व्हॅलेंटाईन डेज असो का अन्य डेज, पाश्चिमात्य संस्कृतीमध्ये महिलांना त्यांच्या गृहिणीपदाच्या मूळ जबाबदारीपासून विलगकरून पुरूषांबरोबर कामाला जुंपन्यामागे मूळ हेतू त्यांचे लैंगिक शोषण करणे हा असतो. साधारणपणे मुक्त वातावरणात स्त्री-पुरूष काम करत असतील तर त्यांच्यात एकमेकांबद्दल आकर्षण निर्माण होणे ही नैसर्गिक बाब आहे व त्यातूनच गुंतागुंतीचे नातेसंबंध तयार होत असतात.
जिंदगी भर का साथ हो निकाह की मुहब्बत
बेकार सी बात है ये हफ्ते भर की मुहब्बत
मुस्लिम समाजाची सर्वाधिक हानी पाश्चात्य (अ) सभ्यतेच्या प्रभावामुळे झालेली आहे. अनेक चुकीच्या प्रथांपैकी ’व्हॅलेंटाईन डे’ ही प्रथासुद्धा मुस्लिम तरूण-तरूणींमध्ये कमालीची लोकप्रिय झालेली आहे. सकृतदर्शनी जरी मुस्लिम समाज शरियतच्या आचारसंहितेने बांधलेला दिसत असला तरी ’बर्थ डे पासून व्हॅलेंटाईन डे’ पर्यंत अनेक बिगर इस्लामी, खर्चिक व अनैतिकतेला उत्तेजन देणाऱ्या प्रथांचा शिरकाव या समाजात झालेला आहे. ही वस्तुस्थिती नाकारता येण्यासारखी नाही. इस्लाममध्ये विवाहपूर्व आणि विवाहबाह्य प्रेमाला मान्यता नाही. हे अगोदरच स्पष्ट करून मग या लेखाची सुरूवात करतो.
व्हॅलेंटाईन डे चा इतिहास
अगदी संक्षिप्तरित्या सांगावयाचे झाल्यास इसवीसनाच्या तिसऱ्या शतकात रोममध्ये ’क्लाउडियस’ नावाचा एक राजा होता. तो शूर पण युद्धपिपासू होता. वीर्य पतनामुळे सैनिकांची शारीरिक शक्ती कमी होते, असा त्याचा समज होता. म्हणून त्याने आपल्या सैन्याला लग्न न करण्याचे फरमान जारी केले. त्याच्या या जुल्मी आदेशाचा विरोध तत्कालीन सेंट (संत) व्हॅलेंटाईन यांनी करत अनेक इच्छुक सैनिकांचे विवाह गुप्तपणे लावून दिले. क्लाउडियसला जेव्हा ही बातमी कळाली तेव्हा त्याने सेंट व्हॅलेंटाईन यांना कैद करून फाशीची शिक्षा सुनावली व इ.स.14 फेब्रुवारी 269 रोजी त्यांना फाशीवर लटकावण्यात आले. म्हणजे दुसऱ्यांची लग्न लावताना त्यांना स्वतःच्या प्राणाची आहुती द्यावी लागली.
या ऐतिहासिक घटनेची आठवण म्हणून 14 फेब्रुवारी हा प्रेमाच्या अभिव्यक्तीचा दिवस म्हणून ब्रिटनमध्ये पाळण्याची प्रथा 19 व्या शतकात सुरू झाली. वास्तविक पाहता सेंट व्हॅलेंटाईन यांची पुण्यतिथी शांतपणे साजरी करून त्यांच्या आत्म्याला शांती मिळो, अशी प्रार्थना करून प्रकरण संपवता आले असते. मात्र प्रत्येक गोष्टीत कॉमर्स शोधणाऱ्या पाश्चिमात्य लोकांनी या घटनेचे व्यापारीकरण केले. सेंट व्हॅलेंटाईन यांनी दुसऱ्यांचे कायदेशीर लग्न लावून दिले, म्हणजे परोपकार केले. अशा या परोपकारी धर्मगुरूंनी उदात्त भावनेतून केलेल्या नैतिक कृतीला व्हॅलेंटाईन डे च्या रूपाने अनैतिक प्रेमाचे उदात्तीकरण करून त्याला बटबटीत रूप देण्याचे पाप या ब्रिटिश लोकांनी केले.
