत्राने इनामी दिली. शिवाजी महाराजांनी जेव्हा जिजियासाठी औरंगजेबला पत्र लिहिले त्यात जिजिया कोण घेऊ शकतो याबद्दल कुरआनचा दाखल देत अभ्यासपूर्ण माहिती पत्रात सांगितली.  त्यात ईश्वर सर्वांचा आहे फक्त मुसलमानांचा नाही, अशी समज औरंगजेबाला दिली. तसेच शिवाजी महाराजांनी आपल्या मुसलमान प्रजेसाठी रायगडावर मस्जिदसुद्धा बांधली होती. छत्रपती शिवाजी महाराजांचे मोठ्या प्रमाणात गुणवान, पराक्रमी आणि निष्ठावंत सैनिक मुस्लिम होते. स्वराज्याचा पहिला सरनोबत नूरखान, आरमार प्रमुख दर्या सारंग,अंगरक्षक इब्राहिम खान,आग्रा येथून सुटकेच्या प्रसंगीसोबत असणारा मदारी मेहतर, वकील व सचिव काझी हैदर असे एक ना अनेक मुस्लिम सैनिक छत्रपती शिवाजी महाराजांचे निष्ठावंत व विश्वासू होते. तसेच 700 पठाणही छत्रपतींच्या स्वराज्यात सामील झाले होते. हा होता छत्रपति शिवाजी महाराजांचा धर्मनिरपेक्ष दृष्टिकोन. दुसरीकडे औरंगजेबचा विश्वासु सरदार मिर्झाराजे जयसिंग हा हिंदू होता तर अफजल खानचा वकील कृष्णा भास्कर कुलकर्णी हा हिंदू होता. यावरूनच कळते की त्यावेळी चालणाऱ्या लढाया, युद्ध हे राजकीय होते, धार्मिक नव्हते. हे समजणे काळाची गरज आहे, असे प्रा. सय्यद सलमान म्हणाले. यावेळी सलमान म्हणाले, आज महापुरुषांबद्दल अनेक गैरसमज निर्माण करून जो द्वेष पसरविला जात आहे त्याला जानकारांनी वेळीच लगाम घातला पाहिजे, ते रोखले पाहिजे. सत्य इतिहास समाजासमोर मांडून नागरिकांची दिशाभूल होण्यापासून रोखले पाहिजे. जातीय सलोखा, सद्भावना निर्माण व्हावी म्हणूनच जमाअते इस्लामी हिंद नेहमी अश्या प्रकारच्या कार्यक्रमात आपलं सहकार्य देत असते, असेही विचार प्रा. सलमान यांनी उपस्थितांसमोर ठेवले.


Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget