ह. आसमा बिन्त यझीद अनसारिया म्हणतात की एकदा अल्लाहचे प्रेषित मुहम्मद (स.) माझ्या जवळ आले. मी आमच्या मैत्रिणींसोबत खेळत होते. त्यांनी सलाम केला आणि म्हणाले,
"जे तुमच्यावर उपकार करतात त्यांची कदर करा. तुमच्यापैकी एक मुलगी बरीच वर्षे आपल्या मातापित्याकडे अविवाहित अवस्थेत राहत आहे, मग अल्लाह तिला एका पतीचे वरदान देतो. तिच्याकडे संतती बहरते, फुलते. जर कधी आपला पतीशी विवाद होतो आणि मग ती म्हणते की तुम्ही माझ्याशी कधी चांगला व्यवहार केलाच नाही." (अदब अल मुफर्रिद)
प्रेषित मुहम्मद (स.) म्हणतात,
"तुमच्यापैकी जर कुणी कुणास कर्ज दिले आणि ज्यांनी कर्ज घेतले असेल त्याने कर्ज देणाऱ्यास भेटवस्तू दिली किंवा आपल्या वाहनावर बसवले तर तुम्ही त्याची भेटही स्वीकारू नका की त्याच्या वाहनावर स्वार होऊ नका. पण जर पूर्वीपासूनच (कर्ज घेण्याआधीपासून) तुम्ही आपसात देवाणघेवाण करत असाल तर काही हरकत नाही." (ह. अनस (र.), इब्ने माजा, मिश्कात)
ह. मुहम्मद (स.) यांनी जकात गोळा करण्यासाठी इब्नुल्लात्बेया नावाच्या एका व्यक्तीला नेमले. तो जकातची वसुली करून प्रेषितांकडे येतो आणि म्हणतो की हे तुमच्यासाठी आहे म्हणजे शासकीय कार्यासाठी आहे आणि हे मला दिलेले आहे. यानंतर प्रेषितांनी प्रवचन देताना सांगितले,
"मी लोकांना अशा कामासाठी नेमत सतो ज्याची अल्लाहने माझ्यावर जबाबदारी टाकली आहे आणि मी पाहतो की ज्या लोकांची मी नेमणूक केली आहे ते लोक माझ्याकडे येऊन म्हणतात की हे आपल्यासाठी आहे आणि बाकीचे हे मला भेट म्हणून दिलेले आहे. मी विचारतो की जर तो आपल्या मायबापाकडेच बसलेला असता तर त्याने पाहिले असते की त्याला कुणी भेट दिली की नाही. त्या अस्तित्वाची शपथ, ज्याच्या हाती माझे प्राण आहे. जो कुणी त्या मालामधून काही घेत असेल तर कयामतच्या दिवशी आपल्या डोक्यावर तो ओझे घेऊन अल्लाहसमक्ष हजर होईल. जर तो उंट असला तर त्याच्या गळ्यातून उंटाचाच आवाज निघेल. जर गाय, शेळी, मेंढी असतील तर तसाच आवाज निघेल." आणि मग प्रेषितांनी आपले दोन्ही हात वर उचलले आणि म्हणाले, "हे अल्लाह, तू साक्षी आहेस, मी तुझे आदेश पोचते केले." (अबू हमदी साअदी, बुखारी, मुस्लिम, मिश्कात)
संकलन
सय्यद इफ्तिखार अहमद
Post a Comment