व्हॅलेंटाईन डे मागचे अर्थकारण
अमेरिकन ग्रीन कार्ड असोसिएशनच्या ताज्या आकडेवारीप्रमाणे मागील काही वर्षांपासून व्हॅलेंटाईन डे च्या हंगामात जगभरात एक अब्ज पेक्षा अधिक कार्डस् एकमेकांना दिली जातात व ही आकडेवारी दरवर्षी वाढतच आहे. वाचकांना माहित असेल भरमसाठ किमतीची ही कार्डे प्रेमात आंधळे झालेले लोक पुढचा-मागचा विचार न करता वेड्यासारखे खरेदी करत असतात. यावरून या मुर्खतापूर्ण व्यवहारात होणाऱ्या अब्जावधी रूपयांच्या उलाढालीचा वाचकांना अंदाज यावा. मुळात हा खर्च कमी म्हणून की काय दरवर्षी फेब्रुवारीचा दूसरा आठवडा प्रेमाला समर्पित करण्याची शक्कल पाश्चिमात्य व्यापारी वृत्तीच्या पुरूषांच्या सुपिक डोक्यातून निघाली. म्हणूनच 7 फेब्रुवारी - रोज डे, 8 फेब्रुवारी प्रपोज डे, 9 फेब्रुवारी चॉकलेट डे, 10 फेब्रुवारी टेडी डे, 11 फेब्रुवारी प्रॉमीस डे, 12 फेब्रुवारी हग डे, 13 फेब्रुवारी किस डे आणि 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे अशा अनेक कार्यक्रमांनी हा आठवडा भरलेला असतो. या सात दिवसांत अब्जावधी रूपयांची होणारी आर्थिक उलाढाला ही व्हॅलेंटाईन डे मागची खरी प्रेरणा आहे, यात दूमत नाही.
मुळात 18 व्या शतकाच्या शेवटी व 19 व्या शतकाच्या सुरूवातीपासूनच युरोपमध्ये मुक्त लैंगिक संबंधांना प्रोत्साहन देण्याचे काम सुरू झाले होते. चर्च प्रभावहीन झाले होते, धार्मिक शिक्षणाची जागा भौतिक शिक्षणाने घेतलेली होती. विज्ञानाचा विकास तीव्र गतीने होत होता. तंत्रज्ञान वेगाने वाढत होते. औद्योगिक क्रांती नुकतीच झालेली होती. त्यामुळे युरोपमधील लोकांच्या हातात मोठ्या प्रमाणात पैसा खुळखुळत होता. इतिहास साक्षी आहे की, माणसाच्या हातात जेव्हा-जेव्हा गरजेपेक्षा जास्त पैसा आला त्याची पाऊले आधी संगित, मग कोठे व त्यातून मुक्त लैंगिकतेकडे वळली.
18 व्या शतकातसुद्धा औद्योगिक क्रांतीमुळे आलेल्या भरमसाठ पैशाने युरोपीयन लोकांचा प्रवास मुक्त लैंगिकतेकडे सुरू झाला. आधी कार्विंग (कलाकुसर) केलेल्या लाकडांचा वापर करून स्त्री-पुरूषांच्या नग्न मुर्त्या, त्यांच्या गुप्तांगाचे ठोकळे तयार करून विकले गेले. फ्रांसमध्ये या ’वुड-पोर्नोग्राफी’ने अल्पावधीतच कमालीची लोकप्रियता गाठली.
1839 मध्ये कॅमेऱ्याचा शोध लागला. 1855 मध्ये त्याद्वारे नग्न महिलांचे फोटो काढून विकण्याचा प्रयोग सुरू झाला. मात्र बाल्यावस्थेत असलेल्या या कलेची अडचण 1863 मध्ये तेव्हा दूर झाली जेव्हा प्रिंटरचा शोध लागला. आता अश्लिल चित्रांच्या लागेल तितक्या प्रती काढता येऊ लागल्या. जुगाराच्या पत्यांच्या पाठीमागच्या बाजूस अशी नग्न चित्रे वापरली गेली. 1876 मध्ये व्हीडीओ कॅमेऱ्याचा शोध लागला आणि खऱ्या अर्थाने अश्लिल चलचित्रांना चालना मिळाली. पहिला अश्लील चित्रफट लोमीर ब्रदर्स यांनी 1895 ला फ्रान्समध्ये प्रदर्शित केला. या चित्रपटाचा दिग्दर्शक अल्बर्ट कोचर नावाचा व्यक्ती होता. या चित्रपटाने तुफान लोकप्रियता मिळविली होती.
अशा पद्धतीने 19 व्या शतकाच्या मध्यापर्यंत संपूर्ण युरोप अश्लील चलचित्रांच्या गर्तेत ढकलला गेला. चर्च निष्प्रभ झाल्यामुळे सैल झालेल्या धार्मिक बंधनाचा फायदा उचलत चतूर युरोपीयन पुरूषांनी व्यक्तीस्वातंत्र्य व महिला सबलीकरणाच्या नावाखाली घरंदाज महिलांना घराबाहेर काढण्यात यश मिळविले. भारतातही याच काळात अश्लील चित्रफीतिंनी व्हीडीओ कॅसेट, सीडी, डिव्हीडीच्या माध्यमातून मोठा धुमाकूळ घातला. साधारणपणे माणसे फार लवकर लैंगिक इच्छेच्या आहारी जातात. धार्मिक बंधने सैल असलेला समाज याला चटकन बळी पडतो. आज जेव्हा लैंगिक चित्रफिती स्मार्ट फोनच्या माध्यमातून एका क्लिकवर कॅटेगिरीवाईज उपलब्ध आहेत, सोबतीला भरपूर व्यक्तीस्वातंत्र्य आहे, हातात पैसा आहे, अर्थव्यवस्था, समाजव्यवस्था आणि कॅम्पस बऱ्यापैकी मुक्त आहेत. तर या सर्वांचा उपयोग, ’अशा उद्योगासाठी’ केला गेला नसता तरच नवल. लक्षात ठेवा मित्रानों! आधुनिकतेच्या नावाखाली अनैतिकतेला उत्तेजन देणाऱ्या या सर्व गोष्टींचा सर्वात वाईट परिणाम महिला आणि मुलींवर होतो. त्यात अनेकींच्या आयुष्याची राखरांगोळी होते. पुरूष मात्र नामानिराळे राहतात.
ह्या प्रकारची थेरं ही भारताच्या महान हिंदू संस्कृती आणि महान इस्लामी संस्कृती या दोहोंच्या विरूद्ध आहे. म्हणून खरे तर गरज या दोन्ही समाजातील संस्कृती रक्षकांनी एकत्र येऊन या विदेशी संस्कृतीविरूद्ध एल्गार पुकारण्याची होती. मात्र सध्याच्या सांप्रदायिक वातावरणात हे शक्य नसल्याने किमान मुस्लिमांनी तरी आपले शरई कर्तव्य म्हणून व्हॅलेंटाईन व इतर डेज चा सनदशीर मार्गाने जमेल तसा विरोध करावा.
मुस्लिमांची जबाबदारी
सुरे बकरामध्ये अल्लाहने फर्माविले आहे की,
1.’लोक हो! जमीनीमध्ये ज्या वैध आणि शुद्ध गोष्टी आहेत त्यांचे सेवन करा आणि सैतानाच्या मार्गाचे अनुसरण करू नका. निःसंशय तो तुमचा उघड शत्रू आहे. कारण तो तुम्हाला वाईट आणि अश्लिल गोष्टींचा आदेश देत असतो. जेणेकरून तुम्ही अल्लाहविषयी त्या गोष्टी बोला ज्या तुम्ही जाणत नाहीत.’ (सुरे बकरा आयत नं. 168-169).
2. ’ व्याभिचाराच्या जवळपासही फिरकू नका ते फार वाईट कृत्य आहे आणि अत्यंत वाईट मार्ग’ (सुरे बनी इसराईल आयत नं. 32).
व्हॅलेंटाईन डेज असो का अन्य डेज, पाश्चिमात्य संस्कृतीमध्ये महिलांना त्यांच्या गृहिणीपदाच्या मूळ जबाबदारीपासून विलगकरून पुरूषांबरोबर कामाला जुंपन्यामागे मूळ हेतू त्यांचे लैंगिक शोषण करणे हा असतो. साधारणपणे मुक्त वातावरणात स्त्री-पुरूष काम करत असतील तर त्यांच्यात एकमेकांबद्दल आकर्षण निर्माण होणे ही नैसर्गिक बाब आहे व त्यातूनच गुंतागुंतीचे नातेसंबंध तयार होत असतात.
मुळात ज्या मुस्लिमांचा कुरआनशी प्रत्यक्षात संपर्क तुटलेला आहे, त्यांच्यात आणि वरील प्रमाणे मुक्त वातावरणात राहणाऱ्या इच्छा-आकांक्षांच्या गुलाम प्रवृत्तीच्या लोकात कोणतेही अंतर नाही. म्हणून असे मुस्लिम सुद्धा सतत मुक्त लैंगिक संबंधाच्या शोधात असतात. स्त्री त्यांच्यासाठी एक सेक्स ऑब्जेक्ट असते. व्हॅलेंटाईन डेज, फ्रेंडशीप डेज वगैरे हे जे सारे डेज आहेत, त्यात अनोळखी स्त्री-पुरूष भेटी व त्यातून मुक्त संबंध निर्माण होण्याची संधी दडलेली असते. याच संधीच्या शोधात हे लबाड पुरूष असतात. म्हणून अशा अभिरूचीचे लोक मोठ्या प्रमाणात असे डेज साजरे करण्यात उत्सुक असतात व दुसऱ्यांना त्यासाठी प्रोत्साहित देखील करत असतात. यात शेवटी बळी जातो तो निरागस उमलू पाहणाऱ्या मुलींचा. -(उर्वरित पान 7 वर)
या डेज आणि डेटींगच्या नावाखाली त्यांना भुलवून त्यांचे लैंगिक शोषण करण्याच्या तयारीत असणाऱ्या या लांडग्यांच्या भूल थापांना त्या अन-अनुभवी असल्यामुळे बळी पडतात. त्यातूनच मग अनेक मुलींचे जीवन उध्वस्त होते. तर काहींना आत्महत्या सुद्धा कराव्या लागतात. या लांडग्यांची लबाडी उघडी पाडून आपल्या व आपल्या देशबांधवांच्या निरागस मुलींना या शोषणापासून सावध करणे भारतीय मुस्लिम म्हणून आपली जबाबदारी आहे. या संबंधीचे जमेल त्या पद्धतीने, जनजागरण करत राहणे व मुलींना यातील धोक्यासंबंधी सावधानतेचे इशारे देत राहणे, तूर्तास एवढेच आपल्या हाती आहे. तेवढेच आपण करावे. व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी तरूण जोडप्यांना गाठून मारहाण करण्यासारखे अघोरी प्रकार कदापी करू नयेत. त्यांने फारसे काही साध्य होत नाही. त्यापेक्षा त्यांचे विचार बदलण्याचा प्रयत्न करावा.
यासंबंधी जमाअते इस्लामीचे संस्थापक मौलाना अबुल आला मौदूदी म्हणतात,’’ज्या व्यक्तीला खऱ्या आणि खोट्यामधील फरक व्यवस्थित पद्धतीने स्पष्ट करून दाखविला जातो तरी तो ते मान्य करत नाहीत. मग त्याच्या समोर काही लोक खर्ऱ्या मार्गावर चालून सुद्धा दाखवून देतात की, अज्ञान काळात ते ज्या वाम मार्गाला लागलेले होते त्याचा त्याग करून, इस्लामचा मार्ग स्विकारल्याने त्यांचे जीवन किती सुखद झाले. तरी सुद्धा वाम मार्गी माणूस त्यापासून काही धडा घेत नाही. तर याचा अर्थ असा आहे की, आता तो फक्त आपल्या वाम मार्गाची शिक्षा भोगल्यावरच स्विकार करेल की हां, हा मार्ग चुकीचा होता. जो व्यक्ती डॉक्टरच्या अभ्यासपूर्ण सल्ल्यांना स्वीकारत नाही आणि आपल्यासारख्या अन्य आजारी माणसांना डॉक्टरांच्या सल्ल्यांची अंमलबजावणी करून रोगमुक्त झालेले पाहूनही धडा घेत नाही, तर मग असा व्यक्ती जेव्हा आजाराने खिळून मृत्यू पंथाला लागेल तेव्हाच स्वीकार करेल की, तो ज्या पद्धतीने जीवन जगत होता ती पद्धत त्याच्यासाठी खरोखरच जीवघेणी होती. (संदर्भ : तफहीमूल कुरआन खंड 2 पान क्र.35).
यात पालकांची भूमिका फार महत्त्वाची आहे. कारण शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठाचे वातावरण तर ’व्हॅलेंटाईन डे’ मय झालेले असते. अशात आपल्या मुलांना या मानवनिर्मित आपत्तीपासून वाचविण्याचे व्यवस्थापन करणे पालकांचे कर्तव्य आहे. यात मुस्लिम पालकांना शरियतचे अॅडव्हान्टेज मिळते. घरात जर जाणीवपूर्वक शरई वातावरण राखण्यात पालक यशस्वी झाले तर मुलांना बाहेरच्या नैतिकदृष्ट्या प्रदुषित वातावरणाला सुद्धा यशस्वीपणे तोंड देऊन स्वतःचे शील अबाधित ठेवता येईल. म्हणून सर्व पालकांनी या विषयी कायम दक्ष राहणे गरजेचे आहे. तातडीचा उपाय म्हणून पालकांनो व मुलींनो ’व्हॅलेंटाईन डे’च्या घातक जाळ्यात अडकू नका. एवढेच म्हणता येईल.
- एम.आय.शेख
Post a Comment